मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
डसला मज हा कांत विंचू लहर...

लावणी - डसला मज हा कांत विंचू लहर...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


डसला मज हा कांत विंचू लहरी ।

येसी प्रेमसुखाच्या लहरी ॥ध्रु०॥

पलंगी पुतळ्यांचे कराग विधान ।

काही ठेवा नामाभिघान ॥

आदरे मानून तो प्राणनिदान ।

पुढे भोगिन मुख्य प्रधान ॥

भरले रतिसागरी विषय उधान ।

करू कुठवर करी अपिघान ॥चाल॥

सखये आवरे नाग जाते बहरी ॥१॥

जळती नवी नाजुक पहिली पराई ।

सर्वांगी सुरस सुगई ॥

आली जणु रसास भर आमराई ।

पाहा येउन ऐन सरई ॥

नलगे काही जोड मोहोर सिवराई ।

आहे घरीच पुरी अमिराई ॥चाल॥

करते रोज नामी प्रहरा प्रहरी ॥२॥

श्रृंगार पुरुषाचा थेट करा ग ।

कुच आवळून दोनी धरा ग ॥

अर्की माजुम वदनात भरा ग ।

शरिराची झाली तर्‍हा ग ॥

वेणी सोडून या विंचरा ग ।

दुःख माझे सर्व हर ग ॥चाल॥

कैसा कोपलाग मजवर श्रीहरी ॥३॥

वाटे पतिसंगे रंग लुटावा ।

कधी संशय सर्व फिटावा ॥

थोडा प्रत्यय तरी पटावा ।

किति आपुला प्राण आटावा ॥

गंगु हैबती म्हणे स्वार पीटावा ।

ल्याहा कागद खर्ची बटावा ॥चाल॥

महादेव गुणीराज सुगर पुणे शहरी ।

करी कवन प्रभाकर लहरी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP