मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
ह्या उघड पसार्‍यामधी । अ...

लावणी - ह्या उघड पसार्‍यामधी । अ...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


ह्या उघड पसार्‍यामधी ।

अरे गुणनिधी । नको रे कुच धरू ।

चाल जाऊ वरल्या जिन्यात, तेथे मनमाने ते करू ॥ध्रु०॥

हा कठिण सासुरवास । काच या जिवास ।

आहे कर्वत ॥ किती घडोघडी होसि अधिर ।

तुला रे काहीच धीर, नाही धरवत ।

सोय सुमार पाहुन भोग इष्काचा पर्वत ॥

भर दुपारच्या अमलात । मला महालात ।

दुर्शीवत धरिल कोणी अवचित । एकीकडे ठेविल तो मुर्वत ॥चाल॥

कर्म करुन नवे नित्य असावे, आहेस आप्त म्हणुन सांगते ॥

सासरी आणि माहेरी कशी मी रे ठमक्याने वागते ॥

ठेवुन छाप सर्वांवर तुजला हळुच आलिंगित्ये ॥

चुंबन देते चोरून । मिठी मारून ।

भिरे भरभरू ॥ आनंद घन वाटतो परंतु भलते कसे आचरू ॥१॥

घरी सासु सासरा दीर ।

करी किरकिर । पहाती गुलात ॥

कचेरित घर धनी बैसती वाघापरी डरकत ॥

अशी असुन त्यांची कदर । करुन वर नदर ।

कुच सर्कत हस्त खुशी बोलत्ये ॥

डोळे धालिते मुख मुरकत ।

ह्या जन्मांतरच्या योगे कधी तरी वियोग झाली हरकत ॥

एक निश्चय आहे तेथे भगवान देइल बरकत ॥चाल॥

आले आवकाळी आभाळ जाइल काळे करुन वसरून ॥

हिमत सोडू नका सागरा ॥

पहा पहा उदारगुणआगरा ॥

आता आड सीतळ मैलागरा ।

सोड सगळी गंगु हैबती सबळ धिरवान ।

महादेव गुणिराज गुणवान ।

प्रभाकर कवीवर मेहेरबान । कृपा आगळी ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP