मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
का रे रुसलासी सगुण गुण रा...

लावणी - का रे रुसलासी सगुण गुण रा...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


का रे रुसलासी सगुण गुण रासी ।

उठ चाल घरासी ॥धृ०॥

पडला घरी सुना रे महाल मिन्याचा ।

निर्मळ एन्याचा ॥

धरलास का रुसुन थार जिन्याचा ।

आला त्रास जुन्याचा ॥

जातो रंग बहार दिवस सोन्याचा ।

फालगुन महिन्याचा ॥चाल॥

भिडु दे लवकर ह्या ऊर उरासी ॥१॥

करता मन कठोर का हो कृपाळा ।

मज सुखात पाळा ॥

हलविन कधी नटुन थटुन झोपाळा ।

अरे धन्य कपाळा ॥

फुटला शरिरात ह्या काम उपाळा ।

कर शांत नृपाळा ॥चाल॥

धरीते निरलज्यपणे पदरासी ॥२॥

सख्या सगुणा रे विनंत्या करते ।

कवटाळुन धरते ॥

द्या द्या पुढे पाय स्तनाने चुरते ।

म्हणुन भवती फिरते ॥

पहारे तरी हास्य मुखाने वरते ।

उभय कर पसरते ॥चाल॥

डसला जणू विंचु मदन शरिरासी ॥३॥

पलंगी क्षण भर तरी स्वस्थ ठरा हो ॥

मग रागे भरा हो ॥

चढला शिरी काम रतुन उतराहो ।

नाही धीर जरा हो ॥

गंगु हैबती म्हणे संग कराहो ।

ह्रदयासी धराहो ॥

महादेव गुणिराज जरब इतरांसी ।

भीती प्रभाकरासी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP