मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
हल्ले होऊनि चोरटे जन किती...

तुटलेले दुवे - हल्ले होऊनि चोरटे जन किती...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


हल्ले होऊनि चोरटे जन किती जाती बिचारे जिवें !
पाठीमागुनि मारण्यांतच सुरे सारें दिसे पौरुष,
ते संरक्षक दुर्बलांस बघती हाणावया अङकुश,
आहे ऐकच देश, मानवपणा चित्ता कुणाच्या शिवे ?
होऊ ती अमरावती यमपुरी पन्नास कोसांवरी,
तेथे काफिररक्तपातच रुजू वाटे खुदाच्या पुढे;
नाना देव पुजूनि हिन्दु मरुनी जाती खुळे बापुडे -
हे आहेत असङख्य, मारुनि किती माराल यांना तरी ?
कुवृत्त श्रवणीं पडे, पडुनिही या वाद्यकोलाहलीं
जो तो ‘मङगल सावधान’ गजरीं झिडगे, नसे सावध;
तेथे निर्बळ धर्मबन्धु अमुचे, होऊ तयांचा वध -
येथे तों सुमुहूर्त, आज तिनशें लग्नें म्हणे जाहलीं !
लागे हिन्दुस ऐक घाव तर ये लक्षावधींना कळ,
ऐक्यावीण अशा वृथाच जगतीं निर्जीव सङख्याबळ !

२९ में १९३२

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP