TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
आवारांत रसज्ञ लोक फिरती, ...

तुटलेले दुवे - आवारांत रसज्ञ लोक फिरती, ...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


तुटलेले दुवे
आवारांत रसज्ञ लोक फिरती, कोठे मुलें खेळती;
घासाधीसच घालिती सुवसना कोठे दुकानांतुनी;
कोठे होय पुराण, शून्य हृदयें बाया तिथे बैसती;
गाभार्‍यांत शिरूइ दर्शन तशा दाटींत घेती कुणी.
द्दश्यें हीं बघुनीहि ज्यास अगदी वाटे न कौतूहल
ऐसा ऐकिकडेस तो कुणिपहा पारावरी बैसला,
वीजेचा न तिथे प्रकाश, विरले अन्धार तो निश्चल,
हाकारी न तया कुणी, प्रभुपदीं तो रङगला ऐकला.
लाभे गे मज हीच शान्ति तुझिया रथ्यांतही सुन्दर,
दों पक्षांस अशोक गार हिरवे पाचू महामोल की !
सदगन्धी कडुनिम्ब मोहरूनि हो, येऊ कुऊचा स्वर,
- सारें ओळखिचें कसें मज जरी कोणी क्चचित ओळखी !
अन्तीं दे मज हीच शान्ति तुझिया आलिङगनीं निर्भर;
आहे का परि टाकिली जननि, मीं कीर्तीत तूझ्या भर ?

२३ मार्च १९३५

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:50:27.7630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अंत्रपुच्छदाह

  • पु. एक रोग ; अंत्रपुच्छ ( अपेंडिक्स ) ही एक लांबट व अरुंद अशी जंताकृति नळी आंतड्यापासून निघालेली असते , हिच्या पोकळीत दाह , सुज अगर पू होऊन होणारा रोग . ( इं ) अपेंडिसाइटिज . ( सं . अंत्र + पुच्छ + दाह ) 
RANDOM WORD

Did you know?

मृतव्यक्तीच्या तेराव्याच्या जेवणात कोणकोणते पदार्थ करतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.