निरंजन माधव - औदार्यवर्णन

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


औदार्य गणितां सुराग अथवा चिंतामणी नंदिनी

ते तों हीन तुझ्या गुणांसि समता कैं पावती चिन्मणी ! ।

रामा ! ते गुणलेश पाउनि तुझा लोकांत या श्लाघती

तूं औदार्यसुधाब्धि ते कण तसे येनाति साम्पस्यितां ॥६६॥

नेसावीं वल्कलें तीं फळ जळ नुसधें भक्षणें वृक्षमूळीं

वस्ती शाखामृगांसी निशिदिवस पहा संग या कष्टकाळीं ।

लंका ते कांचनाची जिणुनि दशमुखा संकटें प्राप्त झाली

ते दिल्ही सेवकातें रघुकुलतिलका ! तूंचि औदार्यशाली ॥६७॥

दिल्हें विभीपणातें सहज पद तुवां हेळणेनें दयाळा

ते तों ब्रह्मादिदेवां दशशिरहवनें नेदवे रावणाला ।

ऐसें औदार्य तुझें त्रिभुवनिं विलसे जाणतां जो भजेना

वाहोनी हानि दूजी कवण असल तें राघवा ! जाणवेना ॥६८॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP