मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|मानसलहरी| देवतावंदन मानसलहरी अनुक्रमणिका देवतावंदन गुरुवंदना रामनामाचा महिमा संत वर्णन रामचरितमानस श्रीरामचरितमानसमधील शिवपार्वती संवाद असुराना वरदान लंका वर्णन असुर वर्णन आकाशवाणी पुत्रकाम यज्ञ रामजन्माची चाहूल रामजन्म सोहळा नामकरण संस्कार श्रीरामाची आरती बालकांड - देवतावंदन श्रीरामचरितमानस या ग्रंथातील निवडक रसपूर्ण दोहे व चौ्पाया यांचा मुक्त अनुवाद. Tags : ramcharitmanasरामचरितमानस देवतावंदन Translation - भाषांतर श्रीगजानन करीतोवंदन ।शारदेस तुलसीचे वंदन ।अक्षर अर्थ समूह निर्माती ।रस छंदाही करी शुभद ती ॥१॥अर्थ - हे गजानन मी तुला वंदन करतो. हे शारदे मी तुलसीदास तुला वंदन करतो तू अक्षर अर्थसमूह, रस व छंद निर्माण करणारी व सर्वांचे कल्याण करणारी आहेस.श्री उमा शंकरांना वंदन ।श्रद्धा विश्वासरूप आपण ॥निजमनि राही श्री भगवाना ।सिद्ध न देखे तव कृपेविना ॥२॥अर्थ - श्रीपार्वती व श्रीशंकरांना मी वंदन करतो. आपण श्रद्धा व विश्वासरूप आहात. मनात राहणार्या आत्मारामाला आपल्या कृपेशिवाय सिद्धजनही पाहू शकत नाहीत.ज्ञानमय ते नित्यरूप ते ।शंकररूपी गुरूना वंदन ॥चंद्रवाकडा परी तव शिरी ।करितो आश्रय म्हणून पावन ॥३॥अर्थ - ते ज्ञानमय आहेत, नित्यरूप आहेत. अशा शंकररूपी गुरुना मी प्रणाम करतो. चंद्र जरी वाकडा असला तरी आपल्याला शिरावर आश्रय करतो, म्हणून तो पाबन झाला आहे.उत्पत्ती स्थिति संहारिणी ।कल्याणमयी क्लेशहारिणी ॥करितो वंदन सीताजीला ।श्रीराम प्रियतमा पदाला ॥४॥अर्थ - उत्तपत्ती स्थिति व संहारकर्तो अशी ती सीता आहे. तशीच ती कल्याणमयी व क्लेशहारिणी आहे. अशी श्रीरामाची प्रियतमा श्री सीतेच्या चरणी मी वंदन करतो.सर्वश्रेष्ठ भगवान राम ।तव अधीन हे विश्वसकल ॥ब्रह्मदेवता असुरगण ।मायेने वश जन सकल ॥५॥अर्थ - भगवान राम सर्वश्रेष्ठ आहेत. हे सर्व जग त्यांच्या अधीन आहे. ब्रम्हदेव देवदेवता व असुरगण हे सर्वजण मायावश झाले आहेत.सीताराम गुणग्राम शुभवन ।विहरती वाल्मीकी हनुमान ॥विशुद्ध विज्ञानी कवीश्वर ।कवीवराला वंदन सादर ॥६॥अर्थ - श्री सीताराम यांचे गुणसमूहरूपी मंगलवनात श्री वाल्मीकी व हनुमान विहार करतात. त्या विशुद्ध विज्ञानसंपन्न कविश्वराना व कपीश्वराना मी आदराने नमस्कार करतो. वंदन गुरुपदपद्म परागा ।सुवासिक सरस अनुरागा ॥संजीवनीचे चूर्ण सुंदर ।नाशी भवरोग परिवार ॥७॥अर्थ - श्री गुरूंच्या पदकमलपरागाना मी वंदन करतो. हे रजरुपी पराग सुंदर सुगंध तसेच अनुरागरूपी रसांनी पूर्ण आहेत. ते संजीवनी मुळीचे चूर्ण आहेत. ते संपूर्ण भवरोगाच्या परिवाराचा नाश करणारे रजकण आहेत. N/A References : N/A Last Updated : May 26, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP