श्रीगणेशायनमः

॥ आतांसंतासींनमस्कार ॥ जेपूर्णकृपेचेसागर ॥ करितीदीनांचा उद्धार ॥ निजसामर्थ्ये ॥१॥

कायावाचाआणिमन ॥ जयांसीगेलियाशरण ॥ तत्काळपाविजेपूर्ण ॥ परब्रह्म ॥२॥

केवळआनंदाचियामूर्ती ॥ जेज्ञानविज्ञानचक्रवर्ती ॥ त्यांपुढेबोलावयास्फूर्ती ॥ कैंचीमज ॥३॥

त्यांहीज्यालाआपुलेंह्नणविलें ॥ त्याचेंभलतसेंवाटेचांगलें ॥ त्यांसीभक्तीनेंजेंअर्पिलें ॥ तेंस्वीकारिती ॥४॥

हेंअंतींबरवेंकवळलें ॥ म्हणोनिनिभर्यमनजालें ॥ सहजचिबळदुणावलें ॥ बोलावयासी ॥५॥

मीकेवळआहेंबुद्धिहीन ॥ परिसंताचीआज्ञाप्रमाण ॥ त्यांच्यासामर्थ्येनिरुपण ॥ करुंकांहीं ॥६॥

जाणूनिसद्गुरुचाअंकित ॥ सहजकृपाकरितीलसंत ॥ ऐसाचितींवाटतोबहुत ॥ भरंवसा ॥७॥

त्यांचेंत्यांचेंपुढेंबोलतां ॥ कायसांकडेंमजआतां ॥ अवघीत्याकृपेचीसता ॥ वदवीतसे ॥८॥

देवभक्तांचासंवाद ॥ जेथेंकेवळब्रह्मानंद ॥ तोऐकतांविशद ॥ फिटेभ्रांति ॥९॥

केवळमंगळमूर्तीप्रति ॥ गोसावीनंदनकरीविनंती ॥ तेसावधहोऊनियाश्रोतीं ॥ परिसावीं ॥१०॥

म्हणेश्रीगणेशगोपाळाश्रमा ॥ स्वामीसद्गुरुकैवल्यधामा ॥ कृपाकरुनिसंसारभ्रमा ॥ निवारावें ॥११॥

संसारबंधनींमींपडलो ॥ तेणेंअत्यंतदुःखापावलों ॥ म्हणोनिशरणआलों ॥ तुजलागीं ॥१२॥

आपुल्याभजनींलावावें ॥ संसारावेगळेंकरावे ॥ हेंचिकृपाक रुनिद्यावें ॥ देवामज ॥१३॥

गणेशातुझियाभजनाविना ॥ नावडतीविषयभोगनाना ॥ यांच्यासंगेंसुखउपजेना ॥ अणुमात्र ॥१४॥

देवामीपरमअपराधी ॥ पावलोंबंदिशाळादेहबुद्धी ॥ तृष्णाशृंखळादयानिधि ॥ पडलीपाई ॥१५॥

कामक्रोधादिकमोकळ ॥ भोंवतालेदुष्टचांडाळ ॥ इकडेतिकडेएकपळ ॥ हालोनेदी ॥१६॥

भ्रांतिगर्तेमध्येंघालिती ॥ आधिव्याधिफोकाटयामारिती ॥ नानाकर्मभोगपाशींबांधिती ॥ बळकट ॥१७॥

लोटतीविक्षेपदगडावरी ॥ तेणेंचूर्णमीजालोंभारी ॥ चौर्‍यांशीलक्षदारोदारीं ॥ फिरविती ॥१८॥

विषयकुसंगींबैसविती ॥ कांहींउपजेनाविश्रांती ॥ रात्रंदिवसलागलीचित्तीं ॥ तळमळ ॥१९॥

ऐशादारुणसंसारयातना ॥ आतांमजलासोसवेना ॥ कोणनिरसीलगजानना ॥ तुजवीण ॥२०॥

आपुलाअन्यायबोलूंकिती ॥ जरीतुझीसेवामजघडती ॥ तरीकष्टीकांहोतोंगणपती ॥ जन्ममरणें ॥२१॥

तुझेंनामपतितपावन ॥ बोलतीवेदशास्त्रेंपुराणें ॥ म्हणोनिआलोंशरण ॥ तुजलागीं ॥२२॥

भवबंधनापासोनआतां ॥ मुक्तकरावेंभगवंता ॥ हेंचिमागणेंसद्गुरुनाथा ॥ गणाधीशा ॥२३॥

ऐसेंनिजभक्ताचेंवचन ॥ ऐकोनिसद्गुरुगजानन ॥ अंतरींकळवळलापूर्ण ॥ दयासिंधू ॥२४॥

म्हणेमाझानिजभक्त ॥ जाणूनिअनुतापयुक्त ॥ आतांकरीनतुजमुक्त ॥ क्षणमात्रें ॥२५॥

जेणेंतुटेलसंसारबंधन ॥ ऐसेंसांगेनब्रह्मज्ञान ॥ तेणेंपावशीलसमाधान ॥ निश्चयेंसी ॥२६॥

जेंकेवळश्रुतिशास्त्रांचेंसार ॥ सर्वसाधनाचेंविश्रांतिघर ॥ त्याचीप्राप्तिजालियासंसार ॥ कैंचामग ॥२७॥

उपदेशिलेंतुझ्यापूर्वजांसीं ॥ मुरारीविनायकगोसांवियासीं ॥ तेंमींसांगतोंतुजपासी ॥ ब्रह्मज्ञान ॥२८॥

गणेशपुराणीगणेशगीतेसी ॥ उपदेशिलेंवरेण्यराजासी ॥ तेंमीसांगतोतुजपासी ॥ ब्रह्मज्ञान ॥२९॥

वारीजन्ममृत्युजराव्याधीसी ॥ निरसीनानादुःखेदोषासी ॥ तेंमीसांगतोंतुजपासी ॥ ब्रह्मज्ञान ॥३०॥

तोडीसंसारबंधनासी ॥ जेणेंपावशीपरमसुखासी ॥ तेंमीसांगतोंतुजपासी ॥ ब्रह्मज्ञान ॥३१॥

सर्वतीर्यस्त्रानाच्यापुण्यराशी ॥ जेणेंजोडशीलरेनिश्चयेंसी ॥ तेंमीसांगतोंतुजपासी ॥ ब्रह्मज्ञान ॥३२॥

पृथ्वीदानाचेंफळयेताहातासी ॥ असंख्ययज्ञघडतीअनायासीं ॥ तें मीसांगतोंतुजपासी ॥ ब्रह्मज्ञान ॥३३॥

तेहतीसकोटीदेवसंतोषी ॥ जेणेंउद्धरेसर्वपितृराशि ॥ तेंमीसांगतोंतुजपासी ॥ ब्रह्मज्ञान ॥३४॥

जेणेंपूज्यहोसीत्नैलोक्यासी ॥ ज्याचामहिमानकळेकोणासी ॥ तेंमीसांगतोंतुजपासी ॥ ब्रह्मज्ञान ॥३५॥

ऐसें सद्गुरुगणेशाचेंवचन ॥ ऐकोनियागोसावीनंदन ॥ पावूनिपरमसमाधान ॥ लागेचरणा ॥३६॥

म्हणेजयजयसर्वोत्तमा ॥ सद्गुरुगोपाळाश्रमा ॥ जाणविलाब्रह्मज्ञानमहिमा ॥ अद्भुतजी ॥३७॥

आतांब्रह्मज्ञानप्राप्तिकरावें ॥ संसारापासोनिसोडवावें ॥ ऐसेदेवाप्रतिभक्तिभावें ॥ विनवितसे ॥३८॥

संपलेंद्वितीयप्रकरण ॥ ज्यामध्येंअनुतापनिरुपण ॥ तेंचिबो लिलागोसावीनदन ॥ यथामतीं ॥३९॥

इतिश्रीज्ञानमोदकग्रंथे गणेशगोसावीनंदनसंवादे अनुतापनिरुपणंनामद्वितीयप्रकरणंसमाप्तम् ॥२॥ ओंवीसंख्या ॥३९॥

श्रीगजाननार्पणमस्तु ॥ ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 28, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP