मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
छे ! तें काय विचारितां ? ...

तुटलेले दुवे - छे ! तें काय विचारितां ? ...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


छे ! तें काय विचारितां ? खचित हृत्स्पशीं असे लेख हा.
हा स्वादिष्ट असेल सौम्य तरिही आता न चाले चहा, -
काजूलाडु नको, नकोच चिवडा, कां त्रास देतां फुका ?
झाले सर्व यथेच्छ, काय ? ऊठुनी येथूनि मी जाऊं का ?.
बाकी, ऐकच बैठकींत लिहिलीं पन्नास पानें अशीं ?
सार्‍यांना रडावील मोहवुनिया आहे कला ही कशी !
“- तो पुष्पासम शुद्ध आण हळवा - तें श्रीश्वरी वैभव -
न्यायाचा तंव खून होय, सजवी हें पुष्प त्याचें शव ?”.
ही काव्यात्मच कल्पना. - “पण ऊरे मागे तयाचें यश ?
आधी ऊस निघे पिळूनि मग या लोकांस लाभे रस” -
तो मेला सुटला, कुणास सुटला आहे जगीं मृत्यु हा ?
यासाठी रडतात लोक - अपुली ठेवील कोण स्पृहा ?
यासाठी मिळतील तींच म्हणतां घ्यावींत नाना सुखें.
पेठाहा कुठला ? असें ? गृहिणिने केला घरीं कौतुकें ?

४ जानेवारी १९१८

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP