TransLiteral Foundation

आर्य केकावली - २१ ते ४०

केकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.


आर्य केकावली - २१ ते ४०

संकट वारुनि रामा ! निजगुणकीर्तन करावया योजी ।

आपलिया थोरपणे रामा ! मजला स्वकिंकरी मोजी ॥२१॥

तू जरि न पावसी तरि पाचारू संकटांत मी कवणा ? ।

श्रवणारूढ करुनि हे विनती रक्षी मला पदप्रवणा ॥२२॥

सीतापते ! रघुपते ! विश्वपते ! भूपते ! वदान्यपते ! ।

इंद्रादिकीर्ति तुझिया कीर्तिपुढे तुच्छ सर्वथा लपते ॥२३॥

सोडविले सुर सारे रावणकारागृहांतुनी देवा ! ।

जे तत्सेव्यहि त्याची करीत होते तदाग्रहे सेवा ॥२४॥

देवस्त्रीही दासी केल्या होत्या दशानने दुष्टे ।

त्या सोडवूनि त्यांची चित्ते केली तुवांचि संतुष्टे ॥२५॥

गंधर्वी तुज गावे ते त्याणे लाविले निजस्तवना ।

तव नामधारकाते सोडविले त्वा करूनिया अवना ॥२६॥

त्वच्चरणार्चनतत्पर मुनि वनवासी दशाननत्रस्त ।

त्यास सुखविता जाला प्रभो ! तुजा अभयदानपटु हस्त ॥२७॥

त्वद्भक्त शुद्धकर्मा बिभीषण प्राज्ञ रावणे छळिला ।

येता शरण तुला, त्वा ह्रदयी स्वभुजि धरूनि आवळिला ॥२८॥

वाळीने स्त्री हरिली, मारिलही आपणासि या त्रासे ।

सुग्रीव शरण आला तुज, तो त्वां रक्षिला अनायासे ॥२९॥

ब्रह्मांदिकासि दुर्लभ पदरज ज्याचा अलभ्य तू ऐसा ।

शबरी वर्णादिगुने न बरी तिस पावलासि तू कैसा ? ॥३०॥

गुहनाम निषादपती स्वभक्तिसंपन्न त्यास बंधुपणे ।

त्वां मानिले दयाळा ! दासांचे नाशितोसि ताप पणे ॥३१॥

चरणविलोकनतत्पर वानर आप्तांत राघवा ! गणिले; ।

साधुद्वेषी जे जे कुळतरु त्यांचे समूळही खणिले ॥३२॥

गौतमपत्‍नी गिळिली होती जे पापतापशापाही ।

ते उद्धरिली जैसी, मज निजकरुणालवे तशा पाही ॥३३॥

रक्षोभीतीपासुनि गाधिजमख रक्षिला जसा राया ! ।

हो सिद्ध तसा संकट मज दीनाचेहि आज साराया ॥३४॥

दंडकवन खळ मर्दुनि निर्भय केले जसे प्रतापाने, ।

गतभय हा शीघ्र करी, जाला बहु विकळ विप्र तापाने ॥३५॥

आलो म्हणुनि शरण तुज, सहजदयेचाचि पूर्ण सागर तू ।

तुजविण कवणा ठायी तापोपशमार्थ आज सांग रतू ? ॥३६॥

तू बाप माय बंधू धणी सुह्रन्मित्र जानकीजाने ! ।

करुनि दया विलयाला अति सत्वर संकटास माजा ने ॥३७॥

श्रीरामा ! सुखधामा ! पावननामा ! स्वभक्तविश्रामा ! ।

कामारिगीतकीर्ते ! करुणामूर्ते ! नको त्यजू आम्हा ॥३८॥

रामा ! धाव, रघुपते ! धाव, विभो ! धाव, राघवा ! धाव; ।

कौतुक काय पहासी आळविता यापरी तुजे नाव ? ॥३९॥

नाव तुजे नावचि या संसारांभोधिला तरायासी, ।

ते ह्रदयी धरुनीही मी का अद्यापि सांग आयासी ? ॥४०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-08-19T01:01:01.3270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

वाजावाजवी

 • a  Proper, right, fit. 
 • वि. न्याय्य ; रास्त ; योग्य ; उचित ; आवश्यक ; मुनासब ; कायदेशीर ; उजु . ते करणे वाजीब व लाजिम आहे . - रा १० . २८० . [ अर . वाजिब ] वाजबमिति , वाजीबमिती - स्त्री . ज्या दिवशी विशिष्ट गोष्ट घडली किंवा घडावयाची ती दस्तऐवजांत नमूद केलेली मिति , तिथि , दिवस . वाजबुल - अर्ज - स्त्री . लेखी आज्ञा . वाजबुल अर्ज पातशहापासून दस्खत करुन मागितली . - दिमरा १ . ८६ . [ अर . वाजिबल अर्झ ] 
RANDOM WORD

Did you know?

आठ या संख्येला माया संख्या आणि नऊला ब्रह्मसंख्या कां म्हणतात?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,450
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,879
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.