मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीकल्हळिवेंकटेश देवचरित्र| अध्याय ३ श्रीकल्हळिवेंकटेश देवचरित्र प्रस्तावना अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ आरती हरिहराची द्वादशाक्षरी मंत्र-गीती श्रीकल्हळिवेंकटेश देवचरित्र - अध्याय ३ श्रीकल्हळिवेंकटेश Tags : kalhali venkatesh venkateshmarathiकल्हळि वेंकटेशमरठीवेंकटेश अध्याय ३ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नम: ॥॥ श्रीसांबसदाशिवाय नम: ॥॥ श्रीत्रिपुरसुंदर्यै नम: ॥जयांची जैसी भक्ती ॥ तैशीच तया फलप्राप्ती ॥ देतसे श्रीवैकुंठपति ॥ हे निश्चिती जाणपां ॥१॥वरोपचारि मांडलें पूजन ॥ जेविं कासारें लाविलें दुकान ॥ विषयीं भरलेंसे अंत:करण ॥ तेथें नारायण दुरावला ॥२॥सर्वांतर्यामीं भरला असे ॥ रिती जागा तयाविण नसे ॥ परि भक्त जनांसिच गवसे ॥ असून जवळी नसे अन्यजना ॥३॥जो ईशभक्तींत रतपूर्ण ॥ त्यातें अंतर्बाह्य रक्षी भगवान ॥ कोठेंही पडों नेदी न्य़ून ॥ प्रभु भक्ताधीन गोविंद ॥४॥भक्तीचे नवविध प्रकार ॥ त्यांत नामस्मरण सोयस्कर ॥ तेणेंचि असंख्य नारीनर ॥ वैकुंठपुर पावले ॥५॥जयाची अखंड असे भक्ति ॥ हरिनामीं वसे आसक्ति ॥ तया शेषाद्रिपति ॥ न श्रमविती कदापि ॥६॥कोणी त्रिमलाचारि नामें ब्राह्मण ॥ जो कां सदाचारसंपन्न ॥ षट्कर्में आचरोन ॥ बेलगुप्प्ती गांवीं जाण रहातसे ॥७॥जो सत्वगुणी आणि भाविक ॥ वेंकटाचलीं अवतरला देख ॥ भक्तजनांचा प्रतिपालक ॥ तो वैकुंठनायक सदा चिंती ॥८॥तयाची असे साधारणवृत्ती ॥ त्यांतची करी उदरपूर्ती ॥ आनंद मानूनिया चित्तीं ॥ सदा तृप्ती मानितसे ॥९॥वेंकटेश गोविंद नारायण ॥ त्रिविक्रम वामन मधुसूदन ॥ असे मुखीं नामस्मरण ॥ करी रात्रंदिन भक्तीनें ॥१०॥यापरी बहुवत्सर गेले ॥ परी गिरिवरी जाणें नच घडलें ॥ कसेंहि करुन पाहिजे गेलें ॥ ऐसें मनीं आणलें द्विजानें ॥११॥करोनियां सर्व आयती ॥ यात्रेकरुंच्या सांगाती ॥ सिध्द झाला जावया त्याच रातीं ॥ दृष्टांतीं देखिला ब्राह्मण ॥१२॥जयाचा असे कृष्ण वर्ण ॥ अंगीं रेखिलें गोपिचंदन ॥ शिरीं शालनाम्याचें वेष्टन ॥ स्कंधीं पीतवसन शोभतसे ॥१३॥शुभ्रवस्त्र परिधान ॥ केलें भालीं मुद्राधारण ॥ तो सुहास्य वदनेंकरुन ॥ बोलिला वचन तें ऐका ॥१४॥म्हणे द्विजवरा ऊठ ऊठ ॥ ममवाणी परिसिजे नीट ॥ नको मानूं तियेचा वीट ॥ मी सांगतसें स्पष्ट तुजलागीं ॥१५॥तव इच्छा वेंकटगिरीवरी ॥ जावयाची असे खरोखरी ॥ परि श्रम घेऊनि इतुक्या दूरी ॥ भूदेवा निर्धारीं जाऊं नको ॥१६॥शूरपालनामें क्षेत्र ॥ काशीसमान असे पवित्र ॥ तेथील नृसिंहदेवाचें चरित्र ॥ प्रसिध्द सर्वत्र जगतीं या ॥१७॥तेथें जाऊन कृष्णास्नान ॥ करोनि विप्रा शुचि होऊन ॥ घ्यावें देवतादर्शन ॥ तसेंच पूजनहि करावें ॥१८॥कृष्णादक्षिणतीरीं देख ॥ द्वय अर्ध कोशावरी सम्यक् ॥ कल्हळी नामें खेटक ॥ गिरिवरी एक वसतसे ॥१९॥नागणैयाख्य श्रेष्ठ भक्त ॥ ईशदर्शनार्थ वाट पहात ॥ राहिला असे तूंही तेथ ॥ जावें त्वरित विपेंद्रा ॥२०॥उभय भक्तोत्तमां तेथें दर्शन ॥ साक्षात् देईल भगवान ॥ असत्य नोहे मम भाषण ॥ सत्यची जाण निर्धारें ॥२१॥ऐसें वदोनि प्रेमयुक्त ॥ सवेंचि गेला होवोनि गुप्त ॥ त्रिमलाचारि होय जागृत ॥ पाहे तों तेथ नसे कोणी ॥२२॥स्वप्न हें असे असत्य सत्य ॥ ऐसें वदती समस्त ॥ परी सत्य होतसे क्वचित ॥ अनुभव मजप्रत आला असे ॥२३॥जो आला दृष्टांतीं ॥ तो ब्राह्मण नव्हे वैकुंठपति ॥ असे तत्स्वरुपावरुन निगुति ॥ सत्य मजप्रति वाटतसे ॥२४॥देवा यात्रेकरी अनिवार ॥ जाती धांवोनि गिरिवर ॥ देशी तयांना दर्शन सत्वर ॥ मजलागींच अवसर नसे कां ? ॥२५॥होतां माझा स्पृहास्पृष्ट ॥ गिरी होईल सर्व भ्रष्ट ॥ यास्तव नये वदसी स्पष्ट ॥ ऐसा पापिष्ट जाणोनियां ॥२६॥पापाच्या अनेक पंगती ॥ नामस्मरणें भस्म होती ॥ ऐशी तव परम सुकीर्ति ॥ वेदादिक गाती भगवंता ॥२७॥ती सर्व मजकरितां ॥ व्यर्थ जाईल कीं गुणवंता ॥ अशी लागली पूर्ण चिंता ॥ यास्तव चरणीं मायां ठेवितसें ॥२८॥न यावें गिरीशी ॥ वाणी परिसूनियां ऐशी ॥ अतिदु:ख जाहालें मनाशीं ॥ बापा हृषिकेशी तूं जाणे ॥२९॥अज्ञानतिमिरें व्यापून ॥ म्यां केलें हीन भाषण ॥ त्याचा रोष न मानून ॥ निजभक्तरक्षण करावें ॥३०॥झाली असे सर्व सिध्दता ॥ म्हणऊन तवाज्ञा न मानितां ॥ गिरिवरी येतां तत्वतां ॥ रुष्टशी समर्था सत्यत्वें ॥३१॥यास्तव देवा मुरारि ॥ तवाज्ञा धरोन शिरीं ॥ जातों कल्हळिगिरिवरी ॥ नागणैयातें सत्वरी भेटावया ॥३२॥हे जगद्वंदय पद्मलोचन ॥ इंदिरावर जनार्दन ॥ हे पीतवसन गजेंद्रोध्दरण ॥ यापरी करित चिंतन राहिला ॥३३॥आश्वीन वदय त्रयोदशीसि ॥ यात्रा परत आली त्या दिवसीं ॥ त्रिमलाचारि त्यांचे संगतीसि ॥ शूर्पालक्षेत्रा पावला ॥३४॥अग्रत: देखिलें नृसिंहभुवन ॥ शोभतसे दैदिप्यमान ॥ पुढें गेला कृष्णा उतरुन ॥ श्रीपुढें लोटांगण घातलें ॥३५॥दक्षिणाभिमुख नृसिंहरुपी वेंकटपति ॥ बसले कोटिसूर्यासम दीप्ति ॥ सव्यभागीं बैलेश्वर गणपति ॥ तेविं केशव वराहमूर्ति विराजे ॥३६॥वामभागीं श्रीरामचंद्रमूर्ति ॥ पश्चातभागीं गरुड मारुती ॥ उभे कर जोडोनियां तिष्ठती ॥ अश्वत्थवृक्ष पुढती शोभतसे ॥३७॥अभिमुख पूर्ववाहिनी कृष्णानीर ॥ वाहतसे स्वछंदें स्थिर स्थिर ॥ स्नानपानें भवभयहर ॥ तटीं घाट सुंदर शोभतसे ॥३८॥सिंहासनीं नृसिंहदेव विराजती ॥ चतुर्भुज श्यामवर्ण कांती ॥ अंकीं भार्गवि शोभती ॥ जे चिच्छक्ति आदिमाया ॥३९॥स्नान करोनियां घाटावर ॥ येवोनि पूजिती नारीनर ॥ सप्रेम नमिती वारंवार ॥ पाहूनि द्विजवर तोषला ॥४०॥करोनियां आपण कृष्णास्नान ॥ नृसिंहदेव पूजिला प्रेमेंकरुन ॥ येणेपरि दिनत्रय जाण ॥ तये स्थानीं ब्राह्मण राहिला ॥४१॥सकुटुंब तेथूनि निघाला ॥ कल्हळिग्रामासन्निध आला ॥ पाहोनियां वेदाद्रिला ॥ नमस्कार केला तयानें ॥४२॥वेदगिरि शोभिवंत ॥ नानाविध वृक्षें विराजित ॥ दाटलासे अंधकार तयांत ॥ आदित्यज्योत न शिरेचि ॥४३॥तुगलि निंब बाभुळ ॥ वट पिंपरी पिंपळ ॥ चिंच कवठ जांबुळ ॥ शेवरि बिल्वफळ इत्यादि ॥४४॥फुलले आम्रवृक्ष चंदन ॥ परिमळें भरुन राहिलें वन ॥ जैसे साधुसंतांचे गुण ॥ सांगितल्याविण प्रगटती ॥४५॥करवंदें खैर बोरी ॥ संवदड नेप्तीकारी ॥ ऐशीं अनंत झुडपें कांटेरी ॥ तेणें अवघड गिरी शिरावया ॥४६॥शुभ्रपीत कोरांटकी जाई ॥ वनतुळसी तुळसी जुई ॥ तेविं अन्य वन्य पुष्पें पाहीं ॥ ठाईंठाईं शोभती ॥४७॥मयूर कोकिला कीर ॥ निजछंदें कूजती मधुर ॥ भारद्वाजच्यासा दिखगपरिकर ॥ पादपांवर खेळती ॥४८॥कोल्हे लांडगे ससे हरिण ॥ जवादिमार्जारतरसादिक जाण ॥ तेविं वनवराहांचे कळप दारुण ॥ स्वेच्छेंकरोन क्रीडती ॥४९॥हा वेदाद्रि जाण ॥ खोरीं गुहा इहीं करोन ॥ युक्त असे चत्वारियोजन ॥ लंबायमान पसरला ॥५०॥ऐशा गिरिची शोभा पहात ॥ राहिले दोघेहि स्वस्थचित्त ॥ तों खवाणी झाली अकस्मात ॥ आले तव भक्त म्हणोनियां ॥५१॥श्रवणीं पडतां ऐसा ध्वनि ॥ दूरवर पाहे न्याहाळूनि ॥ परि दृष्टीस न पडे कोणी ॥ मानी मनीं आश्चर्य ॥५२॥ द्विज म्हणे मज स्वप्न पडलें ॥ कीं पिशाच्य ओरडलें ॥ किंवा आकाशचि वदलें ॥ काय झालें न कळेचि ॥५३॥ऐसा विचार करीत ॥ जाहलासे भयाभीत ॥ क्षणैक अस्वस्थ चित्त ॥ होऊनि तटस्थ राहिला ॥५४॥येरीकडे रेणुकाभवनीं ॥ बसलासे ध्यानस्थ होऊनी ॥ तया नागणैयाचे श्रवणीं ॥ हे आकाशवाणी पडलीसे ॥५५॥होवोनि प्रमोदभरित ॥ गडबडीनें उठला त्वरित ॥ गिरीश पावला खचित ॥ ऐसें भावित धांवला ॥५६॥वाणीचें धरुन धोरण ॥ मुखें करित नामोच्चारण ॥ चालला असे मोदेंकरुन ॥ तों पुढें सस्त्रीक ब्राह्मण देखिला ॥५७॥तया देखतां मन आनंदलें ॥ म्हणे या रुपें वेंकटेश पातले ॥ ऐसें जाणोनियां वहिलें ॥ प्रेमें घातलें लोटांगण ॥५८॥नागणैयातें पाहून ॥ त्रिमलाचारि म्हणे नारायण ॥ या स्वरुपें दयावया दर्शन ॥ पावले म्हणोनि चरण धरी ॥५९॥भक्तोत्तमांची पडतां गांठी ॥ परस्परें गळां घातली मिठी ॥ प्रेमाश्रूंनीं भरली दिठी ॥ आनंद पोटीं न समाये ॥६०॥मग बैसोनियां स्वस्थचित्त ॥ कथिती आपापलें इहवृत्त ॥ ऐकोनियां उभयतां भक्तें पूजिली ॥ भावें स्थापिली तेथेंच ॥६२॥या दंपत्यातें सत्कारुन ॥ गेला संगति घेवोन ॥ नागणैया प्रेमेंकरुन ॥ स्वसदनीं ठेऊन घेतलें ॥६३॥श्रीरेणुकामंदिरांत ॥ जावोनियां भावयुक्त ॥ पूजूनि महिमा वर्णित ॥ बसती नित्य उभयतां ॥६४॥अरुणोदयीं एके दिनीं ॥ भक्तयुग्म सुस्नात होउनी ॥ बसले असतां रेणुकापूजनीं ॥ तों महदाश्चर्य नयनीं देखिलें ॥६५॥कल्हळीगिरीवर ॥ रेणुकादेवीचेसमोर ॥ भेर्यादि मंगलवादयांचा गजर ॥ होय तो सादर ऐकिला ॥६६॥तैसाच दिव्य घंटारव ऐकुनी ॥ उभयतां वदती आपुले मनीं ॥ या दीनदासीं कृपा करोनी ॥ आले चक्रपाणी वाटतें ॥६७॥इतुकिया अवसरांत ॥ कोटिविदयुल्लतासम जोत ॥ तेथेंचि प्रगटली अवचित ॥ पाहुनी भक्तचित्त वेडावलें ॥६८॥सत्यत्वें पावले नारायण ॥ ऐसा दृढनिश्चय करुन ॥ मुखें करित नामस्मरण ॥ धैर्य धरुन पुढें गेले ॥६९॥सांप्रत असे देवस्थान ॥ तेथवरी उभयतां जावोन ॥ न करवे नेत्रें सहन ॥ प्रकाश म्हणउन स्थिरावले ॥७०॥हे प्रभो रमारमण ॥ देवा तुझें अघटित करण ॥ नकळे ब्रह्मादिकां लागुन ॥ मौनेंच चरण धरितसों ॥७१॥तंव पाहती आश्चर्यजनित ॥ सवें झाला प्रकाश गुप्त ॥ एके शिळेवरी अकस्मात ॥ दिव्य मूर्ति तेथ देखिली ॥७२॥शके तेराशें अठयाऐशीं माझारीं ॥ व्यय नाम संवत्सरीं ॥ मार्गशीर्ष शुध अष्टमी भृगुवासरीं ॥ प्रभातीं गिरिधारी अवतरले ॥७३॥मणिमय दिव्य सिंहासन ॥ त्यावरि विराजे मूर्ति सगुण ॥ शिरीं रत्नखचित किरिट जाण ॥ सूर्यप्रभेसमान प्रकाशे ॥७४॥नव घनश्याम सुंदर वर्ण ॥ किरिटकुंडलें देदीप्यमान ॥ नासिका सरळ सुरेख पूर्ण ॥ आकर्ण नयन शोभती ॥७५॥कपाळीं त्रिपुंड्र रेखिला ॥ तयावरि शोभे कस्तुरि-टिळा ॥ आपाद रुळे वैजयंति माळा ॥ विलसे गळां कौस्तुभ ॥७६॥कटितटीं कसला पितांबर ॥ उत्तरीय वस्त्र अति सुंदर ॥ मणिमय भूषणें परिकर ॥ ल्याइला सुरेश्वर गोविंद ॥७७॥दिव्यरत्नयुक्त वलयें हस्तीं ॥ तैसेच तोडर चमकती ॥ करांगुलीमुद्रिका वोप देती ॥ शोभते कटिवरी मेखला ॥७८॥चतुर्भुज वेंकटपति ॥ शंखचक्रादि आयुधें हातीं ॥ निजभक्तरक्षणार्थी ॥ धरिलीं निश्चितीं प्रभूनें ॥७९॥केशरकस्तुरि-पुनग-मिश्रित ॥ चंदनें द्वादश नामांकित ॥ तनु परिमळ सुटलासे अत्यंत ॥ तेणें गिरि समस्त कोंदला ॥८०॥सुरेख सुहास्यवदन ॥ नव फुल्लोत्पलासमान ॥ तेविं प्रेमयुक्त भाषण ॥ पाहूनि मन स्थिरावलें ॥८१॥त्रिलोकसौंदर्य गाळुन ॥ ओतिलें परब्रह्मरुप सगुण ॥ कोटिमन्मथाहून ॥ वेंकटेशानन शोभतसे ॥८२॥भव्य छत्रचामरें हातीं ॥ धरोनि भक्त वरी वारिती ॥ मुखें गोविंद लक्ष्मीपति ॥ ऐसें गर्जती क्षणक्षणां ॥८३॥ऐशी परब्रह्ममूर्ति ॥ जैशी शोभे गिरिवरती ॥ तैशीच देखोनियां निश्चितीं ॥ लोटांगण घालिती वेळोवेळां ॥८४॥हे कमलापति कमललोचना ॥ कलिकल्मदोषदहना ॥ कर्पूरगौर-मानसरंजना ॥ कद्रुतनयारिवहना दयाळा ॥८५॥हे अनंता अनंतशयना ॥ आदिपुरुषा सनातना ॥ श्रीहरि मधुकैटभभंजना ॥ पतितपावना दयानिधे ॥८६॥हे वैकुंठपते नारायणा ॥ दीनानाथा जगदोध्दरणा ॥ जगद्वंदया जनार्दना ॥ मधुसूदना तुज नमो ॥८७॥यापरि करोनि स्तुति ॥ करजोडूनि उभे रहाति ॥ क्षणोक्षणीं चरण वंदिति ॥ प्रेमयुक्त भक्तिभावानें ॥८८॥तंव बोलती रमारमण ॥ झालों असें मी सुप्रसन्न ॥ कांहीं मागा वरदान ॥ तें मी देईन निर्धारें ॥८९॥गतवत्सरीं वहिलें ॥ स्वप्नीं आह्मां आज्ञापिलें ॥ तदुपरि दर्शनहि दिलें ॥ धन्य केलें जगतीं या ॥९०॥विभो तव दर्शनेंकरुन ॥ आह्मी झालों परमपावन ॥ मातापितरादिकहि धन्य ॥ कुळें बेचाळिस जाण उध्दरलीं ॥९१॥तव भक्त कोटयानकोटि ॥ त्यांतिल या क्षुद्र भक्तासाठीं ॥ धांऊन आला उठाउठी ॥ जहाले जगजेठी तुम्हां श्रम ॥९२॥देवादिवेवा जगत्पती ॥ कर जोडोनियां विज्ञप्ती ॥ करीतसों बापा तुजप्रति ॥ ऐकें वेकुंठपति गिरिशा ॥९३॥इच्छा असे ही आमुचे मनीं ॥ पूर्ण करीं बा मोक्षदानी ॥ रहावें येथेंच दिवारजनी ॥ भक्ताभिमानी जगदीशा ॥९४॥आम्ही करुं सदा पूजन ॥ अन्यहि भक्त करितील येऊन ॥ तयांसी प्रभो कृपा करोन ॥ हे रमारमण उध्दरावें ॥९५॥चवर्याऐशीं लक्ष फिरुन ॥ हा नृदेह पावलों जाण ॥ आतां नको पुनरपि जनन ॥ करुणाघन हेंचि दयावें ॥९६॥ऐकोनि यापरीचें दीन वचन ॥ अंतरीं द्रवले शेषशयन ॥ जाणोनियां भक्तांत:करण ॥ तथास्तु म्हणोन बोलिले ॥९७॥आतां श्रोते सज्जन ॥ होवोनियां सावधान ॥ जें वदले भक्तांत:करण ॥ तथास्तु म्हणोन बोलिले ॥९७॥आतां श्रोते सज्जन ॥ होवोनियां सावधान ॥ जें वदले भक्तालागून ॥ लक्ष्मीरमण तें ऐका ॥९८॥ऐका भक्त हो गुणैकराशी ॥ मम मानस गुंतलें तुम्हांपाशीं ॥ येथेंच राहीन मी निश्चयेंसी ॥ चिंता मानसीं न धरावी ॥९९॥माझे नि:सीम भक्त जाण ॥ तेचि माझ्या प्राणाचे प्राण ॥ त्यांच्या सर्वेच्छा परिपूर्ण ॥ येथेंच राहून करीन मी ॥१००॥यावरि अल्प दिवसांत ॥ कोणी महापुरुष येथ ॥ प्राप्त होइल अकस्मात ॥ तो माझा परम भक्त निश्चयेंसि ॥१०१॥तयाचें नाम ब्रह्मैया ॥ सांबैया आणि रंगैया ॥ तिसरा जाण त्रिनामैया ॥ संगें घेऊनियां येतसे ॥१०२॥मानोनियां तयाचें वचन ॥ रहावें सांगेल तुम्हां विधान ॥ तद्वत देवोनियां मन ॥ माझें पूजन करावें ॥१०३॥वदोनि यापरि भक्ताप्रति ॥ गुप्त जाहाली वेंकटेशमूर्ति ॥ तोंचि सुमनें सुरवर वर्षति ॥ वादयें गर्जती अंतराळीं ॥१०४॥स्वप्नांतुनी जागृतींत ॥ येती तसे हे उभय पडलें ॥ किंवा चित्त भ्रमोनि गेलें ॥ म्हणोनियां ऐसें देखिलें ॥ कसें काय झालें कळेना ॥१०६॥स्वप्न नव्हे नव्हे भ्रांत ॥ प्रत्यक्ष पाहिली अनुभवली मात ॥ ती कशी म्हणावी असत्य ॥ सत्यासत्य त्रिवाचा १०७॥तोंचि उदया आला भास्कर ॥ तेणें प्रकाशले स्थिरचर ॥ आश्चर्ये पहाती सभोंवार ॥ तंव साक्षात्कार देखिला ॥१०८॥स्वयंभुशिला पुढती एक ॥ सवें दृष्टीस पडली देख ॥ जीवरी द्वादशनाम दिसती सुरेख ॥ कस्तुरिटिळक शोभतसे ॥१०९॥तुळसीसुमनादिकेंकरुन ॥ केलेलें दिसलें पूजन ॥ जयाच्या सुवासें जाण ॥ गिरि दरवळून राहिला ॥११०॥ऐसा विचित्र प्रकार पहातां ॥ त्यावरी ठेविती माथा ॥ अच्युतानंता भगवंता । या दीन अनाथा संरक्षी ॥१११॥प्रभुअ प्रगटुनी झाले गुप्त ॥ तीच ही शिला निश्चित ॥ अदृश्य रुपें भक्तरक्षणार्थ ॥ या शिलेंत राहिले ॥११२॥कल्हळी खेटक सोडुनी ॥ उटजगिरीवरी घालुनी ॥ उभय भक्त प्रेमेंकरोनी ॥ ईशसन्निधानीं राहिले ॥११३॥त्रिकाल करुनियां स्नान ॥ भावें करिती श्रीशपूजन ॥ आनंदानें रात्रंदिन ॥ नामस्मरण करताती ॥११४॥एवंरीत्या दिन कांहीं लोटतां ॥ आले ब्रह्मैयादि तत्वता ॥ तयांना भेटले उभयतां ॥ चरणीं माथा ठेवोनियां ॥११५॥ब्रह्मैयादिकीं आलिंगन ॥ तयांतें दिधलें प्रेमेंकरोन ॥ सकलहि भक्तराज पूर्ण ॥ जहाले लीन ब्रह्मानंदीं ॥११६॥आतां ऐका श्रोतेजन ॥ पुढील कथेचें अनुसंधान ॥ करोनियां स्वस्थ मन ॥ तेणें पतित पावन सत्य होती ॥११७॥वेंकटपति सद्गुरुराय ॥ तूं तो त्रिजगाची माय ॥ वंदोनियां त्वदीय पाय ॥ हा तृतीयाध्याय संपविला ॥११८॥हरिहर, दशभुज पंचवदन ॥ कैलासपति उमारमण ॥ तयां चरणीं करोनि नमन ॥ अध्याय हा समर्पण करीतसें ॥११९॥इति तृतीयोऽध्याय ॥३॥ N/A References : N/A Last Updated : March 16, 2021 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP