मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निराकारी व एकतारी भजनीपदे|आत्मज्ञानी पदे| पद ८ आत्मज्ञानी पदे गण १ ला गौळण पद १ पद २ पद ३ पद ४ पद ५ पद ६ पद ७ पद ८ पद ९ पद १० आत्मज्ञानी भजनी पदे - पद ८ महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात एकतारी भजनी परंपरा आहे. Tags : bhajanekatarimarathipadएकतारीपदभजनमराठी पद ८ Translation - भाषांतर ऐक सुंदरी राजमंदिरी स्वप्न देखिले खटून । अशी वेडी झाले उठून ॥धृ०॥पहिल्या प्रहरी स्वप्न देखिले ऐक सखे सुंदरी । एक चक्र फिरे मंदिरी । त्यावर ॐ सोहं बैसून जाई कैलासमंदिरी । कथा समजा अवधारी । चाल ॥चवहाट बाजार भरला दश देह गुजरी । चौसष्ठ बावन बहात्तर पेठा गुलजारी । काही घेणार काही देणार जमले बाजारी । छत्तिस गुण शिपाई घालिति फेरी ॥अष्टपाकुळका चंचळ फिरती नारी । षड् विकार चोरटे विकल्प कारभारी । मनराजा राज्य करिती प्रवृत्ति बसली नटून । कशी वेडी० ॥१॥दुसर्या प्रहरी कारण देही एक नागीण चपळ । तिच्या डोक्यावर भरले तळ ॥त्या तळ्यामध्ये मासा फिरे अमुप रुप अमळ । बिन उदकाविण डळमळ ॥चाल त्रिकुट भुवनी । ब्रह्मदेव सावित्री बसली । ऋग्वेद अकार मात्रा ठसली । खेचरी भूचरी चाचरी अगोचरी फसली । स्त्रियाहट्ट चक्री विष्णु लक्ष्मी दिसली ॥उकार मात्रा यजुर्वेद असली । दश पवन काम करिती पिंडामधी झटून ॥कशी वेडी झाले उठून ॥२॥तिसर्या प्रहरी सखे पाहिले गोलहाट मंदीर । तेथे पार्वती शिवशंकर । मकार मात्रा सामवेद करी गायन सूर । छत्तिस रंगी प्रकार । चाल अलक्ष्यमुद्रा लावून शिव बसले ध्यानी । तेथे महावाक्य गायत्री ॐकार मुनी ॥प्रेम आसन घालुनी ओम् सोहं उठली ध्वनी । आला सप्तशून्याचा रस्ता त्याच ठिकाणी ॥शिवनामाची गर्जना होई चहूंकोनी । हे पाहून मसिं आनंद झाला प्रेमे गळा दाटून । क० ॥३॥चवथ्या प्रहरीं सहस्त्र दळावरी ज्ञानशुक्र उगवला । चौथी बहिणींनी दाविला ॥जागी झाल्यें भावविवेक वैराग्य बंधु भेटला । भेटतां आनंद वाटला ॥चाल अनंतसौख सखयाचें लागेना पार । द्वैत माझें निवाले खुललें अंतर ॥अंतराळी अभंग मोती भंगेना तिळभर । चरण वंदुनि निघाले बळें सख्याचें घर ॥अक्षय मोक्षपदीं झाले अमर । दत्त सावतळ प्रसन्न गुरु भीमराव तुरेकर ॥गणपत आत्मज्ञानीचीं कवनें चतुर घेईल पटून । कशी वेडी झालें उठून ॥४॥ N/A References : N/A Last Updated : March 27, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP