मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निराकारी व एकतारी भजनीपदे|आत्मज्ञानी पदे| पद ४ आत्मज्ञानी पदे गण १ ला गौळण पद १ पद २ पद ३ पद ४ पद ५ पद ६ पद ७ पद ८ पद ९ पद १० आत्मज्ञानी भजनी पदे - पद ४ महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात एकतारी भजनी परंपरा आहे. Tags : bhajanekatarimarathipadएकतारीपदभजनमराठी पद ४ Translation - भाषांतर गुरुला शिष्य प्रार्थितो सांगा मज ज्ञानमार्ग कपाट उघडा । गुरुराज महाराज दाविती आत्मज्ञान बिकट पगडा ॥धृ०॥मूळद्वारी गणपति पृथ्वीतत्त्व अपान प्राणाची वस्ती । स्थूळ देही लिंगी ब्रह्म ऋग्वेद आपतत्त्व व्यान प्राण अस्ती ॥सूक्ष्म देही विष्णूसमान प्राण तेज सुस्ती । यजुर्वेद बहात्तर नाडया कुंडलिनीत चढली सुस्ती ॥कारण देह शिवाचा सामवेद अनुहात चक्रि दुघडा । वायुतत्व तेणे प्राण वसे अन्न उदक मागे रगडा ॥१॥महाकारणी कंठी जीव असे आकाशतत्त्व उदान धरती । अथर्वण वेद कंठी सरले आता ब्रह्मांड यावरती ॥ज्ञानदेहमुखी असे धनंजय तेथे वायु रंग करिती । विराटदेह त्रिवेणी ब्रह्मदेह अकार मात्रा नाग काविं झुरती ॥श्रीहाटीं विष्णु उकारमात्रा कर्म हिरण्य चौघडा । उन्मनी निद्रा शयनी स्थिरावली महावाक्य घाली पगडा ॥२॥मायादेहास्त शिव असे अर्धि मात्रा बिंदू ओंकार अंतरी हंसला । दहावा पद्मदेह सहस्त्रदळी गुरुपुत्रास रस्ता दिसला ॥ओम् सोहम् इडा पिंगळा सुषुम्ना सप्तसुरि वाद्य बसला । दशदेही कर्मभुवन आटपला मोती टाकून धारिसी सुगडा ॥येथून पुढे वैकुंठभुवन कैलासी डोळा उघडा ॥३॥ज्या मार्गाने आलास त्या मार्गाचा रस्ता धर अजून । तेथे मनाचे काही ना चाले वेद शिणले शास्त्रे निजून ॥उरफाटी दृष्टी करुन कसुटी त्या रुपांत जाई पुजून । देव माझा मी देवाचा एकरुपी गेले रिझून । गुरुवाचून मार्ग सुचेना काय पुजून व्यर्थ दगडा । आत्मज्ञानी गणपती बोलले करा द्वैताचा आज रगडा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : March 27, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP