TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
येथे मी शिकलों तसा विहरलो...

तुटलेले दुवे - येथे मी शिकलों तसा विहरलो...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


तुटलेले दुवे
येथे मी शिकलों तसा विहरलों निश्चिन्त शस्याङगणीं,
वेगें जात कसे मनोरथ तदा, लागे कशी लागणी.
विद्यार्थी किति शेकडों समवयी, ते स्नेह ते मत्सर,
गेला तो मधुकाल लोटुनि तया गेले किती वत्सर !
आता ओळखिचा क्कचित कुणि दिसे सन्मान्य अध्यापकीं
वस्तू याजड लाविती टक परी स्नेहाळ  अद्याप की;
गेलें हाय कितीक तें बघुनिया वैषम्य वाटे मना;
आहे हें ऐरलें बघूनिहि परी हो गोड संवेदना.
नाना आठवणी फिरूनि पहिल्या काढूनि होतों श्रमी,
वाटे तोंच असे ऐथे अजुनिही हाबाल मी, मुक्त मी,
लोकांनी स्थळ हें जरी गजबजे ऐकान्त येथे मला,
भूताची सगळी प्रभावळ मला वाटूं न दे ऐकला.
ही शाळा, मम जन्मभूइ मज ही वाटे जणू माऊली
येथे सर्व समोष्णशीतल रुचे - तें ऐन, ही साऊली.

२३ मार्च १९३४

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:50:27.7030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दिसतें तसें नसतें. म्हणून जग (मनुष्य) फसतें

  • अनेक वस्तूंचें स्वरूप जसें वरून दिसतें तसें अंतरंगांत नसतें यावरून म्हणतात. All that glitters is not gold. 
RANDOM WORD

Did you know?

shreeyantra siddha kase karave ?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site