मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
जाऊं शोधुं कुणीकडे नच कळे...

तुटलेले दुवे - जाऊं शोधुं कुणीकडे नच कळे...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


जाऊं शोधुं कुणीकडे नच कळे आता समाधान मी ?
सारें सोङग चहूकडे बघुनि हें होतों मनस्वी श्रमी.
केल्या क्षुद्र मनोज्ञ वस्तु परक्या देशांत कारागिरीं
त्यांना वापरण्यांत धन्य गणतों अन संस्कृती साजिरी.
ऐद्यानीं फुलपाखरें रुचे मिरवणें रङगेल नादावुनी;
नाही हें जर साधलें तरच त्या होती मनीं यातना,
आता मानवता समस्त बसली य़ेऊनि वेषांत ना ?
झाला हा परतन्त्र देश, म्हणतों ही योजना श्रीश्वरी !
आली दिव्य सुधारणा वसुमती पाश्चात्य की सुन्दरी ?
साङगे गाऊनि शान्तिपाठ जन हो, सौन्दर्य साधा स्वयें,
साधा हा नव शाक्त धर्म, घडुनी शुद्धार ये निश्चयें !
तें स्वातन्त्र्य कुठे ? पराक्रम कुठे ? तें ज्ञानसंशोधन ?
स्वार्थत्याग कुठे ? स्वकष्टपरता ? हो नष्ट चेतोधन.

७ डिसेम्बर १९३७

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP