मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह २|
ब्रह्मज्ञान नव्हे लेंकुरा...

संत तुकाराम - ब्रह्मज्ञान नव्हे लेंकुरा...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


ब्रह्मज्ञान नव्हे लेंकुराच्या गोष्टी । तेथें व्हावा पोटीं अनुताप ॥१॥

दगडाहुनि जीव करावा कठीण । अंतरींचा शीण तेव्हां जाय ॥२॥

मेल्या मनुष्याची न धरिती आस । तैसा हो उदास संसारासी ॥३॥

तुका म्हणे येथें कराराचें काम । मग आहे राम जवळीच ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 19, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP