मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीकल्हळिवेंकटेश देवचरित्र| अध्याय १० श्रीकल्हळिवेंकटेश देवचरित्र प्रस्तावना अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ आरती हरिहराची द्वादशाक्षरी मंत्र-गीती श्रीकल्हळिवेंकटेश देवचरित्र - अध्याय १० श्रीकल्हळिवेंकटेश Tags : kalhali venkatesh venkateshmarathiकल्हळि वेंकटेशमरठीवेंकटेश अध्याय १० Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नम: ॥॥ श्रीसांबसदाशिवाय नम: ॥॥ श्रीत्रिपुरसुंदर्यै नम: ॥॥ श्रीकालभैरवाय नम: ॥॥ श्री दत्तात्रेयाय नम: ॥जयजयाजी श्रीवत्सांक ॥ जयजया शेषपर्यंक ॥ जयजया त्रिलोकनायक ॥ ब्रह्मजनक जगद्गुरो ॥१॥जय लक्ष्मीहृदयाब्जभ्रमरा ॥ निजजनमानसविहारा ॥ मुनिजनचित्तचकोरा ॥ शंकरप्रियकरा परेशा ॥२॥मायामया मायातीता ॥ मायाचक्रचालका अनंता ॥ कमलापते गुणवंता ॥ भूताधिपते अच्युता तुज नमों ॥३॥प्रभुवरा तव चरणनलिन ॥ त्याचेंहि सूक्ष्मरज:कण ॥ शक्तिमान होती जाण ॥ जगत्पावन करावया ॥४॥त्या स्वरुपाचें यथार्थ वर्णन ॥ करिता आहे समर्थ कोण ॥ परि ते करवतील तैसेंच करीन ॥ चरणाविंदीं मन ठेवोनियां ॥५॥स्वरुप सुंदर अलोकिक ॥ पहातांची तहान भूक ॥ त्वरें हरतसे देख ॥ मूर्ति क्षणैक देखतां ॥६॥रुचिर नाजुक प्रभुचरण ॥ सारस होतसे लज्जायमान ॥ कमला करी संवाहन ॥ कमललोचन आदिमाया ॥७॥सरळ पदांगुळियावरती ॥ मृदुल उंच नखें शोभती ॥ पाहोनि तयांची दीप्ति ॥ अरुण खालती मान घाली ॥८॥चंद्रें सोडोनि शुभ्रता ॥ स्वीकारोनि आरक्तता ॥ दशविध होवोनि तत्वता ॥ राहिला नखावरता आनंदें ॥९॥पदतळ कोमळ निर्मळ ॥ जया पुढें कमल निष्कल ॥ चरणींचि आरक्त टांच मृदुल ॥ घोटी रम्य वर्तुल शोभतेसे ॥१०॥पायीं मणिमय सांखळ्या सुंदर ॥ त्याखालतें रत्नजडित नुपुर ॥ रुणझुणती मधुर मनोहर ॥ तेणें गोपिनिकर मन्मोहें ॥११॥निर्लोम पोटरिया जाण ॥ विमळवर्तुळ जानु च्छान ॥ ऊरु करिशुंडेसमान ॥ ज्यावरी अधिष्ठान राधिकेचें ॥१२॥कटितटीं भरजरी पीतांबर जाण ॥ वरी जडितकांचि देदीप्यमान ॥ नाभी शोभे सरसिरुहासमान ॥ जें उत्पत्तिस्थान ब्रह्म्याचें ॥१३॥प्रभूचें रमणीय उदर ॥ जें अनंत ब्रह्मांडांचें माहेर ॥ जेंवि नवराजीवांतील केसर ॥ तेंवि रोमवल्ली सुंदर शोभती ॥१४॥रुंद मनोरम भुजांतर देख ॥ त्यावरि श्रीवत्सलांछन सुरेख ॥ कौस्तुभमणि तेजेंअधिक ॥ रमणीयक दिसतसे ॥१५॥त्रिरेखायुक्त श्रीचा गळा ॥ पाहोनि कंबु लाजला ॥ नानापरिच्या माळा ॥ श्रीच्या निर्मळ गळां विराजती ॥१६॥कंठीं गोप पुतळ्यांच्या माळा ॥ जडित चंद्रहार तो निराळा ॥ गजमुक्ताहार आगळा ॥ सकळा झळाळा झळकती ॥१७॥जाईजुई मचकुंद सेवती ॥ गुलाबगुलछबू मालती ॥ तेंवि तुळस वैजयंती ॥ अपार रुळती हार तयांचे ॥१८॥वेंकटेशमूर्ति चतुर्भुज शामवर्ण ॥ चारी करीं कडींतोडे जाण ॥ दक्षिण करीं पाचेची पोची विलक्षण ॥ पसरे प्रकाश हरितवर्ण चहूंकडे ॥१९॥तो प्रकाश पाहोन ॥ जाती मृगपशु भुलोन ॥ येती धांवत दुरोन ॥ वाढलें तृण नूतन म्हणोनियां ॥२०॥शंखचक्रगदापद्म जाण ॥ उभे हातीं धरोन नारायण ॥ करावया भक्तावन ॥ तयाचें कारण परिसावें ॥२१॥शंखनादें करोन ॥ सकळां कळविती भगवान ॥ अनन्यभावें येतील शरण ॥ तयांचे मनोरथ पूर्ण करीन मीं ॥२२॥निजभक्तां जड पडतां भारी ॥ करुणानिधि मुरारी ॥ धांवत जावोनियां सत्वरी ॥ संकटें हनन करी चक्रानें ॥२३॥मदोन्मत्त पुरुषाची मान ॥ करावया अध:पतन ॥ हातीं गदा धरियली जाण ॥ तया योग्य साधन म्हणोनि ॥२४॥कमलाची प्रफुल्लता ॥ तेविं भक्तीनें प्रसन्नता ॥ आपुली हे दावावया तत्त्वता ॥ कमल हातां धरियेलें ॥२५॥असो हनु कपोलद्वय जाण ॥ दिसती मांसल शोभायमान ॥ ओतली नीलमणि गाळोन ॥ पाहतां नयन स्थिरावती ॥२६॥ओष्ठ अति सौंदर्यवान ॥ पाहोनि तयांचा आरक्तवर्ण ॥ प्रवाळें केलें म्लान वदन ॥ तेथें बिंबास कवण पुसतसे ॥२७॥प्रभुरायाचे अधरोष्ठांत ॥ भरलें असे सदा अमृत ॥ तयाची रुचि मिळे मात्र ॥ व्रजनारींप्रत भक्तीमुळें ॥२८॥समान दंत कैसे शोभती ॥ जणूं बैसल्या राजहंसपंगती ॥ कीं शुध्द हिर्याचीच काय ती तती ॥ यापरि दिसती सोज्वळ ॥२९॥मुखांतुनी काय निघेल वाणी ॥ ते झेलावया लागुनी ॥ उभे असती सुरऋषिमुनि ॥ हस्त जोडोनि श्रीपुढें ॥३०॥हास्य करितां जगत्पति ॥ द्विज शुभ्रवर्ण झळकती ॥ सवें पडतां अधरदीप्ती ॥ क्षणैक दिसती आरक्त ॥३१॥सरळ सुरेख श्रीचें घ्राण ॥ तिळपुष्पें गळती पाहोन ॥ केवळ तैलधारेसमान ॥ करी कष्टी मन चांफेकळी ॥३२॥देवाचे सुंदर आकर्ण नयन ॥ तयांचें पाहोनि लावण्य ॥ मृगें सेवियलें अरण्य ॥ खंजिरिटें गगन घेतलें ॥३३॥तें केवळ अरविंदेंचि जाण ॥ तेजें रविशशीसमान ॥ कृपें करतां निरीक्षण ॥ होती पाषाण दिव्यमणी ॥३४॥भिंवया जैशा कमाना ॥ अनंगचापासमाना ॥ भ्रुकुटी करितां वक्र जाणा ॥ शत्रु दणाणा पळताती ॥३५॥भूद्वयामधीं सुलक्षण ॥ बालका दृष्टि लागेल म्हणोन ॥ कृष्णा, कृष्णटिकली जाण ॥ लाविली यशोदेन प्रमोनें ॥३६॥विलक्षण प्रभूच्या श्रुति ॥ पिप्पिलिकाशब्दहि ऐकिती ॥ कर्णीं मच्छाकृति कुंडलें तळपती ॥ पडे रत्नकांती कपोलीं ॥३७॥श्रीच्या विस्तृत ललाटावरी ॥ केशरमिश्रित कस्तूरी ॥ त्रिपुंड्र रेखिलासे कुसरी ॥ शोभा मनोहारि दिसताहे ॥३८॥माथां मुकुट शोभिवंत ॥ नानाविध रत्नें मंडित ॥ झळकताती अत्यंत ॥ तीं समस्तहि स्वीयवर्णी ॥३९॥मणिमय शिरपेंच सुंदर ॥ तेविं कलगितुरा मनोहर ॥ चमकती अति रुचिरतर ॥ किरिटावर मापतिच्या ॥४०॥जडित आतपत्र चामर ॥ हातीं घेवोनि भक्तवर ॥ ढाळती विनयें सादर ॥ श्रीहरीवर सानंदें ॥४१॥प्रभावळ उत्तम रमणीयक ॥ नानापरिची नकशी सुरेख ॥ त्रिदिवेशादि मूर्ति अनेक ॥ काढियल्या देख जीवरी ॥४२॥हें रजतमय काम नाजुक ॥ मध्यभागीं शोभे सिंहमुख ॥ दोनीकडे तोरणें पताका भद्रक ॥ सर्वांवरी छत्र देख विराजे ॥४३॥अधरीं द्वय स्तंभांवरती ॥ श्रीदेवी भूदेवीच्या मूर्ति ॥ ज्या खोदिल्या कुशलकृति ॥ त्याही दिसती शोभिवंत ॥४४॥यापरी सर्वांगसुंदर नारायण ॥ मनोरम सिंहासनीं जाण ॥ पूर्वाभिमुख सुहास्यवदन ॥ उभे भक्तावन करावया ॥४५॥श्रीवेंकटेश त्रिजगत्पाळ ॥ प्रभूचें वामपद पद्माजवळ ॥ पद्मा वसतसे निश्चळ ॥ तियेचें स्वरुप अळुमाळ वर्णितसे ॥४६॥मातेचे चरणकमळ ॥ आरक्त नाजुक सोज्वळ ॥ जियेचा पादपद्मतळमळ ॥ सुरवर सकळ वंदिती ॥४७॥पादांगुलिया सरळ जाण ॥ मृदुल सुनखें आरक्तवर्ण ॥ विलसती तत्तेज पाहोन ॥ लज्जित अरुण मानसीं ॥४८॥अंबेच्या कोमल टांचांत येवोन ॥ स्वयें राहिलासे देव अरुण ॥ तेणें शोभताती आरक्त वर्ण ॥ घोटी वर्तुल जाण विराजे ॥४९॥पायीं हेमजोडवीं विरवल्या ॥ तेविं गेंदफुलें मासोळ्या ॥ जडित बिचव्या शोभल्या ॥ दशांगुल्या भरोनि ॥५०॥मणिमय सांखळ्या तोडर ॥ तैसें सुरेख सुंदर नूपुर ॥ रुणझुणती मधुर स्वर ॥ तेणें क्षणैक श्रीधर मोहती ॥५१॥नेसली शालु भरजरी ॥ निर्या घोळती प्रपदावरी ॥ गगन देखोनि मत्त करी ॥ गिरिगव्हरीं दडाले ॥५२॥भार्गवि कटि अवलोकून ॥ पंचनख करती पलायन ॥ माजपट्टा दैदीप्यमान ॥ ल्यायली कमललोचन जगन्माता ॥५३॥शालूच्या पदरावरी ॥ नामावलि काढली कुसरी ॥ विष्णु नारायण श्रीहरि ॥ श्रीपति शौरी पुरुषोत्तम ॥५४॥कनककमंडलुवत ॥ मातेचे पयोधर शोभिवंत ॥ मुक्तलग कंचुकि तटतटीत ॥ सुरेख हरितवर्ण तियेचा ॥५५॥गोठ तोडे पाटल्या छंद ॥ वाके जवे बाजुबंद ॥ जडितकरभूषणें विविध ॥ चहूं हस्तीं विशद शोभती ॥५६॥करांगुलियांत मुद्रिका ॥ नवरत्नांच्या नव सुरेखा ॥ दहावी वरती देखा ॥ रमानायका बसविलें ॥५७॥लफ्फा तनमणि चंद्रहार ॥ गजमुक्तांचा कंठा सुंदर ॥ पोत पेटया शृंगारगळसर ॥ कांति सर्वांवर पदकाची ॥५८॥पुतळ्यादिकांच्या माळा ॥ परिमळ पुष्पांच्या निराळ्या ॥ रुळझुळती अंबेच्या गळां ॥ सुवास भरला गगनोदरीं ॥५९॥कंठीं गळसर्या मंगळसूत्र ॥ अखंड सौभाग्यद पवित्र ॥ तेजें लोपती शशिमित्र ॥ शोभा विचित्र कोण वर्णी ॥६०॥देवीचे गोजिरे चुबुक ॥ वरी कस्तूरीटिकली सुरेख ॥ रसरशित कपोल नाजुक ॥ गुलाबी झाक मारितसे ॥६१॥ओष्ठ जियेचे आरक्तवर्ण ॥ पक्वबिंबफलासमान ॥ शुभ्रदंतपंक्ती सुलक्षण ॥ जेवीं किरण चंद्राचें ॥६२॥सरळ नासिका कमलेची ॥ जणूं चाफ्याची कळी साची ॥ शोभतसे नथ सर्जाची ॥ टीक हिर्याची झळाळे ॥६३॥सुंदर आकर्ण नयन ॥ पाहोनी लाजती हरीण नलिन ॥ ल्याइलीसें नेत्रांजन ॥ होय मनोहरण पहात्यांचें ॥६४॥भूद्वय जेविं शरासन ॥ नेत्रकटाक्ष लावोनी बाण ॥ मसिविषदिग्ध करोन ॥ सोडी नारायण पाहोनियां ॥६५॥द्वय भिवयांमध्यस्थलीं ॥ मृगमदें करोनी काढली ॥ चंद्रगहुटिकली ॥ असे गोंदली सकुमार ॥६६॥स्वच्छ निर्मल ललाटावरी ॥ रेखिली कुंकुमाची चिरी ॥ दिसतसे नक्षत्रापरी ॥ मनोहरी जगदंबा ॥६७॥कर्णीं काप बुगडया कर्णफुलें ॥ कुरडु कुडया चवफुलें ॥ बाळ्या कुडुक ते निराळे ॥ तानवडें शोभलें जडिताचें ॥६८॥कचकलाप कृष्णवर्णी ॥ जननीची शोभे सुरेख वेणी ॥ जैसी प्रयागीं त्रिवेणी ॥ पाहोनि फणी लाजती ॥६९॥मच्छ कच्छ मयूर कीर ॥ मूद आंवळा नाग बोर ॥ अग्रफुलें राखडी चंद्रकोर ॥ चंद्रा अनिवार तुच्छ करी ॥७०॥फुलें नानापरीचीं ॥ साधीं आणि फिरकीचीं ॥ वेणीवरी शोभती साचीं ॥ तेविं शेवतीचीं आणीक ॥७१॥विविधपुष्पें सुवासिक ॥ तयांचा गजरा सुरेख ॥ अंबेच्या बुचडयावरी देख ॥ रमणीयक शोभतसे ॥७२॥बिंदि बिजवरा शोभे भालीं ॥ ज्यावरी नानारत्नें जडविलीं ॥ तीं आपापल्या तेजें विराजलीं ॥ पाहतां चपला झाली थक्कित ॥७३॥रत्नखचित मुकुट देख ॥ शिरीं शोभे अमोलिक ॥ तत्तेज पाहतां अंबक ॥ सुरवरांचेही क्षणैक दिपावती ॥७४॥जो वाटेल तो रुचिरतर ॥ देवी धारण करी परिष्कार ॥ परी मातेचें अनुपम शरीर ॥ शोभवी अलंकार सर्वही ॥७५॥ऐशी सर्वांगसुंदर ॥ श्रीहरिप्रिया मनोहर ॥ जियेचें पदरज निरंतर ॥ धरती सुरवर मस्तकीं ॥७६॥सकलही सौंदर्य गाळून ॥ ओंतले श्रीचें संहनन ॥ तयाचें करावया वर्णन ॥ सहस्त्रमुखादि जाण न शकती ॥७७॥चतुर्भुज देवी पद्मालया ॥ विश्वजननी आदिमाया ॥ उभी भक्तावन कराया ॥ सहाय दयाया धवातें ॥७८॥श्रीलक्ष्मीजवळिक ॥ जेथें प्रगटले वैकुंठनायक ॥ ती दिव्यशिला असे देख ॥ होतसे पूजाअर्चा सुरेख तियेची ॥७९॥साखणी कडेपाट मंडप सम्यक् ॥ तिघई, त्यापुढें पडवी देख ॥ अग्रे ध्वजस्तंभीं खगनायक ॥ हस्त जोडोनी सन्मुख उभा असे ॥८०॥श्रीनिकटवर्ती जाण ॥ डावीकडे राम सीता लक्ष्मण ॥ तेवीं वराहगीर्वाणं ॥ मूर्ती सुलक्षण शोभती ॥८१॥उजवे भागीं महादेव शंकर ॥ तुगल्यापा वदती तो विष्णुकुमर ॥ मागें भंडेरंगैयेश्वर ॥ निरंतर तिष्ठती ॥८२॥श्रीसमोर दिपमाळ तुळसीवृंदावन ॥ उजवीकडे जवळ तयापासोन ॥ मध्व मारुतीमुखप्राण ॥ उभे हस्त जोडोन रहाती ॥८३॥तया मागें तुळसीवृंदावन ॥ त्यानजीक एक गुहा जाण ॥ जींत कोणी एक ब्राह्मण ॥ होता अनुष्ठान करीत ॥८४॥श्रीपश्चिमेस स्वल्पांतरावरी ॥ असती द्वय धर्मशाळा दुहेरी ॥ पहिली पंचवीसखणी दुसरी ॥ तियेचे शेजारीं खण आठ ॥८५॥या युग्मांचे मध्यंतरीं ॥ जिना असे जावया वरी ॥ यांचे दक्षिणेस एक ओहरी ॥ तीन कमानी बरी शोभते ॥८६॥श्रीचे दक्षिणभागीं देख ॥ पांच ओहर्या असती सम्यक ॥ तीन कमानीच्या चार आणीक ॥ दोन कमानी एक पांचवी ॥८७॥याही ओहर्यांमधून ॥ वरती जाण्या असे सोपान ॥ सलग चुनेगच्ची कट्टा जाण ॥ सकलांपुढोन शोभतसे ॥८८॥या ओहर्यांच्या पूर्वेस एक ॥ असे फरसबंदी रस्ता सुरेख ॥ कल्हळिगांवा कडोन भक्तलोक ॥ यावया वेदाद्रिनायकदर्शना ॥८९॥त्या पूर्वेस पिंपळाचा पार जाण ॥ तसेंच तुळसीवृंदावन ॥ रथांचें सुरेख निकेतन ॥ तेविं मठही विस्तीर्ण विराजे ॥९०॥श्रीपाक् धर्मशाळा एक साखण ॥ उत्तरेस असती त्या तीन ॥ पहिली दुघई अक्रा अंखण ॥ तिघई आठ अंखण दूसरी ॥९१॥तिसरी तिहेरी सात अंखण ॥ पांतस्थाच्या सोईकारण ॥ पांचखणाचें पाकसदन ॥ तियेस लागून बांधलेंसें ॥९२॥यांही शाभाभीतरीं ॥ पहिली दुसरीच्या मध्यंतरीं ॥ चढोनी जावया वरी ॥ जिना कुसरी केला असे ॥९३॥उन्नत असे श्रीचें रम्य भवन ॥ तेथें यावया उत्तरकडोन ॥ पायर्या केल्या असती जाण ॥ नागमोडी वळण जयांचें ॥९४॥हीच असे मुख्य वाट ॥ जिच्या पायर्याहि चखोट ॥ चढोनियां येथोन नीट ॥ श्रीदर्शन यथेष्ट जन घेती ॥९५॥वेंकटेशमंदिर सुंदर ॥ जयाचा भव्य प्राकार ॥ तया मंदिराचे सभोंवार ॥ फरशी रुचिर शोभतसे ॥९६॥श्रीचे रम्य प्रासादावर ॥ मनोरम दिसतसे शिखर ॥ जे तीन मजली डेरा सुंदर ॥ कळस मनोहर विराजे ॥९७॥ज्यावरी कुसर नाजुक ॥ केली असे फार सुबक ॥ चहोंबाजूंनीं मूर्ति अनेक ॥ रमणीयक शोभती ॥९८॥चारी दिशेस चार ॥ लहान शिखरें चारुतर ॥ निर्मिली असती मनोहर ॥ बांधणार सुगर वाटतें ॥९९॥अश्वत्थादि वृक्ष देख ॥ तेविं अन्यहि अणीक ॥ ठाईं ठाईं शोभती सुरेख ॥ जयांचि छाया सौख्य देतसे ॥१००॥श्रीचे ईशान्येस देख ॥ कुंडमंडप असे सुरेख ॥ ज्याचीं चारी द्वारें वृंदारक ॥ रमणीयक शोभती ॥१०१॥उत्तरेस पायर्या खालीं एक ॥ जंबुपति रामचंद्ररायें देख ॥ इमारत बांधविलीसे सुरेख ॥ श्रीनैवेदय मुदपाक करावया ॥१०२॥ही ऐशी करविली मजेदार ॥ कीं वर्णी ब्राह्मणादिकां सोयस्कर ॥ सन आठराशें ब्याण्णवांत साचार ॥ झाली तयार सकलही ॥१०३॥तिच्याही खालतीं एक ॥ देवालय असे क्षुल्लक ॥ ज्यांत गोविंदराज मूर्ति देख ॥ निद्रिस्त सुरेख शोभतसे ॥१०४॥यापरिचें देवस्थान ॥ तेविं श्रीहरीचें रुप लावण्य ॥ पाहोन हरपे देहभान ॥ क्षणैक जाण पहा त्यांचें ॥१०५॥ऐसें या स्थानाचें महत्व ॥ नव्हे अनृत सत्यसत्य ॥ भाविक जनहो समस्त ॥ जावोनि प्रतीत पहावी ॥१०६॥जैसें वेंकटगिरि देवस्थान ॥ तेविं हें वेदाद्रीवरील जाण ॥ दिसतसे शोभायमान ॥ नून अणुप्रमाण नसेचि ॥१०७॥ज्या सुभक्तावरि अनुग्रह पूर्ण ॥ करते जाहले भगवान ॥ त्यांही इमारती बांधविल्या भक्ति करोन ॥ त्यांचें जेथील तेथें वर्णन केलें असे ॥१०८॥बाकी राहिल्या त्यावांचोन ॥ या कशाकरितां बांधविल्या जाण ॥ याची माहिती संपूर्ण ॥ शोध करोनहि मिळेना ॥१०९॥परि भक्तवत्सल दिनानाथ ॥ यांची कृपा व्हावी आपणावरत ॥ एतदर्थ बांधविल्या प्रेमयुक्त ॥ ऐसें निश्चित वाटतसे ॥११०॥साल कोणतें बांधविता कवण ॥ हें मिळाल्या माहितीप्रमाण ॥ करितसें सविस्तर कथन ॥ श्रोतेजन परिसावे ॥१११॥शेषप्पातबीब नामें करोन ॥ कोणी देशस्त ब्राह्मण ॥ होता अथणिग्रामीं जाण ॥ सावकारी करोन आनंदें ॥११२॥जो सद्गुणी कुलशीलवंत ॥ स्वधर्मीं असे सदा रत ॥ देखतांचि साधुसंत ॥ चरणीं विनीत होतसे ॥११३॥जो वेंकटेशाचा पूर्ण भक्त ॥ सर्वदा मुखीं नाममंत्र ॥ स्वत: श्रीसेवेप्रीत्यर्थ ॥ येवोनि गिरिवरति राहिला ॥११४॥पूर्वीं नागरसें बांधविलेलें श्रीसदन ॥ अतिशय जीर्ण झालेलें पाहोन ॥ तयानें प्रेमभावें करोन ॥ आतां आहे तें सुंदर भवन बांधविलें ॥११५॥नंतर श्रीवराहदेवाचें मंदिर ॥ अखिल उपलमय सुंदर ॥ बांधविलें भक्तिपुर:सर ॥ ज्यातें कमानी तीन रुचिर शोभती ॥११६॥शके एकूणतीस सत्राशांवरी ॥ प्रभवनामसंवत्सरीं ॥ फाल्गुनशुध्द द्वादशी बुधवारीं ॥ ही कामगारी होय पूर्ण ॥११७॥सत्राशें तीस विभववत्सर ॥ फाल्गुन शुध्द द्वादशी सोमवार ॥ ते दिनीं पुष्यनक्षत्रावर ॥ मुहूर्त सुंदर नेमिला ॥११८॥आमंत्रोनि द्विज अनेक ॥ शेषोनें भक्तिभावें देख ॥ श्रीवराहमूर्ति सुरेख ॥ विधियुक्त स्थापिली ॥११९॥अशाच आशयाचा देख ॥ प्रासादीं असे शिलालेख ॥ जे असती उत्सुक ॥ त्यांहीं नि:शंक पहावा ॥१२०॥श्रीशंकर रामचंद्र मुख्यप्राण ॥ तेविं गोविंदराज हनुमान ॥ यांचीं देवळें लहानसान ॥ असती जाण निर्धारें ॥१२१॥तीं अति प्रयासें करोन ॥ नानाविध कष्ट सोसोन ॥ पुजारी पूर्वजांनीं जाण ॥ बांधविलीं म्हणून समजतें ॥१२२॥श्रीचा सभामंडप प्राचीन ॥ लहान असोन झालासे जीर्ण ॥ तो नवीन घालावा म्हणोन ॥ भक्तांत:करण उचंबळलें ॥१२३॥त्यांत जमखंडिचा अण्णा वर्तक ॥ होवोनियां प्रमुख ॥ द्रव्यादि लोकसहायें देख ॥ तो अति सुरेख बांधविला ॥१२४॥बाराशें अडसष्ट फसली सालीं ॥ ही कामगारी संपूर्ण जाहली ॥ तेणें वेंकटेशमाउली ॥ आनंदली भक्तीनें ॥१२५॥देवालयावरील शिखर ॥ बाराशें एकसष्ट फसलीस सुंदर ॥ वेंकणगवडा ओबलापुरकर ॥ येणें मनोहर बांधविले ॥१२६॥तेणें त्याच सालीं आणिक ॥ ओहर्यांपुढील साग्र कट्टा देख ॥ बांधविलासे सुरेख ॥ भक्तिपूर्वक प्रेमानें ॥१२७॥राज्यकारभारीं बहुख्याती ॥ प्रजा अदयावत वाखाणती ॥ जया रावसाहेब वदती ॥ ते जमखंडीअधिपति जाण पां ॥१२८॥श्रीचे पश्चिमेचि आठ अंखणी ॥ जी धर्मशाळा ती तयानीं ॥ भक्तिभावें श्रीचरणीं ॥ प्रेमें करोन बांधविली ॥१२९॥कोणी एक संभावित गृहस्थ ॥ खांडे उपनाम नाम हरिपंत ॥ श्रीमंताची चाकरी करीत ॥ जमखंडींत रहातसे ॥१३०॥अठेच्याळीस सत्राश्यांवरी ॥ शके व्ययनाम संवत्सरीं ॥ श्रीचे पश्चिमेकडील ओहरी ॥ बांधविली भक्तिपुर:सरीं तयानें ॥१३१॥तिमाप्पाहुल्याळ नामें करोन ॥ जयाचें जमखंडी वसतिस्थान ॥ तेणे दक्षिणेकडील साहवी ओहरी जाण ॥ श्रीचरणीं होवोनि लीन बांधविली ॥१३२॥श्रीहरीचा पुरातन रथ ॥ टंकसाळे उपनामें कोणी गृहस्थ ॥ रहाणारा जमखंडींत ॥ तयानें प्रेमयुक्त करविला ॥१३३॥या स्यंदनाचीं चाकें पूर्वींचीं ॥ होती चारी पाषाणाचीं ॥ जडत्वामुळें ओढण्याची ॥ अति मेहनत साची पडतसे ॥१३४॥म्हणोनि बाराशें बेचाळिस सालीं ॥ काष्ठमय चारी करविलीं ॥ पुढती तींहि जीर्णत्व पावलीं ॥ द्वादश वर्षें लोटतां ॥१३५॥यास्तव दुसरीं पुनश्च चार ॥ बाराशें चोपन्नांत तयार ॥ वदती ज्या कृष्णरावनाना सुभेदार ॥ तेणें भक्तिपुर:सर बनविलीं ॥१३६॥तेवीं अश्वत्थाचा पार ॥ तळ्याची चुन्याची टिपगिर ॥ आणि तुळशी वृंदावन सुंदर ॥ बांधविलें कमलावर तोषावया ॥१३७॥वेंकटेशाचा रथ फार प्राचीन ॥ पावला असे जीर्णत्व पूर्ण ॥ यास्तव द्रव्यादि लोकमदत घेवोन ॥ करविला नूतन वर्तकें ॥१३८॥बाराशें एकुणसाठ फसलींत ॥ हा पुरा झाला समस्त ॥ जयाचें श्रीचरणीं सदा चित्त ॥ तयातें न्यूनत्व पडेचि ना ॥१३९॥केशवाचार्य वैदय म्हणोन ॥ होता कोणी वैदिक ब्राह्मण ॥ जमखंडी ग्रामांत जाण ॥ सरकारी चाकरी करोन रहातसे ॥१४०॥ज्या नये मोडीलेखनवाचन ॥ परि ये तोंडपाटीलकी पूर्ण ॥ पाठ असे राज्यकारस्थान ॥ काय कारकून त्यापुढें ॥१४१॥रथचक्रें जाहलेलीं अति जीर्ण ॥ तेविं स्यंदन ठेवाया नसे सदन ॥ हें देखोनि तयाचें मन ॥ झालें अस्वस्थ जाण भक्तीमुळें ॥१४२॥एतदर्थ वेंकटेशप्रीत्यर्थ ॥ तेणें मिळवोनि लोकांची मदत ॥ बाराशें अठयाहत्तर सालांत ॥ हीं दोनीं कृत्यें सुपूर्त करविलीं ॥१४३॥पूर्वकडील धर्मशाळा सा अंखणी ॥ ती बांधविली रामदुर्गकरांनीं ॥ उत्तरेच्या बांधविल्या कोणी ॥ तें श्रोतेजनीं परिसावें ॥१४४॥मदरखंडी कल्हळि हुन्नुर ॥ येथील भक्त लोक गुज्जर ॥ यांणीं अकरा खणी शाळा सुंदर ॥ होवोनि श्रीचरणीं तत्पर बांधविली ॥१४५॥बाराशें नव्वद सालाभीतरीं ॥ करवोनि ही कामगारी पुरी ॥ भक्तवत्सल भगवान श्रीहरी ॥ चरण-पुषकरीं अर्पिली ॥१४६॥झुंजुरवाड कट्टाच्चारी ॥ नामें कोणीं ब्राह्मण निर्धारी ॥ जो सात्विक सदाचारी ॥ जमखंडी माझारीं रहातसे ॥१४७॥जयाची गरीब स्थिती ॥ लोकार्जवें उदरपूर्ती ॥ करी परी श्रीवेंकटपति ॥ सदा चित्तीं स्मरतसे ॥१४८॥पूर्वींचें सरकारी स्वयंपाकसदन ॥ काढल्या वरी तेथोन ॥ त्या जागीं धर्मशाळा असाव्या म्हणोन ॥ सांगतें झालें मन तयाचें ॥१४९॥यास्तव अनेक जन अनेक भक्त ॥ तयांचे करोनी बहुत स्तौत्य ॥ मिळविली द्रव्यादि मदत ॥ श्रीवेंकटेशप्रीत्यर्थ जयानें ॥१५०॥अतिरिक्त श्रम सोसून ॥ बांधविता झाला शाळा दोन ॥ पहिली तिघई आठ अंखण ॥ तिहेरी सात खण दूसरी ॥१५१॥सन अठराशें पंचाण्णवाचे अंतीं ॥ झाल्या तयार या इमारती ॥ पाहोनि आचार्याची खरी भक्ती ॥ संतोषले चित्तीं पुरुषोत्तम ॥१५२॥गोपाळप्पा वडवडगीकर ॥ बागलकोटचा रहाणार ॥ येणें श्रीप्रसादाचे सभुंवर ॥ फरशी चारुतर करविली ॥१५३॥जयाची असे कोमटी जात ॥ परी वेंकटेशाचा पूर्ण भक्त ॥ तत्स्वरुपीं अनुरक्त ॥ दीनरात असे जो ॥१५४॥बाराशें तीस फसलींत ॥ ही पूर्ण होतां समस्त ॥ श्रीतें वदे जोडोनि हस्त ॥ देवा तुजप्रत अर्पिली हे ॥१५५॥हल्लींचा कुंडमंडप देख ॥ जमखंडीचे अप्पा वाटवे आणिक ॥ दुजा बाबा सुभेदार एक ॥ यांहीं भक्तिपूर्वक बांधविला ॥१५६॥मागें नाना सुभेदार म्हणोन ॥ कथिला त्याचा हा प्रपौत्र जाण ॥ श्रीवेंकटेशचरणीं लीन ॥ हाही रात्रंदिन राहतसे ॥१५७॥यांनी करोनि पट्टीवर्गत ॥ एकोणिसशें चवदा इसवींत ॥ हा करवोनियां सुपूर्त ॥ श्रीचरणकमलाप्रत अर्पिला ॥१५८॥जे का भक्त नि:सीम ॥ त्यांहीं सुवर्ण-जडिताचे उत्तम ॥ अनेकालंकार अर्पिले सप्रेम ॥ भक्तकाजकल्पद्रुम हरीतें ॥१५९॥त्यांत सुर्तीमोत्यांचा मुक्ताहार ॥ तेविं कलगितुरा मनोहर ॥ जडित शिरपेंच सुंदर ॥ ऐसे परिष्कार मुख्यत्वें ॥१६०॥पूर्वींचे रामदुर्गसंस्थानिक ॥ ज्यांची श्रीपदीं भक्ति सात्विक ॥ त्याहीं हीं भूषणें सुरेख ॥ प्रेमपूर्वक अर्पिलीं ॥१६१॥गोपाळराव रावसाहेब सुमति ॥ जंबुग्रामाचे अधिपति ॥ तयाची स्त्री ताईबाई सुसती ॥ कांहीं दिन असती गिरीवरी ॥१६२॥तयांनीं शिबिका अबदागिर ॥ तयार करवोनि सुंदर ॥ भक्तवत्सल इंदिरावर ॥ पदीं केलीं सादर प्रेमानें ॥१६३॥पुढती तींही होतां जीर्ण ॥ तयाचे नातु सुजाण ॥ यांणीं करविलीं नूतन ॥ भरगच्ची सामायन जियेचें ॥१६४॥जे जंबुपति रामचंद्रपुत्र जाण ॥ परशुरामभाऊ नामाभिधान ॥ शांतवृत्ति गुणी गुणज्ञ ॥ प्रेमें प्रजापालन करताती ॥१६५॥तयांची प्रथम पत्नी श्रीमति ॥ रमाबाईसाहेब गुणवती ॥ ज्यांची श्रीवेंकटेशचरणीं भक्ती ॥ दर्शनास जाती प्रेमानें ॥१६६॥रामतीर्थापासोन ॥ जावया गिरी चढोन ॥ मार्ग असे अति कठिण ॥ विखरले पाषाण चहूंकडे ॥१६७॥तेविं कांटेरी झाडेंझुडपें देख ॥ लागलीं असती अनेक ॥ तेथोनि श्रीदर्शना जावया अति दु:ख ॥ भक्तजनादि लोक पावती ॥१६८॥हें पाहोनियां जाण ॥ कळवळलें श्रीमतीचें मन ॥ विनयें पतिरायातें विनवोन ॥ सडक उत्तम जाण करविली ॥१६९॥सन एकुणशें सातांत ॥ ही कामगारी झाली सुपूर्त ॥ त्या मार्गें जाणायेणारे समस्त ॥ गाती अदयावत सतीतें ॥१७०॥परशुरामभाऊपासोन ॥ पांच पिढया प्रेमें करोन ॥ केली करती सेवा जाण ॥ रमारमण प्रभूची ॥१७१॥सहावीचे युवराज ॥ शंकरराव अपासाहेब महाराज ॥ पूर्णायु होवोनि देवताकाज ॥ पुढती सभाज करोत पैं ॥१७२॥अन्यभक्तें वस्तु नानापरी ॥ तेविं छत्र चामरें कुसरी ॥ शेले दुपेटे भरजरी ॥ अर्पिले श्रीहरिचरणासी ॥१७३॥यापरीचें स्थानरुपवर्णन ॥ करविलें तसेंच केलें जाण ॥ करता करविता नारायण ॥ तोचि एक जाण निर्धारें ॥१७४॥एक म्हणूं तरी अनेक ॥ भक्तकार्या होतसे देख ॥ तयाची करणी अलौकिक ॥ जिष्णुद्रुहिणादिक न जाणती ॥१७५॥रामदुर्गकर भावे जाण ॥ जमखंडीकर पटवर्धन ॥ मुधोळकर घोरपडे म्हणोन ॥ यांचे वर्णीस ब्राह्मण असताती ॥१७६॥या प्राचीन काळापासोन ॥ चालल्या आहेत जाण ॥ पंचसूक्तपवमान ॥ नित्य पठण होतसे ॥१७७॥जमखंडीचे दासापा बाळापा नाइक ॥ ज्यां आनेखिंडी वदती देख ॥ पूर्वजापासोनि वेदाद्रिनायक ॥ भक्तिपूर्वक भजति ते ॥१७८॥या उभयतां नाइकांनीं ॥ प्रत्येकीं एकेक वर्णी ॥ श्रीवेंकटेशचरणीं ॥ कल्हळीस्थानीं ठेविलीसे ॥१७९॥भाऊअलबाळ नामें करोनी ॥ गृहस्थ होता जमखंडींत कोणी ॥ त्याचीही असे एक वर्णीं ॥ श्रीसन्निधानीं जाण पां ॥१८०॥गंगापा कुलकर्णी ॥ नामें बेळगलीत कोणी ॥ रहातसे त्यानेंहि एकवर्णी ॥ ठेविली वेंकटेशचरणीं प्रेमानें ॥१८१॥यापरी अनेक भक्तजन ॥ करती करविती अनुष्ठान ॥ कामनासिध्यर्थ जाण ॥ श्रीहरिचरण पहाती ॥१८२॥होतां कामनेची पूर्ती ॥ सवें महापूजा बांधविती ॥ ब्राह्मणभोजन यथाशक्ति ॥ करवोनि जाती सानंदें ॥१८३॥आनेखिंडीद्वय कुंदगोळनाडगिर ॥ आणावर्तक शिनापाहुल्याळकर ॥ केशवाचारिवैदय जमखंडीकर ॥ हनगंडिकर गंगबादि ॥१८४॥यांहीं ठेविले नंदादीप जाण ॥ त्यांत जमखंडीकरांचा पुरातन ॥ बाकीचे सर्व अर्वाचीन ॥ अन्यभक्तही कांहीं दिन ठेविती ॥१८५॥श्रीपुढें नंदादीपावली ॥ दुबाजू शोभली राउळीं ॥ पहात्यां वाटतसे दीपावळी ॥ नित्य होय वेंकटेशमाउलीप्रीत्यर्थ ॥१८६॥कांहीं नित्य कैक भृगुवारीं ॥ पादचारी वाहनावरी ॥ येती भक्त भक्तकैवारी ॥ मधुकैटभारी दर्शना ॥१८७॥प्रतिसंवत्सरीं देख ॥ दूरदूरचे भक्तलोक ॥ येवोनि समाराधना अनेक ॥ गिरिवरी सम्यक करताती ॥१८८॥तेविं कांहीं भक्तजन ॥ धनुर्मासप्रीत्यर्थ जाण ॥ वेंकटेशसन्निधानीं येवोन ॥ करती नैवेदयार्पण भक्तीनें ॥१८९॥कार्तिकमासीं दीपाराधन ॥ बहुधा नित्य होतसे जाण ॥ तेविं करविती सुभक्त जन ॥ भार्गविमानसरंजनरंजनार्थ ॥१९०॥हा अध्याय परमपावन ॥ जन्हुतनया भागिरथी जाण ॥ करिताम भक्तिस्नान पठणपान ॥ सर्व पापौघहनन करितसे ॥१९१॥भवभयहर हरहरि ॥ उभयतां एकची निर्धारी ॥ वंदूनि तच्चरणपद्मावरी ॥ हा अध्याय हरि समर्पी ॥१९२॥॥ दशमोध्याय: ॥ N/A References : N/A Last Updated : March 16, 2021 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP