TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अप्रसिद्ध पद

श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अप्रसिद्ध पद

इ. स. १९४२-४४ च्या सुमारास या भजनात भाव घेणारा एक भजनकरी ‘ बोधाच्या मदनात ’ हे ज्ञानेश्वरमहाराजांचे पद म्हणत असे.

श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अप्रसिद्ध पद
बोधाच्या मदनात सखे ग बाई मी झाले वेडी । चित्तचांदण्यामध्ये सखे ग बाई घातली पलंगडी ॥धृ०॥
वैराग्याची पानसुपारी भरोनी तबकडी । विवेकाचा चुना लावुनी बनविली विडी ॥ तम - तमाखु जाळायाला जवळ गुरु - गुडी । सत्रावीचे पाणी भरूनी आणिले त्याच घडी । तर्‍हतर्‍हेचे रंग मी करते साधन बहुरंगी । परपुरुष भोगिला परंतु दोष नाही अंगी ॥१॥
क्रोध माझा भ्रतार याका ठेवोनिया घरी । मला लागली गोडी म्हणुनि हिंडते परद्वारी । आशा माझी सासू इजला करूनी आले चोरी । मनषा माझी नणंद आहे राखण मजवरी । लोभ दंभ अहंकार दीर नलगे संसारी । अहंकार हा सासरा माझा पूर्वीचा वैरी । इतक्यांना मी कर जोडूनी लागेन दुजे अंगी ॥२॥
भावासंगे बाई मी नेले केवढी काळीज । द्वैतभावहे ओल सखे ग बाई मला नाही लाज । चतुर्दळावरी षट्दळ दश हे दळावरी आज । द्वादश षोडश दळ वरती द्विदळाची मौज । इडा पिंगला तिसरी सुषुम्ना पुण्या गेली बीज । त्रिवेणीचा संगम तेथे चिन्मयाचे राज्य । उन्मनीच्या द्वारी अनुहत वाजविली पुंगी ॥३॥
सहस्रदळावरी दसवे द्वार वोलांडोनी । भक्ती माझी कुंटीण इने दावियले नयनी । सोहं मूर्तीच्या बंगल्यावरती निद्रागत बहिणी । ओहं सोहं सेवा करिती मोठ्या हौसेनी । दिव्य ज्योत सुप्रकाशे जळताती दोनी । प्राणसखा सोयरा उभा का तेथे आंगणी । भक्तराज ज्ञानोबा तयाचे नाव अभंगी ॥४॥
( के. वा. आपटे, म. स. प - ३०.३ )

Translation - भाषांतर
N/A

Last Updated : 2016-12-26T19:38:58.0530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ढळढळवणी

  • ढळढळवणी, शाबास ग सुग्रणी 
  • एखादा पदार्थ खूब पातळ, बेचव, पांचट केल तर तो करणारीला सुग्रण कोण म्‍हणेल व तिला शाबासकी कसली द्यावयाची? इकडे हुशार म्‍हणून वाखाणणी करावयाची व पाहूं गेले असतां कोणतेहि काम करण्याची अक्‍क्‍ल नसावयाची, असा उलट प्रकार. कामात नांवाजलेल्‍या माणसाने काही बिघडविले म्‍हणजे म्‍हणतात. 
RANDOM WORD

Did you know?

विविध देवदेवतांचे आकार, रंग, रूप ही कल्पना कशी आणि कोणी निर्माण केली?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.