मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
भेदाभेद कर्म नकळे त्याचें...

संत चोखामेळा - भेदाभेद कर्म नकळे त्याचें...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


भेदाभेद कर्म नकळे त्याचें वर्म । वाउगाचि श्रम वाहतां जगीं ॥१॥

नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनीं । पाप ताप नयनीं न पडेचि ॥२॥

वेदाचा अनुभव शास्‍त्राचा अनुवाद । नामचि गोविंद एक पुरे ॥३॥

चोखा म्हणे मज कांहींच नकळे । विठ्‌ठलाचे बळें नाम घेतो ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP