TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
ग्रंथलेखनकाल

प्रसंग अठरावा - ग्रंथलेखनकाल

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


ग्रंथलेखनकाल
मुख्यग्रंथविभाग

प्रसंग पहिला संपला भावे । दुसरा संपला भक्ति नांवें । तिसरा ज्ञान अनुभवें । समाप्त पैं ॥३१६॥
चौथा तो वैराग्‍य संपला । पांचवा बोधें प्रेमें चर्चिला । विवेके अनुभवाचा केला । सावध राजयोगें ॥३१७॥

ग्रंथलेखनकाल

पार्थीव नाम संवत्‍सर । ते दिवशीं ग्रंथ केला जाहिर । शुद्ध पौर्णिमा सोमवार । गुरुग्रहण पूर्ण होते ॥३१८॥
शुद्ध श्रावणांत पाडवा । अधिक पहिल्‍या सोमवाराची ठेवा । पुजा बेलपत्रीं सदाशिवा । नामघोषें ब्रह्मानंदें ॥३१९॥
सुमुर्तांमधील प्रातःकाळा । चढती रविचंद्राची प्रकाशकळा । तैसा सद्‌गुरूचा शब्‍द सोंवळा । हृदयीं प्रकाशला ॥३२०॥
संपूर्ण ग्रंथाची अवस्‍था । ऐका पूर्णिमेस केली पूर्णता । शरण शेख महंमद वक्ता । सद्‌गुरूचें चरणीं ॥३२१॥
ते दिवशी ग्रंथ संपविला । स्‍वयें सद्‌गुरुराजें लिहिला । शेख महंमद भूषण मिरविला । आपला आपलेपणें ॥३२२॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:27.5300000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तावत

  • वि. तितके ; तेवढे . यावत्संख्यांक ब्राह्मणं तूं सांगीतलेस तावत्संख्याक मी आणिले . - क्रिवि . तोपर्यंत , तोपावतो ; तावत्कालपर्यंत . याच्या जोडीचा शब्द यावत . या शब्दाचा मराठीत स्वतंत्र उपयोग नाही . तावत्काल , तावत्कालपर्यंत , तावत्पर्यंत इत्यादि सामासिक शब्दांत मात्र उपयोग करितात . [ सं . ] सामाशब्द - 
  • ०काल कालपर्यंत क्रिवि . तोपर्यंत ; त्या वेळेपावेतो ; तितका वेळ . 
  • ०पर्यंत क्रिवि . विवक्षित कालापर्यंत ; विवक्षित स्थळापर्यंत , अंतरापर्यंत ; तोपर्यंत ; तेथवर . तावन्मात्र क्रिवि . १ जरुर तितकेच ; तितकेच ; जरुरीपुरतेच ; याच्या जोडीचा शब्द यावन्मात्र २ ( व्यापक . ) यथातथा ; जेमतेम पुरेल इतके थोडे ; म्हणण्या जोगे नसलेले ; माफक ; थोडेसे . आपण शिके जाऊन । तावन्मात्र शिके जाण । सवेचि विस्मृति होय त्यासी । - गुच १७ . २१ दुभते सांगण्याजोगे नाही , तावन्मात्र आहे . [ सं . तावत + मात्र ] 
RANDOM WORD

Did you know?

What is the difference between Smarta & Bhagwata Ekadashi?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.