TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
संत जोगा परमानंदाचे अभंग

संत जोगा परमानंदाचे अभंग

संत जोगा परमानंदाचे अभंग

संत जोगा परमानंदाचे अभंग
१) वसोनि संताघरीं हो । घेतला गुरगुडी ॥धृ०॥ आधी ब्रह्माण्ड नारळ । मेरू सत्त्व तो अढळ । निर्मळ सत्रावीचे जळ । सोहं गुरगुडी । गुरू गोडी ॥ चिलमी त्रिगुण त्रिविधा । मीपण खडा तो अभेद ॥ तम तमाखु जाळून शुद्ध । वैराग्य विंगळ धरधडी ॥ सावधान लावुनिया नळी । मीपण झुरका विरळा गिळी । जन्ममरणाची मुरकुंडी संभाळी । धूर विषयाचा सोडी ॥ हो घेतली गुरूगोडी । लागला गुरूगोडी । लागला गुरूगोडीचा छंद । त्याला प्रसन्न परमानंद । जोगा स्वामी तो अभंग । गुरूचरण न सोडी ॥ बैसोनी संताघरीं ही घेतली गुरगुडी । हो गुरूगोडी ( महाराष्ट सारस्वत, आ. ५ पृ. १४७ मधून )

२) रोमांच रवरवितु । स्वेद बिंधु ढळमळितु । पाहाता नेम उन्मळतु । मरा मिटो मागुते ॥ ऐसा हृदयीं प्रगटसी । कै माझ्या नरहरी । तुज देखता तनु कांपे । मन बुद्धीही हारपें ॥ सकळही अहंभाव लोपे । एक तत्त्वचि उरे ॥
( महाराष्ट सारस्वत, आ. ५ पृ. १४६ मधून )

३) मन निवाले निवाले । कैसें समाधान झालें ॥ संतं आलिया अवसरी । नवल आरती यांची परी ॥ आनंदे नर नारी । परमानंद प्रकटले ॥ द्यावया आलिंगन । बाह्यां येतसे स्फुरण ॥ सजळ झाले लोचन । जैसे मेघ वर्षती ॥ आजि सुदिन सोहळा । संत जीवनाची कळा ॥ जोगा विनवितो सकळा । भेटी परमानंदेस्त ॥
( महाराष्ट सारस्वत, आ. ५ पृ. १४६ मधून )

संत जोगा परमानंदाचे अभंग समाप्त

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-12-23T21:24:13.2930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

जल्प

  • पुस्त्री . बडबड ; वल्गना ; बरळणें ; मूर्खपणाच्या गप्पा ; बढाईचें , प्रौढीचें भाषण मातला हस्ती क्षोभला सर्पु । भ्रष्टला ब्राह्मण पेटला द्वीपु । अमर्याद स्त्रियांचा जल्पु । आवरूं न शके विधाता । - मुआदि १६ . १६९ . जल्पक - वि . बडबडया ; निंदक आतित्याई जल्पक । - दा २ . ३ . २६ . जल्पणें - अक्रि . १ प्रौढी सांगणें ; गर्व वाहणें . २ बडबडणें . पोकळ बढाया मारणें - सक्रि बोलणें उच्चार करणें . सदा परनिंदा जल्पती । सीतासती तेथें कैची । [ सं . जल्प = बडबडणें ] 
  • ०वाद पु. बडबड ; जल्पना अहं ममतेचिया जल्पवादीं । - ज्ञा ७ . १०६ . 
  • n. तामस मन्वंतर के सप्तर्षियो में से एक । 
RANDOM WORD

Did you know?

घरातील देव्हारा पूर्व पश्चिम कां ठेवतात, इतर दिशा कां वर्ज्य?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site