मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कुसुमाग्रज|विशाखा संग्रह १| मूर्तिभंजक विशाखा संग्रह १ दूर मनोर्यांत हिमलाट स्वप्नाची समाप्ति ग्रीष्माची चाहूल अहि नकुल किनार्यावर अवशेष मातीची दर्पोक्ति गोदाकाठचा संधिकाल स्मृति जालियनवाला बाग जा जरा पूर्वेकडे तरीही केधवा मूर्तिभंजक कोलंबसाचे गर्वगीत आस बळी लिलाव पृथ्वीचे प्रेमगीत गुलाम मूर्तिभंजक ’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले. Tags : kusumagrajpoemकविताकुसुमाग्रज मूर्तिभंजक Translation - भाषांतर जगाचा गल्बला जगात सोडुन प्रेमाची मृणाल- बंधने तोडून- होता तो भ्रमिष्ट भ्रमत एकला नादात अगम्य टाकीत पावला वर्तले नवल डोंगर-कपारी गवसे प्रतिमा संगमरवरी ! हर्षाचा उन्माद आला त्या वेड्याला घेऊन मूर्ति ती बेहोष चालला, आढळे पुढती पहाड उभार वेड्याच्या मनात काही ये विचार थांबवी आपुला निरर्थ प्रवास दिवसामागून उलटे दिवस- आणिक अखेरी राबून अखण्ड वेड्याने खोदले मंदिर प्रचंड चढवी कळस घडवी आसन, जाहली मंदिरी मूर्त ती स्थापन ! नंतर सुरू हो वेड्याचे पूजन घुमते कड्यात नर्तन गायन रान अन् भोतीचे स्फुंदते सकाळी ठेवी हा वेलींना ना फूल, ना कळी ! विचारी आश्चर्ये तृणाला ओहळ कोण हा हिरावी रोजला ओंजळ ? परन्तु मूर्त ती बोलेना, हलेना, वेड्याचे कौतुक काहीही करीना ! सरले गायन सरले नर्तन चालले अखेरी भीषण क्रंदन पडून तिच्या त्या सुन्दर पायाशी ओरडे रडे तो उपाशी तापाशी ! खुळाच ! कळे न पाषाणापासून अपेक्षा कशाची उपेक्षेवाचून ! वैतागे, संतापे, अखेरी क्रोधाने मूर्तीच्या ठिकर्या केल्या त्या भक्ताने ! रित्या त्या मंदिरी आता तो दाराशी बसतो शोधत काहीसे आकाशी. वाटेचे प्रवासी मंदिरी येतात आणिक शिल्पाची थोरवी गातात. पाहून परंतू मोकळा गाभारा पाषाणखंडांचा आतला पसारा- त्वेषाने बोलती जाताना रसिक असेल चांडाळ हा मूर्तिभंजक ! N/A References : कवी - कुसुमाग्रज ठिकाण - माहीत नाही सन - माहीत नाही Last Updated : October 11, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP