मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
सोंवळें-ओंवळेपण

प्रसंग अठरावा - सोंवळें-ओंवळेपण

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


संतांपुढं जाणीवेची वेलांडी । हे तंव नरिये भोगावयाची जोडी । भावभक्ति भवबंधन तोडी । शरण रिघाल्‍या ॥१९२॥
सद्भाव तोचि ब्रह्मीची कळा । प्रेमसुगंध आवडे राउळा । उपाव नाहीं बोध भक्ति वेगळा । अविनाश जोडे ऐसा  ॥१९३॥
मी एक सोंवळा जन ओंवळें । ऐसें उमटें जेणें काळें । तें आपणा विटाळ ओंवळें । कर्मिष्‍ठाचें ॥१९४॥
पंक्तिभोजनाचा अवसरा । जरी एकासी जाला उलट ओकारा । तरी समस्‍तांस मळमळीं विचारा । तदन्यायें हळहळी विटाळ ॥१९५॥
आंघोळी करून बैसला राउळीं । महा सुख वाटे तयेवेळी । तैसें शुचि असावें शिष्‍यें अमंगळीं । तरीच निर्धारी सोंवळा ॥१९६॥
मागे संग्राम जो सांगितला । तो शूरत्‍वें ज्‍यानें केला । तोचि अखंड सोंवळा राहिला । गारेंत पावक जैसा ॥१९७॥
गार टाकिल्‍या तस्‍कानाभीतरीं । पावक सोंवळा विझे ना अद्यापवरी । तैसा देहसंग्रामीं विचारीं । शुचिपणें असें ॥१९८॥
ऐसें जालें नसतां योग करी । तो जाणा खोज्‍या संवरा थेरकरी । असो वनीं अथवा घरबारी । कपटपणें ॥१९९॥
लाखाळी ज्ञान असे घरोघरीं । एक सांगे एक वाखाणी परोपरी । परी विश्र्वास न राहे क्षणभरी । प्रेमबोधासंगें परियेसा ॥२००॥
जैसी लाख नेतां उबेजवळी । पाघळोन होय कोंवळी । मागुती करितां उबेवेगळी । राठावोनि मोडे ॥२०१॥
वक्ता वैराग्‍य उपदेश करी । तेव्हां म्‍हणे पुरे संसार श्रीहरि । उठोनि घरास गेल्‍या उपरी । राठावे लाख जैसा ॥२०२॥
सदरेस मांजर बैसविले । अलंकार गंध धूपें डवरियेले । उदकुलें देखतां व्याकुळ जालें । तळमळित असे ॥२०३॥
सदर म्‍हणजे हरिकीर्तनवार्ता । मांजरन्यायें बैसे चंचल श्रोता । उदगुळ तैशी देखे कांता । वीर्य व्याकुळ पडे ॥२०४॥
येणें न्यायें पाहोन हरिकथा । व्यर्थ जाय ऐकतां तत्त्वतां । पुढें सांगतों खुणा आतां । शेख महंमदीं परियेसा ॥२०५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP