श्रीगणेशाय नमः

॥ जोपरमसुखाचासागरु ॥ गोपालाश्रमरुपीसद्गुरु ॥ करीतत्कालदीनाचाउद्धारु ॥ गणाधीश ॥१॥

नित्यशुद्धबुद्धमुक्तनिर्विकारु ॥ सर्वोपाधिशून्यसर्वाधारु ॥ तोगोपालाश्रमरुपीसद्गुरु ॥ गणाधीश ॥२॥

जोपूर्णज्ञानाचादिनकरु ॥ निरसीअविद्याभ्रमअंधकारु ॥ तोगोपालाश्रमरुपीसद्गुरु ॥ गणाधीश ॥३॥

जोसंसारसागरींचातारु ॥ कोण्हासीनकळेत्याचापारु ॥ तोगोपाला० ॥ गणाधीश ॥४॥

ज्यालास्तवितांभागलाफणिवरु ॥ तयाचेंवर्णनमींकायकरुं ॥ तोगोपालाश्रमरुपीसद्गुरु ॥ गणाधीश ॥५॥

वेदांअवाच्यअसेपरात्परु ॥ केवळदयाघनपरमेश्वरु ॥ तो० ॥ गणाधीश ॥६॥

लीलाविग्रहीधन्यअवतारु ॥ जोनिजभक्ताकामकल्पतरु ॥ तो० ॥ गणाधीश ॥७॥

म्हणेगोसावीनंदनासावधान ॥ ऐकतुजसांगतोंब्रह्मज्ञान ॥ हेंपरमगौप्यबोलोंनयेजाण ॥ कोणापासीं ॥८॥

जोअधिकारीअसेलपूर्ण ॥ त्यासींउपदेशावेंब्रह्मज्ञान ॥ आतांअधिकारियाचेंलक्षण ॥ ऐकावें ॥९॥

अधिकारीम्हणोंनयेतयाला ॥ पूर्णअपरोक्षज्ञानजयाला ॥ जाणऐशाअत्यंतज्ञानियाला ॥ श्रवणकाय ॥१०॥

ज्याचानिः शेषसंशयफिटला ॥ सर्ववासनेचाक्षयजाला ॥ जाणऐशाअत्यंतज्ञानियाला ॥ श्रवणकाय ॥११॥

ज्याशरीरेंप्रवर्तावेंसाधनाला ॥ त्याशरीराचेंभाननाहींत्याला ॥ जा० ॥ श्रवणकाय ॥१२॥

ऐकावेंज्यापरमार्थाला ॥ तोअर्थरुपचिहोऊनिठेला ॥ जाणऐशाअत्यंतज्ञानियाला ॥ श्रवणकाय ॥१३॥

ज्याचादेहाभिमानगळाला ॥ विदेहपणेंस्वयेंसंचला ॥ जाण० ॥ श्रवणकाय ॥१४॥

आपणावांचूनिनेणेद्वैताला ॥ मिथ्याबंधमोक्षभ्रमगेला ॥ जाणऐशाअत्यंतज्ञानियाला ॥ श्रवणकाय ॥१५॥

स्वानुभवेंसमाधानपावला ॥ जोपूर्णब्रह्मानंदेंतृप्तजाला ॥ जाणऐ० ॥ श्रवणकाय ॥१६॥

जोपूर्णज्ञानेंजीवन्मुक्तसमर्थ ॥ तयालाश्रवणाचाकायअर्थ ॥ पैलपारजालियानौकाव्यर्थ ॥ जैसीबापा ॥१७॥

भोजनजलियापाककरणें ॥ ग्रामपावल्यामार्गचालणें ॥ तैसेंअत्यंतज्ञानियालाश्रवण ॥ व्यर्थकाय ॥१८॥

यास्तवअनधिकारीपूर्णज्ञानी ॥ आणिकामानयेअत्यंतअज्ञानी ॥ जयाआस्थावेदांतश्रवणीं ॥ उपजेना ॥१९॥

अत्यंतअज्ञानीम्हणसीकोण ॥ तरीत्याचेंहीसांगतोंलक्षण ॥ आतांएकाग्रकरुनियामन ॥ आयकावें ॥२०॥

मीदेहहेंचिज्यालादृढभान ॥ स्त्रीपुत्रादिकमाझींम्हणेभ्रांतीनें ॥ ऐसाअत्यंतअज्ञानीनव्हेजाण ॥ अधिकारी ॥२१॥

देहकवणाचामीकवण ॥ कोणचालकहेंनेणेआपण ॥ ऐसाअत्यंतअज्ञानीनव्हेजाण ॥ अधिकारी ॥२२॥

शरीराहुनीअसेंमीभिन्न ॥ अज्ञानेंबद्धहेंनाहींस्मरण ॥ ऐसा० ॥ अधिकारी ॥२३॥

आपलीबद्धताआणिमुक्ततापूर्ण ॥ हेदोन्हीनजाणेविचारहीन ॥ ऐसाअत्यंतअज्ञानीनव्हेजाण ॥ अधिकारी ॥२४॥

वेव्हारींबराअसेनिपुण ॥ कांहींनविचारीपापपुण्य ॥ ऐसाअत्यंतअज्ञानीनव्हेजाण ॥ अधिकारी ॥२५॥

पशुवतजडमूढमलीन ॥ केवलशिश्नोदरपरायण ॥ नेणेमुख्यदेवतोआहेकवण ॥ पूजीपाषाणातें ॥२६॥

ज्यालानावडेअध्यात्मश्रवण ॥ सदांसाधुनिंदाकरणें ॥ नाहींनम्रतागोडबोलणें ॥ दुर्व्यसनी ॥२७॥

ऐसाभ्रांतजालादेहाभिमानें ॥ दृष्टीसीनआणीसंतसज्जन ॥ जें कांहींवेदशास्त्रपठन ॥ पोटासाठीं ॥२८॥

प्राप्तजालियावैभव ॥ तेणेंचित्तींहोयमहागर्व ॥ लाभपूजाख्यातिगौरव ॥ इच्छीसर्वदा ॥२९॥

जेंकांहींकरीकर्माचरण ॥ तेंअवघेंदांभिकपण ॥ आपलीचप्रशंसाआपण ॥ बोलेकैसा ॥३०॥

आपणापुढें कोण्हीमांडूंदेइना ॥ ज्यालासज्जनाचाउत्कर्षसाहेना ॥ घातपातादिकदुर्वासना ॥ धरीचित्तीं ॥३१॥

जेणेंत्रासतीसकललोक ॥ ऐसीजयाचीवर्तणुक ॥ दुष्टकर्मावांचूनिआणिक ॥ नावडेकांहीं ॥३२॥

आपुलेगुणदोषनविचारी ॥ दुसर्‍याचेतत्कालप्रगटकरी ॥ कपटवसेजयाचेअंतरीं ॥ जैसामैंद ॥३३॥

दुसर्‍यासीदुःखजालियाविशेष ॥ तेंमानीपरमसंतोष ॥ हदयींनाहींदयेचालेश ॥ अणुमात्र ॥३४॥

द्रव्यदारायांचेंसदांध्यान ॥ संसारीआसक्तनिशिदिन ॥ अनेकविक्षेपजालियाहीजाण ॥ नमानीत्रास ॥३५॥

कांहींप्राप्तजालियाहोयसुख ॥ अप्राप्तीनेंमानीपरमदुःख ॥ निजात्मसाधनींविमुख ॥ अविचारें ॥३६॥

पडेकाम्यनिषिद्धकर्मप्रवाहीं ॥ त्यालाहिताहितउमजेनाकांहीं ॥ जन्ममरणादिदुःखाचेंनाहीं ॥ अनुसंधान ॥३७॥

मीधनवंतचालकशहाणा ॥ मजसारिखाकोणीअसेना ॥ यागर्वैकोठेंहीमावेना ॥ उताणाचाले ॥३८॥

म्हणेमीकुलिनमाझासदाचार ॥ तेणेंअंगींचढेताठाफार ॥ कोण्हीदेखोनिसज्ञानइतर ॥ करीद्वेष ॥३९॥

कांहींकेल्याज्याचेंमनद्रवेना ॥ परमकठीणजोसदांलवेना ॥ भल्याचीकरितसेहेळणा ॥ नानापरी ॥४०॥

प्राणीकाळाचेतोंडीपडती ॥ तेचिआहेआपणागती ॥ ऐसेंकांहींचस्मरेनाजोचित्तीं ॥ भ्रांतपणें ॥४१॥

तीर्थतपोवनेंजेसाधुसज्जन ॥ तेठाईनवजायआपण ॥ भ्रष्टपाखांडीकवेव्हारिकजन ॥ तेआवडती ॥४२॥

धरोनिफलाशामानसीं ॥ मगभजेनानादेवतांसी ॥ जयाचीनाहींकोणापासीं ॥ एकनिष्ठा ॥४३॥

सत्यमानोनीरा हेविषयसुख ॥ परमार्थसाधनींहोयविमुख ॥ हाचिजाणावाकेवळमूर्ख ॥ निश्चयेंसी ॥४४॥

ज्यालाप्रपंचींबहुतआदर ॥ परमार्थाचातिरस्कार ॥ संताच्याकरीनिरंतर ॥ रांडोलिया ॥४५॥

जन्माआलियागमाविलेंवय ॥ अकस्मातमृत्युनेईल निश्चय ॥ हेंकांहींचवाटतनाहींभय ॥ ज्याच्याचित्ता ॥४६॥

भरलारजतमोगुणें ॥ नाहींज्यापासींसात्त्विकलक्षणें ॥ आतांवाचेंकितीबोलावेजाण ॥ अवगुण ॥४७॥

ऐसाजोअत्यंतअज्ञानी ॥ आणिजीवन्मुक्तअत्यंतज्ञानी ॥ अधिकारीनव्हेतहेदोन्ही ॥ श्रवणासी ॥४८॥

नसेअपरोक्षअत्यंतज्ञान ॥ नाहींमूढत्वअत्यंतअज्ञान ॥ ऐसामध्यतोअधिकारीजाण ॥ याश्रवणीं ॥४९॥

ऐसेंसंक्षेपेंबोलेआपण ॥ गोपालाश्रमरुपीगजानन ॥ जोसद्गुरुसच्चिदानंदघन ॥ दयासिंधु ॥५०॥

ऐकूनदेवाचेंवचन ॥ संतोषलागोसावीनंदन ॥ मध्यस्थाचेंलक्षण ॥ सांगावेंजी ॥५१॥

म्हणूनिघातलेंलोटांगण ॥ मगआलिंगिलेंगजाननें ॥ म्हणेमध्यस्थाचेंलक्षण ॥ सांगोंआतां ॥५२॥

जोविधियुक्तबरावेदपढला ॥ जाणोनितयाच्याअर्थाला ॥ जैसेंबोलिलेंतैसेंकरुंलागला ॥ कर्माचरण ॥५३॥

याजन्मींअथवाजन्मांतरीं ॥ ऐसाअसावानिर्धारी ॥ येविषयींसंशयअंतरी ॥ नधरावा ॥५४॥

जोकाम्यनिषिद्धवर्जित ॥ आचरेचारींकर्मेविहित ॥ नित्यनैमित्तिकेंप्रायश्चित ॥ उपासना ॥५५॥

येणेंदूरकेलेदोषसकळ ॥ आणिसहजहोयचित्तनिर्मळ ॥ तेणेंसाधनचतुष्टयतत्काळ ॥ घडेत्यासी ॥५६॥

हेंसंक्षेपंसांगितलेंजाण ॥ आतांसविस्तरकरुंनिरुपण ॥ काम्यआणिनिषिद्धाचेंलक्षण ॥ आईकआधीं ॥५७॥

ज्योतिष्टोमादिकयागकरणें ॥ स्वर्गफलभोगइच्छूनियामनें ॥ हेंचिकाम्याचेंस्वरुपजाणणें ॥ निश्चयेंसी ॥५८॥

गांठींपुण्यस्वर्गवासतोंवरी ॥ पुण्यसरतांपतननिर्धारी ॥ ऐसेंजाणोनिसहजअंतरीं ॥ निष्कामहोय ॥५९॥

आतांऐकपापकर्मनिषिद्ध ॥ जेंब्रह्महत्यादिकप्रसिद्ध ॥ तें आचारतांनरकसिद्ध ॥ जोडेकैसा ॥६०॥

म्हणेयेणेंयमकरितसेदंड ॥ आणिकोणेंभोगावेंनरककुंड ॥ निषिद्धकर्माचेंकाळेंतोंड ॥ आचरेनामी ॥६१॥

येणेंहोइनासार्थकआपुले ॥ म्हणोनिकाम्यनिषिद्धवर्जिलें ॥ जेंनित्यनैमित्तकादिबोलिलें ॥ तेंचिकरी ॥६२॥

नित्यकर्मजेंप्रतिदिनींकरणें ॥ स्त्रानसंध्याअग्निसेवादेवतार्चनें ॥ पंचमहायज्ञादिकसंपादणें ॥ बरव्यापरीं ॥६३॥

नित्यकर्माहूनवाढेअधिक ॥ तयालाम्हणावेंनैमित्तिक ॥ तेंजातकर्मपर्वकालादिक ॥ आचरावें ॥६४॥

जेंनकरितांघडेप्रत्यवाय ॥ म्हणोनिसर्वथाटाकूंनये ॥ प्रायश्चित्तचांद्रायणादिकस्वयें ॥ तेंहिकीजे ॥६५॥

जेंप्राप्तजालियाविहित ॥ चांद्रायणादिकप्रायश्चित्त ॥ तेंआचरावेंअगत्य ॥ यथाविधीं ॥६६॥

जेंस्ववर्णाश्रमींकर्मउचित ॥ तेंआचरावेंफलहेतुरहित ॥ मगईश्वरार्पणकरावेंसमस्त ॥ नित्यादिक ॥६७॥

येणेंनासतीदोषसकल ॥ कैंचेंकामक्रोधादिकमल ॥ होयअंतःकरणनिर्मल ॥ सहजची ॥६८॥

तेव्हांपश्चात्तापपावेमन ॥ तेंचितयाचेंनिर्मळपण ॥ तेंस्थिरव्हावयाकारण ॥ उपासना ॥६९॥

गणेशदुर्गाविष्णुशिवतरणी ॥ हेपांचहीअभिन्नत्वेंसत्यमानी ॥ यांतरुपजेंआवडेलमनीं ॥ तेंचिंतावें ॥७०॥

अथवाकरावेंसद्गुरुचेंध्यान ॥ तेणेंहोईलनिश्चलमन ॥ याकारणेंबोलिलीसगुण ॥ उपासना ॥७१॥

नित्यादिकर्मेचित्ताचीशुद्धता ॥ उपासनेनेंहोयएकाग्रता ॥ म्हणोनिहेंआपुलियाहिता ॥ आचरे तो ॥७२॥

याहिवरीतोअधिकारीपूर्ण ॥ साधनचतुष्टयसंपन्न ॥ त्याचेंहीसविस्तरलक्षण ॥ सांगतोंमी ॥७३॥

आतांसाधनचतुष्टयआइक ॥ प्रथमनित्यानित्यवस्तुविवेक ॥ इहामुत्रफलभोगविरागदेख ॥ दूसरेंतें ॥७३॥

शमदमादिषट्कतृतीय ॥ चौथेंमुमुक्षुतानिश्चय ॥ ऐसेंहेंसाधनचतुष्टय ॥ जाणावेंगा ॥७५॥

नित्यम्हणिजेजेअविनाश ॥ आत्मरुपएकस्वप्रकाश ॥ अनित्यनाशवंतसर्वदृश्य ॥ देहादिक ॥७‍६॥

ऐसेंबरव्याप्रकारींजाणावें ॥ नित्यानित्यविवेकमानावें ॥ आतांदुसरेंसाधनस्वभावें ॥ सांगिजेला ॥७७॥

इहम्हणजेहालोक ॥ येथीलभोगराज्यादिका ॥ स्त्रियादिविषयअनेक ॥ तेनावडती ॥७८॥

अमुत्रम्हणजेस्वर्गलोक ॥ तेथीलविषयअमृतादिक ॥ तेहीअंतरींमानीसकळिक ॥ तृणप्राय ॥७९॥

काकविष्ठाविषवमिलेंजेंअन्न ॥ तैसेंदेखेंइहस्वर्गसुखजाण ॥ नाशिव्मतम्हणोनिआसक्तमन ॥ नव्हेकोठें ॥८०॥

ऐसेंजयालाउपजेवैराग्य ॥ तोचिजाणावापरमसभाग्य ॥ इहामुत्रफलभोगविराग ॥ याचि नांवें ॥८१॥

आतांशमदमादिषट्कसाधन ॥ शमदमउपरतिजाण ॥ तितिक्षासमाधानश्रद्धापूर्णं ॥ अनुक्रमें ॥८२॥

श्रवणादिव्यतिरिक्तजेविषय ॥ तेठाईमनजाऊंनये ॥ हाजाणावाअंतरइंद्रिय ॥ निग्रहतो ॥८३॥

सदैववासनात्यागकीजेनेम ॥ याचिनांवेंबोलिजेगाशम ॥ षट्कांतीलसांगितलेंप्रथम ॥ साधनहें ॥८४॥

बाह्यज्ञानइंद्रियेंकर्मैद्रियें ॥ याचेजेजेआहेतिविषय ॥ त्यापासूनियाविमुखताहोय ॥ ऐसेंकीजे ॥८५॥

इंद्रियेंधावतीविषयव्यापारीं ॥ तेथूनआवरावींझडकरी ॥ बाह्यइंद्रियनिग्रहनिर्धारी ॥ जाणबाह्यहा ॥८६॥

याजलाचिम्हणतीगादम ॥ हेंदुसरेंसाधनउत्तम ॥ आतांतिसरेंसांगोंनिरुपम ॥ उपरति ॥८७॥

जींसकलइंद्रियेंआपलीं ॥ विषयापासूनिफिरविलीं ॥ तींजाऊंनद्यावींतेस्थलीं ॥ पुनरपि ॥८८॥

भगवद्भजनींसदांलावावीं ॥ श्रवणादिसाधनेंगोंवावीं ॥ हेचिनिश्चयेंसीजाणावी ॥ उपरति ॥८९॥

स्ववर्णाश्रमधर्मीप्रवर्ततां ॥ नित्यनैमित्तिकादिकआचरतां ॥ तेथेंशीतोष्णबाधीतत्त्वतां ॥ सहावींते ॥९०॥

प्रारब्धेंसुखदुःकिहेंहोतीनिर्माण ॥ तींसोसूनिपरमार्थसाधन ॥ तयाचेंनांवतितिक्षाजाण ॥ साधनचौथें ॥९१॥

मनसर्वापासूनिउपरमिलें ॥ श्रवणादिसाधनींविनटलें ॥ तेणेंकरुनिपूर्णपावलें ॥ एकाग्रता ॥९२॥

याजलासमाधानम्हणावें ॥ षट्कांतीलपाचवेंजाणावें ॥ आतामसागेनसाधनसाहावें ॥ श्रद्धातुज ॥९३॥

सच्छास्त्रआणिसद्गुरुवचनीं ॥ रहावेंदृढविश्वासधरुनी ॥ याचिनांवश्रद्धासत्यमानी ॥ शेवटील ॥९४॥

हेंशमदमादिषङ्कजाणावेंबरें ॥ साधनचतुष्टयांतीलतिसरें ॥ आतांचौथेंऐकावेंआदरें ॥ मुमुक्षुता ॥९५॥

अज्ञानेंपावलोंसंसारबंधन ॥ यापासूनकेव्हांमुक्तहोईन ॥ ऐसीइच्छाउपजेनिशिदिन ॥ तेमुमुक्षुता ॥९६॥

केव्हांहोईलअपरोक्षात्मज्ञान ॥ तेणेंपावेनमीसमाधान ॥ ऐसीइच्छाउपजेनिशिदिन ॥ तेमुमुक्षुता ॥९७॥

केव्हांफिटेलअनादिअज्ञान ॥ आतांजाईनसद्गुरुसीशरण ॥ ऐसी० ॥ तेमुमुक्षुता ॥९८॥

म्हणेतापत्रयेंतापलोंपूर्ण ॥ यापासूनिमुक्तव्हावेआपण ॥ ऐसीइच्छाउपजेनिशिदिन ॥ तेमुमुक्षुता ॥९९॥

ऐसामुमुक्षुसाधनसंपन्न ॥ तोचिअधिकारीमध्यस्थजाण ॥ त्यासीतत्कालठसावेब्रह्मज्ञान ॥ उपदेशितां ॥१००॥

सर्वपदार्थज्ञानकळलेंज्याला ॥ म्हणेमीआहेंशरीरवेगळा ॥ ऐसेंजालेंपरीअज्ञानेंवेष्टिला ॥ असेबद्ध ॥१॥

सामान्यज्ञानेंमानीमीदेहातील ॥ अज्ञानेंम्हणेमीबद्धनिश्चित ॥ इकडेनातिकडेऐसाबहुत ॥ कष्टीहोय ॥२॥

जरीम्हणावाअत्यंतज्ञानी ॥ तरीतोविषयदोपदर्शनी ॥ आणिसाक्षात्काराविणेंनव्हेज्ञानी ॥ अत्यंततो ॥३॥

ज्यासकांहींज्ञानकांहीअज्ञान ॥ तोअधिकारीमध्यस्थजाण ॥ म्हणेमीपावलोंव्यर्थबंधन ॥ करुंकाय ॥४॥

जोअतिदक्षसाधनसंपन्न ॥ पूर्वपक्षाचेंकरुनिशोधन ॥ परोक्षज्ञानेंअपरोक्षतापूर्ण ॥ साधितसे ॥५॥

अनेकजन्ममरणावर्त ॥ त्यादुःखानुसंधानेंभयभीत ॥ तापत्रयेंसंतप्तइच्छित ॥ मोक्षासीजो ॥६॥

अग्निलागलाजयाचेमस्तकीं ॥ तोबुडोदेयाचालिलाउदकी ॥ त्यासीपदार्थनावडेआणखी ॥ दृष्टीपडतां ॥७॥

तैसात्रिविधतापेंजोतापला ॥ शीघ्रशरणजायस्तद्गुरुला ॥ कांहींगोडनवाटेतयाला ॥ अन्यविषय ॥८॥

धर्मार्थकाममोक्षअभिधानें ॥ हेचारीपुरुषार्थप्रसिद्धजाणा ॥ यांतमुख्यमोक्षतोब्रह्मज्ञानें ॥ प्राप्तहोय ॥९॥

हेंजाणोनिकरीवेदांतश्रवण ॥ अन्यशास्त्रींसहजउदासीन ॥ ज्यासद्गुरुवाक्यींविश्वासपूर्ण ॥ तोचिमध्यस्थ ॥११०॥

म्हणेमोक्षनव्हेसद्गुरुरहित ॥ ऐसेंकळतेंमजनिश्चित ॥ आतांशरणजावेंत्वरित ॥ तयालागीं ॥११॥

उपदेशीलतोब्रह्मज्ञान ॥ तेणेंनिरसेलअनादिअज्ञान ॥ मगकैचेंसंसारबंधन ॥ होईनमुक्त ॥१२॥

ऐसानिश्चयजयापाशीं ॥ तोचिअधिकारीपरियेसी ॥ पूर्णआस्थाहोयतयासी ॥ याश्रवणीं ॥१३॥

यासीविषयकदांनावडती ॥ साधुभजनींअत्यंप्रीति ॥ जेसांगितलीसाधनसंपत्ति ॥ तेजयापाशी ॥१४॥

ऐसेंऐकोनदेवाचेंवचन ॥ मगविनवीगोसावीनंदन ॥ म्हणेअधिकारियाचींलक्षणें ॥ सांगितलींजी ॥१५॥

त्यांतीलएकहीनाहींमजपाशी ॥ केवळजडमूढमीनिश्चयेंसी ॥ कैसाअधिकारीहोईनज्ञानासी ॥ आशंकाहे ॥१६॥

परिसोनभक्ताचेंवचन ॥ गोपालाश्रमगजानन ॥ म्हणेअनेकजन्मींचींसाधनें ॥ फलतीजें ॥१७॥

तेणेंअंगींसाधनेंनदिसतां ॥ अकस्मातउपजेमुमुक्षुता ॥ सद्गुरुसीशरणजावेंआतां ॥ ऐसेंवाटे ॥१८॥

जंवमुमुक्षतानाहींज्यापाशीं ॥ तंवश्रमचिअवघानिश्चयेंसी ॥ क्षुधेविणसामुग्रीजैसी ॥ वांयाजाय ॥१९॥

जोसद्गुरुशीरिघालाशरण ॥ तोचिसकलसाधनसंपन्न ॥ अधिकारियाचेंमुख्यलक्षण ॥ हेंचिबापा ॥१२०॥

त्यापरीतुझाभावदेखिला ॥ ज्ञानउपदेशकरावातुजला ॥ म्हणोनिअंतरीउपजला ॥ ऐसाहेतु ॥२१॥

अधिकारीमुमुक्षुतोचिसच्छिष्य ॥ त्यासीब्रह्मज्ञानाचाउपदेश ॥ सद्गुरुनेंकरावाअवश्य ॥ तत्कालेंचि ॥२२॥

गुरुआणिशिष्याचेंलक्षण ॥ त्याचेंहिकरीजेलनिरोपण ॥ श्रवणेंकरोनिसमाधान ॥ पावशील ॥२३॥

ऐसीऐकोनसद्गुरुवाणी ॥ मगगोसावीनंदनत्याक्षणीं ॥ म्हणेजेंहोतेंमाझेंमनीं ॥ तेंचिवदलेंति ॥२४॥

संपलेंतृतीयप्रकरण ॥ जेथेंअधिकारियाचेंलक्षण ॥ बोलिलागोसावीनंदन ॥ यथामतीं ॥१२५॥

इतिश्रीज्ञानमोदकग्रंथेगणेशगोसावीनंदनसंवादे अधिकारीनिरोपण नाम तृतीयप्रकरणं समाप्तम् ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 28, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP