मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
नामापाशी ईश्र्वर

प्रसंग अठरावा - नामापाशी ईश्र्वर

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


नारद म्‍हणे जी श्रीहरि । हा देह सरल्‍याउपरी । तुम्‍हां कैसें पहावें मुरारी । सांगिजे आम्‍हां ॥७३॥
मग बोलिला ब्रह्मपुतळा । न गंवसें अंगीं दीर्घ मंडळा । वैकुंठीहि नसें वेल्‍हाळा । ऐक सांगेन परियेसा ॥७४॥
रिद्धि सिद्धि साध्य साधनीं । न गंवसे अनेक प्रयत्‍नीं । जप तप करितां साधन भ्रमणी । नातुडे यमास ॥७५॥
नसे अमरावती शिवपुरीस । न गंवसें इंद्रपुरीसभें साधकांस । नग्‍न मोहन साधनें उदास । मुक्तीसहि नातुडें ॥७६॥
अष्‍टांग योग अनेक रिद्धि । शक्ति आराधन अनेक बुद्धी । वेदश्रुतीचिया मद सिद्धी । न गंवसे प्रयत्‍नें ॥७७॥
साधु प्रेमपिसा बोधिक । माझ्या नामें उचंबळें अधिक । त्‍यामागें पुढें फिरे होऊनियां रंग । श्रवणसुखालागीं ॥७८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP