TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
त्रिकुट ते श्रीहाट कूच

प्रसंग अठरावा - त्रिकुट ते श्रीहाट कूच

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


त्रिकुट ते श्रीहाट कूच
मन आरबी तेजी थोरवट थोर । सत्‍वर चढला त्रिकुट शिखर । तेथें अनुहातें दणत्‍कार । गजर वाद्यांचा ॥२५॥
मग तेथें स्‍थिरावला नाद भेद । सकळहि खंडला अनुवाद । सच्चिदानंदी ब्रह्मानंद । सर्व सामावला ॥२६॥
ओळखा त्रिकुट शिखरीं वक्षरीं । आचार लिंग जागृतीच्या घरीं । प्रसिद्ध हे टीका अवधारी । योगेश्र्वरा ॥२७॥
इडा आणिक पिंगळा सुशुम्‍ना । पुढां तेजी ढकलला सत्‍य जाणा । सावध उजेड उन्मनि मैदाना । उभा केला ॥२८॥
मग तेथून श्रीहाट गुरु लिंग । आप तत्त्व मध्यमेचा सांग । बुबुळेंविण देखिला नाना रंग । स्‍वानुभवाचा ॥२९॥
मग तेथें रवि शशि स्‍थिरावले । पहातां हे लोचन मावळले । शब्‍द निःशब्‍द होऊनि गेले । अनुर्वाच्ये ॥३०॥
गोल्‍हांटी तेज शिवलिंग पूजा । सामवेद शंकर ऐका वोजा । ह्याहि खुणा सांगतो सहजा । परउपकारालागीं ॥३१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:25.8730000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

विभूती

  • स्त्री. १ भस्म ; रक्षा ; राख ; अंगारा . होऊनि जंगम विभूती लाविती । शंख वाजवीती घरोघरीं । - तुगा २८३१ . २ ऐश्वर्य ; तेज ; शोभा ; यश ; कीर्ति ; भव्यता . नाना विभूति छंद बंद । नाना खाणी - दा १६ . ४ . १९ . करित असति जीच्या निर्विकल्पा विभूती । - सारुह २ . ८९ . ३ अणिमादि अष्टसिध्दि . ४ ईश्वरांश ; महापुरुष ; ऐश्वर्यवान् ‍ पुरुष ; पुण्य . पुरुष . येथ विभूती प्रतिविभूती । प्रस्तुत अर्जुना सांगिजेती । - ज्ञा १० . ४१ . [ सं . ] म्ह० विभूतीचें मूळ रेडयाचे गांडींत - अनेक ऐश्वर्यवान् ‍ व्यक्तीहि मूळच्या गरीब स्थितींतील असतात . 
RANDOM WORD

Did you know?

Why are you transliterating?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site