TransLiteral Foundation

काव्यानंद

कवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.


काव्यानंद

दैत्यांनो ! न समुद्रमंथन, वृथा येथे बाळाची कथा

येथे वायुसुता ! हतप्रभ तुझी उड्डाणदर्पप्रथा.

होते अक्षमवेग यद्यपि जगच्चक्षो ! तुझे दर्शन

वाया केवळ वादपाटव न हे वाचस्पते ! वाग्रण.

येथे अद्‌भुतरम्य नित्य पडले स्फूर्तिप्रभेचे कडे,

अम्लान प्रतिभा-कळ्या उमलल्या आहेत चोहीकडे.

वोसंडे दुथडी भरूनि सरिता संकल्पना पावन

वृत्तींची रसलीन चंचळ खराश्रेणी करी क्रीडन.

सारीही जड इंद्रिये न शकती येथे प्रवेशावया

बुद्धिग्राह्य न वाव त्यास, न कळे ठाव प्रमाणत्रया.

वृत्त्यन्तर्गत टाकणे कठिणता, तद्रूपता पावणे,

काव्यानंदरसप्रसंग मग निस्संग संभोगणे !

Translation - भाषांतर
N/A

References :

कवी - बी


Last Updated : 2008-01-11T21:28:18.3730000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खाणे

  • क्रि. गिळंकृत करणे , जेवणे , तोंडात टाकणे , भक्षणे , सेवन करणे ; 
  • क्रि. सहन करणे , सोसणे ( मार ); 
  • क्रि. खर्च होणे , घेणे , फस्त करणे , लागणे ( घराने पैसा खाल्ला , त्याने माझा वेळ खाल्ला ); 
  • क्रि. काढायचे राहणे , गाळणे , सोडणे ( अक्षरे , चिन्हे ); 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

Why Cows are considered secred in Hinduism?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.