मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|मानसलहरी| गुरुवंदना मानसलहरी अनुक्रमणिका देवतावंदन गुरुवंदना रामनामाचा महिमा संत वर्णन रामचरितमानस श्रीरामचरितमानसमधील शिवपार्वती संवाद असुराना वरदान लंका वर्णन असुर वर्णन आकाशवाणी पुत्रकाम यज्ञ रामजन्माची चाहूल रामजन्म सोहळा नामकरण संस्कार श्रीरामाची आरती बालकांड - गुरुवंदना श्रीरामचरितमानस या ग्रंथातील निवडक रसपूर्ण दोहे व चौ्पाया यांचा मुक्त अनुवाद. Tags : ramcharitmanasरामचरितमानस गुरुवंदना Translation - भाषांतर करितो वंदन गुरुचरणाना ।कृपासिंधु नररूप हरिना ॥रवि किरणासम ते वचन ।नाशीत महामोह धनतम ॥१॥अर्थ - मी त्या गुरूमहाराजांच्या चरणकमली वंदन करतो. ते कृपेचे सागर आणि नररूपात श्रीहरीच आहेत. आणि त्यांचे वचन महामोहरूपी घनदाट अंधाराचा नाश करण्यासाठी सूर्य किरणांच्या प्रमाणे आहेत.सुकृतिरूपी शंभुशरीरी शोभे निर्मल विभूती ।मंजुल मंगल आनंदाची ती जणू जन्मदाती ॥जनमन सुंदर आयन्यावरी झाडतील धूळ ।तिलक करुनी वश करती गुरू गुणांचे दल ॥२॥अर्थ - ते सुकृतिरूपी शंकराच्या शरीरावर शोभणारी निर्मल विभूती आहेत. ते सुंदर कल्याण आणि आनंदाची जननी आहेत. भक्तांच्या मनरूपी सुंदर आरशावरील धूळ दूर करणारे आणि तिलक करून गुणसमूहाना वश करणारे आहेत.चरणनखांची कांती तयांच्या जणू रत्नज्योती ।स्मरता त्याना दृष्टी दिव्य उपजे हृदयी अती ॥नाश करी अज्ञानतमाचा तोच दिव्यप्रकाश ।जात जयांच्या हृदयांतरी ते भाग्यवान खास ॥३॥अर्थ - श्री गुरूमहाराजांच्या चरणांच्या नखांची कांती रत्नांच्या प्रकाशाप्रमाणे आहे. त्यांचे स्मरण करतानाच हृदयामध्ये दिव्यदृष्टि उत्पन्न होते. तो प्रकाश अज्ञानरूपी अंध:काराचा नाश करणारा आहे. तो प्रकाश ज्याच्या हृदयात जातो ते मोठे भाग्यवान आहेत.विकसती विमल विलोचन येता मनीप्रकाश ।नष्ट होतसे भवरजनीचे दु:ख आणि दोष ॥दिसू लागती रामचरित मणिमाणिक त्या काली ।गुप्त अथवा प्रकट असती खाणीत ज्या ज्या स्थली ॥४॥अर्थ - तो प्रकाश हृदयात येताच मनाचे निर्मल नेत्र उघडले जातात आणि संसाररूपी रात्रीचे दोष व दु:ख नाहीसे होते आणि रामचरित्र रूपी रत्नमाणके जिथे ज्या खाणीत आहेत ते सर्व दिसू लागतात.गुरुपदधूलि जणू नयनी मृदु मंजुल अंजन ।दृष्टिदोष नयनातिल करि सदा विभंजन ॥विवेकरूपी नयन करि ती धूल दूर सतत ।वर्णन करितो रामचरित जे करील भवमुक्त ॥५॥अर्थ - श्रीगुरूमहाराजांच्या चरणांची धूल कोमल आणि सुंदर नयनांचे अंजन आहे. ते डोळ्यांचे दृष्टिदोष नाहींसे करते. त्या अंजनामुळे विवेकरूपी नेत्रांना निर्मल करून मी संसाररूपी बंधनातून सोडविणारे श्रीरामचरित्राचे वर्णन करतो असे श्री स्वामी तुलसीदास म्हणतात. N/A References : N/A Last Updated : May 26, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP