मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
दावावें अबलेस तू बळ तुझें...

तुटलेले दुवे - दावावें अबलेस तू बळ तुझें...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


दावावें अबलेस तू बळ तुझें मुर्दाड मर्दा ? पहा,
द्यायाचा तिज हात तो ऊलट तू भार्येवरी टाकिशी ?
ही देवी, हिज दत्त वस्तु गणुनी देशी सुखें ताप हा;
आणि ‘श्रीगुरुदेव दत्त !’ म्हणुनी देवकृपा भाकिशी !
होऊना वर हात, भग्न करितां मूर्ती कुणी देऊळीं,
होऊना वर हात, लाजहि कुणी घेतां सतीची पथीं,
देतां लाथ तुला वरिष्ठ न हृदीं तें रक्त तापे मुळी -
सुल्तानी सगळी घरांतच तुझी, अन आर्यपन्तीप्रती !
देशी प्रीति तिला, स्वतन्त्र वश हो पैक्यास जी चेटकी,
घेशी हीस विवाहबद्ध म्हणुनी सौभाग्य लत्तेंत की !
घेशी काळजि झाडणीपरि हिची - वा आर्यसंसार वा !
दासी होऊनि व्हा न दासजननी ! हे मर्द मर्दायला
देवीनो, कलिकालिका प्रखर व्हा, ल्या रुण्डमाळा गळां.

१२ डिसेम्बर १९३०

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP