TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
नागेश कवि

नागेश कवि

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


नागेश कवि
पिता मोरजोशी महाख्यात आहे । तथा जानकी नाम मातेसि आहे ।
अहो थोरल्या दोन्हि बंधूंसि साचें । असे नाम मल्हारिचें त्र्यंबकाचें ॥१॥
तत्या धाकुटा तोच नागेश पाहे । कवित्वीं जया ज्ञान संपूर्ण आहे ॥
तयाच्या मुखें ग्रंथ संपूर्ण झाला । जनां वाचितां फार आनंद झाला ॥२॥
कोकाठया यशवंतराव जगतीं विख्यात राजा असे ।
त्याचा पुण्यकृती पुरोहित बरा तो मोर जोशी वसे ॥
तत्पुत्रें लघुकोमलामलपदीं पद्यावळी गुंफिली ।
श्रीनागेश कवीश्वरें सभवरें चंद्रावळी वर्णिली ॥३॥
गणेशास आधीं नमस्कार केला । तयानंतरें प्रार्थिलें शारदेला ।
करा जोडुनि वंदिलें खदगुरुसी । बरा ग्रंथविस्तार केला त्वरेसी ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-04-06T05:31:54.9470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

defect of rhythm

  • पु. लयदोष 
RANDOM WORD

Did you know?

हिंदू स्त्रियांच्या मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचे महत्त्व काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.