मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा| नाममहिमा प्रसंग अठरावा प्रशस्ति मनाच्या लीला मन ताब्यांत नाहीं तर दगा निश्र्चित मन जतन केल्यास ब्रह्मप्राप्ती विहंगम मार्ग त्रिकुट ते श्रीहाट कूच गोल्हाट व औटपिठ अर्धमातृका ब्रह्मरंध्रापर्यंत चढाई समाधि समाधीची व्याप्ती समाधि-अवस्था-प्रकार नामस्मरणानुसंधान नामापाशी ईश्र्वर नाममहिमा कर्कोटक कथा कर्कोटक कथा निंदकामुळेंच साधुची मळशुद्धि साधूंस तळमळ यातिवंशाचा संबंध नाहीं वादिक भक्त दुकाळे साधू सोंवळें-ओंवळेपण शुद्ध वैराग्य हरिनाम श्रवण राम कोणता? - श्रावणकथा ईश्र्वर एकच कलियुगधर्म कलंकी अवतार ईश्र्वर निवाडा यमयातना-जीवास दंड सृष्टि-प्रलय ग्रंथसमाप्ति ग्रंथलेखनकाल प्रसंगसमाप्ति प्रसंग अठरावा - नाममहिमा श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत नाममहिमा Translation - भाषांतर इतुकें ऐकतां उत्तर । नारदें विणा सजिला साचार । मांडिला हरिकथेचा गजर । भाव धरूनियां ॥७९॥हरि म्हणे नारदा ऐके वचन । जेथें माझ्या नामाचा घोष संपूर्ण । तेथें मी तिष्ठत उभा जाण । कर जोडूनियां ॥८०॥यागदानाच्या करितां कोडी । तुका न ये नामघोषाची परवडी । प्रेमेंकून म्हणितलें पाहिजे आवडी । भाव धरूनियां ॥८१॥साधे तुळापूर तीर्थ व्रत । अनेक उग्र तपाची करितां मात । परी नामघोषाविण स्वहित । होयसा उपाव नाहीं ॥८२॥मेरुसारख्या जोडिती तपाच्या कीर्ति । तरीच सद्गुरुकृपा होय पुरती । हृदयीं उमटोन पूर्णता पुरती । वैखरी नामघोषीं ॥८३॥इतुकें ऐकोनियां श्रीवचन । मग शेख महंमद प्रेम उन्मन । म्हणे नलगे वैकुंठ भुवन । मज भक्ति द्यावी ॥८४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP