श्रीमद् गोपाल गीत - पद्मपुष्प चौथे

मराठी जनास हे गीतोपनिषद, गीता ज्ञान प्राप्त व्हावे ह्या हेतुने गोपाळाने केलेले हे `गोपाल गीत'.


॥ योग भूमिका ॥

श्री योगेश्वर कृष्ण ह्या अध्यायांत `ज्ञानयुक्त' निष्काम कर्म योग जो मध्यंतरी लोप पावला होता, त्याचे अर्जुन-उपदेशाचे निमित्ताने पुनर्जीवन करीत इतिहास सांगतात. आत्मा, परमात्मा (ईश्वर) किंवा दोहोंसंबंधीचे शुद्धज्ञान हे मोक्षास कारण होते. हे ज्ञानसुध्दा कर्मयोगाचे फळ आहे. ह्याचा पूर्वइतिहास सांगत स्वत: अनेक जन्म घेतल्याची माहिती देत ते अज, अव्ययी, सर्वभूतेश्वर, प्रकृतीवश होऊनच स्वत: मायेने अवतरत असतात. धर्माचा र्‍हास होऊ लागला; वा अधर्म वाढीस लागला की धर्म रक्षणाकरीता दुष्टांचा नाश व सुष्टाचे पालन करण्या करता जन्म घेतात. कर्म करतांना, कर्मफलाबद्दलची इच्छा ज्याची नष्ट झाली आहे; व जे सर्वाठायी समबुध्दि ठेऊन, स्थिरचित्त आहेत असे योगी निरनिराळे यज्ञ करण्यात लीन होऊन, यज्ञावशेष भक्षण करतात. त्याचे प्रसादाने ब्रह्मरुप होतात. श्रीभगवान अर्जुनास म्हणतात, सर्वयज्ञाचे, फळ, ज्ञानच असते. अशा योग्यांना व महर्षीनाच गुरु करुन, नम्रतेने त्यांची सेवा करुन त्यांचे बरोबरच्या संवादाने, संतुष्ट केल्याने ते तुला ज्ञानबोध देतील, आणि त्या आत्मज्ञानरुप प्रसादाने भवसागर तरुन जाता येते. ज्ञानासारखे पवित्र दुसरे काही नाही आणि त्या ज्ञानानेच संशय अज्ञान, नष्ट होतो, आणि कर्मबंधनातून मूक्ति मिळते. म्हणून अर्जूना, तू हा अज्ञान-संशय हि ह्या ज्ञानाने नष्ट करुन, आत्मज्ञानाने दृढनिश्चयी होऊन (लढण्यास) सिध्द हो ! असा हा ज्ञानकर्म संन्यासयोग, श्री भगवंत अर्जूनास सांगतात.

N/A

References : N/A
Last Updated : February 05, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP