मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
आम्हां आनंद झाला आम्हां आ...

संत चोखामेळा - आम्हां आनंद झाला आम्हां आ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


आम्हां आनंद झाला आम्हां आनंद झाला । देवोचि देखिला देहामाजी ॥१॥

देखणें उडालें पाहणें लपालें । देवें नवल केलें देहामाजी ॥२॥

मागें पुढें देव रिता ठाव कोठें । ह्र्दयींच भेटे देहीं देव ॥३॥

चोखा म्हणे देव देखिला पंढरी । उभा भीमातीरीं विटेवरीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP