TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

क्षणभर

कवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.


क्षणभर

काटेरी वेलीचे जाळे

रठ्ठ चर्म, गाठांनी भरले;

अग्रावर पण निर्मळ ढवळे

होते एकच कुसुम विकसले !

कृष्ण निशा; अंबोधर घोर

ग्रसित करी गगनश्री सुंदर;

परंतु होती एक शिरावर

प्रसन्न तारा नयनमनोहर !

ते-ती असता एकएकटी

सुसह होय ती भयाण सृष्टि;

स्वर्गतिनिरयगतिप्रत्यय दे

जी एका समयावच्छेदे.

नित्य निराशेचे अवडंबर

जीर्णाशेचे जाल निरंतर,

करूनि तुज मन्मनी पुरःसर

व्यथित जिवा सुख देती क्षणभर !

Translation - भाषांतर
N/A

References :

कवी - बी


Last Updated : 2008-01-11T21:28:16.0000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अति गरीब आणि अति द्रव्यवान यांस बुद्धि देतां न घेत जाण

  • अतिशय गरीब मनुष्याला किंवा अतिशय श्रीमंताला जर आपण एखादी हिताची गोष्ट सांगितली किंवा सल्ला दिला तर पहिला, आपली हेटाळणी करतात असें समजून व दुसरा, आपल्या अभिमानानें त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीं. 
RANDOM WORD

Did you know?

How do I become a moderator on QnA?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site