मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
प्रसंगसमाप्ति

प्रसंग अठरावा - प्रसंगसमाप्ति

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


आता प्रसंग तो अठरावा सुरस । जैस वैकुंठीचा मोक्ष कळस । भक्तिज्ञान वैराग्‍यरसांची मूस । मस्‍तकीं शोभत असे ॥३२३॥
अठरावा गुणातीत आत्‍माराम । बारासोळांशीं घेतला वैकुंठी विश्राम । कामक्रोधादिक असुरा तमाम । पराभवातें पावविलें ॥३२४॥
ऐसा विश्रांतीचा पूर्ण सागर । आत्‍माराम अविनाश दिगंबर । योगी जपताती निरंतर । अठरावा अविनाशु ॥३२५॥
ऐसा ब्रह्मांडनायक आदिपुरुष । ब्रह्मरसाचा आत्‍मकळस । ऐसा तो महा तेजाचा प्रकाश । योगियाहृदयीं वसतसे ॥३२६॥
तेथें कैंचा बारा सोळा नव रस । आत्‍माराम स्‍वयं प्रकाश । सैय्यद महंमदीं सावकाश । सम चिन्हाकार असे ॥३२७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP