मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
आजि दिवस धन्य सोनियाचा । ...

संत चोखामेळा - आजि दिवस धन्य सोनियाचा । ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


आजि दिवस धन्य सोनियाचा । जीवलग विठोबाचा भेटलासे ॥१॥

तेणें सुख समाधान झाली विश्रांती । दुजे नाठवती चित्तीं कांहीं ॥२॥

समाधानें जीव राहिला निश्चळ । गेले हळहळ त्रिविधताप ॥३॥

चोखा म्हणे आनंद वाटलासे जीवा । संतांचे पाय केशवा देखियेले ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP