मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
शुद्ध वैराग्‍य

प्रसंग अठरावा - शुद्ध वैराग्‍य

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


गळ टाकूनि नदीभीतरी । पारधी बैसलासे बाहेरी । तत्त्व लाविलें हातीं धरूनियां दोरी । तैसें तत्त्व नामासी लावावें ॥२०६॥
जैसा बुका भोगित्‍यांनीं लाविला । पुडीचा कागद अमंगळीं पडला । परी त्‍याचा सुगंध नाहीं गेला । तैसें चंचलपण ऐकतां ॥२०७॥
सांगेन भावें ऐकिलिया काय जोडे । जैसीं पारध्यातें पारध सांपडे । कुटुंबासहित पोटांत पडे । आनंद वर्तोनियां ॥२०८॥
शुद्ध वैराग्‍येंकरावी कथा । सांडोनियां द्वैत दांभिक वार्ता । समस्‍त सभे श्रोत्‍यांची व्यथा । हरेल तेणें परियेसा ॥२०९॥
प्रेमें ने घे हरिनामाची जोडी । महाशब्‍दें संस्‍कार बडबडी । नट्या होऊनियां डोळे मोडी । मज्‍यालसीपुढें ॥२१०॥
डोळे मोडी खोबेजेला लाजे । भावें पहाती विषयाचे राजे । तों तों शीघ्र कल्‍पना माजे । वासनेसंगें ॥२११॥
श्रोत्‍यांचे मन धांवे दाही वाटा । वीर्य व्याकुळ भरे चेतनेचा ताठा । ऐसा न पाहिजे केला व्यापार मोठा । हरिकथेमाजी ॥२१२॥
शेख महंमद मुसलमान । बोलिले हरि जोडे ऐसी खुण । तुम्‍ही सांडूनियां अवगुण । भावें कथा करावी ॥२१३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP