मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निराकारी व एकतारी भजनीपदे|आत्मज्ञानी पदे| गण १ ला आत्मज्ञानी पदे गण १ ला गौळण पद १ पद २ पद ३ पद ४ पद ५ पद ६ पद ७ पद ८ पद ९ पद १० आत्मज्ञानी भजनी पदे - गण १ ला महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात एकतारी भजनी परंपरा आहे. Tags : bhajanekatarimarathipadएकतारीपदभजनमराठी गण १ ला Translation - भाषांतर जे निरंजन निर्गुणा माझी प्रार्थना आहे तुम्हांसी ॥तू अविनाशी गुणनिधी प्रसन्न होय मशी ॥तू अगाध सूत्रधारी घडामोड करि नेई स्वरुपासी ॥तुजपासुन्नि झाले शिवशक्ती उत्पन्न ऐशी ॥यावे सभेमध्ये महाराज अविनाश राज रक्ष आम्हांसी ॥तुजविण कोण तारी या प्रसंगाशी ॥शुध्द मुनि गुरु भीमराव ज्ञानाचा ठाव दाखवि आम्हांसी ॥गणपति कवि लागे चरणांसी ॥१॥अवताराचे पद माझे रंगले मन । दहा अवतार मौजेनं ॥धृ०॥पहिला अवतार मच्छ साक्षात ॥केली जलामध्यें मात ॥शंखासुर वधिला त्वरित ॥वेद आले हातांत ॥त्यासि ब्रह्मा झाला प्रसन्न ॥माझे रंगले मन ॥दहा अवतार गाईन मौजेनं । माझे० ॥ १ ॥॥ दुसरा अवतार कूर्माचा । तार हरि भक्तांचा । पृष्ठी भार वाहिला सृष्टीचा ॥आणिक या शेषाचा । काय वर्णू याचे गुण ॥माझे रंगले मन । दहा अवतार गाईन मौजेन । माझे० ॥२॥तिसरा अवतार पै गाढा । पृथ्वी धरियेली दाढा ॥दैत्य मारुन केला रगाडा । नाही उरला हा जोडा ॥हे काय शस्त्रांचे सहस्त्र गुण । माझे रंगले मन ॥दहा अवतार० ॥३॥चौथा नारसिंह विक्राळ । दुसमानाचा काळ ॥हिरण्यकश्यप वधिला तात्काळ । प्रल्हाद त्याचे बाळ ॥तोडितसे भक्तांचे बंधन । माझें रंगले मन । दहा० ॥४॥पांचवा अवतार हरि वामन । मागूं गेले दान । बळीस पाताळी घालून । रक्षपाळ होऊन ॥शुक्राचा नयन फोडून । माझे रंगलें मन । दहा० ॥५॥सहावा अवतार परशूधर । परशुराम अवतार । सहस्त्रार्जुन वधिला सहस्त्रकर । भूमिसीं ज्याचा भार । कैक राजे येती शरण । माझे रंगले मन । दहा० ॥६॥रामे शिळासेतु बांधून । वधिला हा रावण ॥लंका दिधली ही दान । निजभक्त बिभीषण । माझे रंगले मन । दहा० ॥ ७ ॥आठव अवतार हरि वनमाळी । खेळे खेळे गोकुळी ॥गोपीसंगे करितो धुमाळी । कृष्ण वाजवी मुरली ॥कंस मामा निर्दाळूण । माझे रंगले मन । दहा० ॥८ ॥नववे अवतारी धरली मोहूनी । श्रम जाहले म्हणूनी । पाप आचरती सर्व जन । नीच जातीसी मान ॥ऐसे खेळ खेळला भगवान । माझें रंगले मन । दहा० ॥९ ॥दहावे अवतारे करील मात । होईल विश्वाचा हा घात ॥नारायण विनवितो हरिभक्त । जोडुनी दोन्ही हस्त ॥भेटी मागतसे तव चरण । माझे रंगले मन । दहा० ॥१० ॥ N/A References : N/A Last Updated : March 27, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP