मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीकल्हळिवेंकटेश देवचरित्र| अध्याय ४ श्रीकल्हळिवेंकटेश देवचरित्र प्रस्तावना अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ आरती हरिहराची द्वादशाक्षरी मंत्र-गीती श्रीकल्हळिवेंकटेश देवचरित्र - अध्याय ४ श्रीकल्हळिवेंकटेश Tags : kalhali venkatesh venkateshmarathiकल्हळि वेंकटेशमरठीवेंकटेश अध्याय ४ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नम: ॥॥ श्रीसांबसदाशिवाय नम: ॥॥ श्रीदत्तात्रेयाय नम: ॥जयजय वैकुंठनाथा ॥ जगच्चालका अनंता ॥ शेषशाई त्रिगुणातीता ॥ अच्युतानंता मुकुंदा ॥१॥विश्वनाथा विश्वंभरा ॥ निरामया निर्विकारा ॥ भुवनसुंदरा भक्तोध्दारा ॥ इंदिरावरा वेंकटपति ॥२॥निर्गुण असोनि सगुण ॥ होसी भक्तांकारण ॥ तुझें स्वरुप आणि गुण ॥ कराया वर्णन अशक्य ॥३॥म्हणती वेद नेति नेति ॥ सुरवरादि चकित होती ॥ तेथें या नराची किती मती ॥ प्रभु श्रीपति वर्णावया ॥४॥तुज असे भक्ताभिमान ॥ करिसी भक्तांचें रक्षण ॥ नानाप्रकारेंकरोन ॥ भक्तवचन सत्य करसी ॥५॥एतदर्थ पुढील कथानक ॥ भावें एका तुह्मी भाविक ॥ श्रीवेंकटपतीचें कवतुक ॥ सर्वदा अमोलिक असेचि ॥६॥पाहुनी गिराइकांची भक्ती ॥ तैशाच जिनसा पुढें येती ॥ भुकेला बैसतां पंगती ॥ आतृप्त वाढती वाढणार ॥७॥पात्रापात्र विचारोन ॥। दाते देती तैसें धन ॥ उदक पाहोनियां लवण ॥ तिकडेच जाण धांवतसे ॥८॥तैसेंच वेंकटेशचरित अनिवार ॥ ऐकावया श्रोत्रे अधीर ॥ झाले पाहोनि ममांतर ॥ अनिवार उचंबळलें ॥९॥तरी लक्ष्मीपतीची सुकीर्ती ॥ वर्णितों मी यथामती ॥ जैसी प्रेरणा करील उमापति ॥ तैशीच निश्चितीं लिहितसें ॥१०॥आतां करावें श्रवण ॥ गताध्यायीं झालें निरुपण ॥ ब्रह्मैयादि चवघेजण ॥ गिरिवरी जाण पातले ॥११॥श्रीचे आसपास ॥ झाडेंझुडपें बहुवस ॥ तीं काढोनि आपणास ॥ जागा रहावयास केलीसे ॥१२॥तेथें आश्रम बांधोनी ॥ सर्व राहिले प्रेमेंकरोनी ॥ वेंकटपतिसन्निधानीं ॥ लक्ष श्रीचरणीं ठेवोनियां ॥१३॥एके दिनीं नागणैया भक्तवर ॥ वदे ब्रह्मैया तूं योगेश्वर ॥ आम्हां अज्ञानां दिससी नर ॥ परि नव्हेसि निर्धार हा माझा ॥१४॥गतवत्सरीं प्रभूनीं ॥ आज्ञापिलें मजलागुनी ॥ तेविं दयानिधि येथें येवोनी ॥ मज दर्शन देवोनि धन्य केलें ॥१५॥ईशाज्ञेतें अनुसरोन ॥ आपणहि आला कृपा करोन ॥ सर्वत्रांचें होतां सुदर्शन ॥ झालों पावन स्वामिया ॥१६॥माझा झाला वृध्पापकाळ ॥ काळ वाटे आला जवळ ॥ यास्तव होवोनी उतावेळ ॥ तव चरणकमल धरीतसें ॥१७॥येवढीच इच्छा माझे मनीं ॥ कीं देवालयउत्सव पहावा नयनीं ॥ ती आपण कृपा करोनी ॥ पूर्ण समर्थांनीं करावी ॥१८॥ईशेच्छेंकरोनि तूर्ण ॥ तव हेतु होईल परिपूर्ण ॥ हें सुधेसमान भाषण ॥ नागणैया ऐकोन संतोषला ॥१९॥या क्षेत्रीं स्त्रियेसहित ॥ राहों नये प्रपंच करीत ॥ रजस्वला स्त्रियांनींहि येथ ॥ राहों नय सत्य जाणपां ॥२०॥तेविं दळणें कांडणें ॥ मुलांना पाळणे बांधणें ॥ दधिमंथनादि करणें ॥ हेंही होणें अनुचित ॥२१॥करोनियां इंद्रियदमन ॥ होवोनियां शुध्दांत:करण ॥ रहावें भक्तिभावें करोन ॥ तयासीच रमारमण सौख्यद ॥२२॥यास्तव बा त्रिमलाचारि ॥ रहावें जमखंडिमाझारीं ॥ तेथोनियां गिरिवरी ॥ येवोनि मधुकैटभारि पूजावा ॥२३॥देशपांडे पूर्वज धनरस ॥ तयाचे पोटीं बसवरस शिदरस ॥ शिदरसाचा पुत्र नागरस ॥ जमखंडीस वसतसे ॥२४॥नाहीं तया पुत्रसंतान ॥ तेणें तळमळी रात्रंदिन ॥ नागणैयाचा हेतु पूर्ण ॥ होय तया हातून निर्धारें ॥२५॥ऐसें श्रीचे मनांत ॥ आहे वाटतें निश्चित ॥ यास्तव मी सांगेन ती मात ॥ तुवां निभ्रांत परिसावी ॥२६॥जावें निघोनियां त्वरित ॥ रहावें जमखंडिग्रामांत ॥ हें नारिफल मंत्राक्षतासहित ॥ मागरसाप्रत देईजे ॥२७॥वदावें तया ब्रह्मैयान ॥ तुज दिधलें आशिर्वचन ॥ या संवत्सराअंतीं जाण ॥ होईल पुत्ररत्न सत्यत्वें ॥२८॥पुत्रोत्सव झालियावरि ॥ श्रीदेवालयउत्सव सत्वरि ॥ तुवां करावे निर्धारीं ॥ येवोनि गिरिवरी जाणपां ॥२९॥यापरी आशिरसाचा पेला ॥ भरोनि आचार्यहातीं दिला ॥ तेणें तयासी पाजला ॥ नागरसा झाला अत्यानंद ॥३०॥ह्मणे भाग्य माझें उदेलें ॥ कीं पूर्वार्जित वाटे फळलें ॥ म्हणूनि हें वाक्यामृत पाजिलें ॥ धन्य मज केलें ब्रह्मैया ॥३१॥मज कैंचें पुत्रसंतान ॥ साठ संवत्सरें झालीं पूर्ण ॥ स्वामी संभाळा निजवचन ॥ मीं तरी तें प्रमाण मानितसें ॥३२॥होतां मज पुत्रप्राप्ति ॥ तव प्रासाद बांधवीन निश्चिती ॥ तैसा उत्सवहि यथाशक्ति ॥ करीन कमलापति सत्यत्वें ॥३३॥ऐसें वदोनियां मनीं ॥ राहिलासे ईशचिंतनीं ॥ कांहीं दिवस लोटितां झणीं ॥ झाली अंतर्वत्नी सती त्याची ॥३४॥पन्नासावरि वयाला ॥ वर्षें लोटलीं या स्त्रियेला ॥ कचकलाप शुभ्र झाला ॥ विटाळहि गेला जियेचा ॥३५॥ऐशी ही जाहली गर्भवती ॥ जन मोठें आश्चर्य मानिती ॥ वदती देणार वेंकटपति ॥ तेथें कांहीं कमती असेना ॥३६॥अघटित तयाची करणी ॥ नच कळे कवणालागुनि ॥ सौराष्ट्रपति हस्तस्पर्शें करोनि ॥ झाली हरणी पुत्रवती ॥३७॥तैसें सत्पुरुषाचें वचन ॥ निघालिया मुखांतून ॥ तत्काल होय गर्भधारण ॥ शंका तिळप्रमाण नसेचि ॥३८॥गर्भतेजें अतिसुरेख ॥ शोभतसे सतीचें मुख ॥ पाहोनि नागरस देख ॥ अत्यंत तोख पावला ॥३९॥परम प्रेमेंकरोन ॥ स्त्रियेसि दोहद पुसोन ॥ त्वरें करितसे परिपूर्ण ॥ कांहीं च न्यून न पडोंदे ॥४०॥नवमास होतां परिपूर्ण ॥ सती प्रसवे पुत्ररत्न ॥ तेणें नागरसाचें अंत:करण ॥ मोदार्णवीं बुडालें ॥४१॥पंचमीषष्टिपूजन ॥ तसें बारसेंहि जाण ॥ महोत्सवें करोन ॥ धनरस नामाभिधान ठेविलें ॥४२॥यापरी आनंदांत ॥ राहे कालक्रमण करीत ॥ भगवदिच्छे दोन सुत ॥ पुढती तयाप्रत जाहले ॥४३॥संतति संपत्ति प्राप्त होतां ॥ भ्रमली तयाची बुध्दिमत्ता ॥ म्हणे मजसमान आतां ॥ नसेल तत्वतां कोणीही ॥४४॥संतति संपत्ति दोनी ॥ विपुल असोनी सदनीं ॥ सर्वीं वागे लीन होऊनी ॥ ऐसे पुरुष जनीं थोडेच ॥४५॥नाव उतरल्या नावाडयास ॥ काम सरलिया कर्त्यास ॥ विसरती तेंवि नागरस ॥ श्रीवेंकटेशास विसरला ॥४६॥तेणें कोपले घननीळ ॥ पुत्रांतें उठला पोटशूळ ॥ तेणें करितसे तळमळ ॥ धनरस बाळ पहावेना ॥४७॥तयाची माता सुमति ॥ दु:खें वृध्द स्त्रियांचिया हातीं ॥ देववी औषधें घरगुती ॥ परी बरवी स्थिती दिसेना ॥४८॥मग प्रसिध्द भेषज आणविले ॥ त्यांहीं उत्तम रसायण दिलें ॥ नाना उपचारहि केले ॥ तरी कांहीं न झालें उपशमन ॥४९॥ज्योतिषी जपज्याप करवती ॥ मंत्री पिशाच्च बाधा वदति ॥ मंत्रोनि ताइत बांधती ॥ परि रोगनिवृत्ति होइना ॥५०॥बहु करविलीं अनुष्ठानें ॥ घेतलें अनेक देवां मागोन ॥ तरीहि दिसेना कांहीं गुण ॥ नागरस म्हणोन घाबरला ॥५१॥क्षुब्ध होवोनी दैवत ॥ जें कांहीं करवील कृत्य ॥ तें परिहारावया समर्थ ॥ जगत्रियांत असेना ॥५२॥थकलों नाना प्रकार करोन ॥ तिळमात्र दिसेना गुण ॥ आतां एका देवावांचोन ॥ कवणा शरण जाऊं मी ॥५३॥हे देवा दयासागरा ॥ दीनवत्सला दीनोध्दारा ॥ देवादिदेवा परमेश्वरा ॥ मम सानकुमारा संरक्षी ॥५४॥देवि त्रिपुरसुंदरी ॥ जगध्दात्रि माहेश्वरि ॥ करोनि कृपा मजवरी ॥ पुत्रा सत्वरी रक्षावें ॥५५॥यापरी चिंतन करीत ॥ नागरस बसला चिंताक्रांत ॥ त्या अवसरीं अकस्मात ॥ ब्रह्मैयाची मात आठवली ॥५६॥त्वरें तसाचि उठोन ॥ गेला गिरिवरी धांवोन ॥ होतां श्रीचें दर्शन ॥ घातलें लोटांगण मनोभावें ॥५७॥प्रभो चुकलों देवा चुकलों ॥ संसृतितमीं पूर्ण भ्रमलों ॥ म्हणोनि स्वामीतें विसरलों ॥ अपराधी झालों अत्यंत ॥५८॥आतां दयाळा क्षमा करोन ॥ तोकां दयावें जीवदान ॥ तूं शरण्य मी शरण ॥ तुजविण आन न जाणे मी ॥५९॥करोनियां ऐसें स्तवन ॥ पादहस्तद्वय जोडोन ॥ श्रीसन्मुख लक्षित चरण ॥ अधोवदन ठाकला ॥६०॥हें देखोनि ब्रह्मैया आले ॥ वदती नागरसा काय झालें ॥ मज सर्व कळोनि चुकलें ॥ सकल प्रयत्न थकले कीं ॥६१॥ऐकोनियां तव स्तवन ॥ संतोषले सागरजारमण ॥ तव हेतु झाला पूर्ण ॥ ऐकें मम वचन सत्यत्वें ॥६२॥तुगली वृक्षावरी ॥ पालक बांधवीं सत्वरी ॥ तेणें होय चिंता दूरी ॥ वदूनि नारळ करीं दिधला ॥६३॥पहा कैसा चमत्कार ॥ बालका पडला तत्काळ उतार ॥ सूत्रधारी सर्वेश्वर ॥ लीला अपार तयाची ॥६४॥नागरस आनंदोन ॥ जय गोविंद गोविंद उच्चारोन ॥ नाचों लागला प्रेमेंकरोन ॥ श्रीशपदीं मन ठेवोनियां ॥६५॥सवें ब्रहमैयाचे चरण ॥ प्रेमभावें दृढ धरोन ॥ म्हणे स्वामी कृपा करोन ॥ आपुलें पुत्ररत्न रक्षिलें ॥६६॥ऐसें सांगे मम मानस ॥ धरोनियां मानववेश ॥ साक्षात् श्रीवेंकटेश ॥ भक्तावनास पातला ॥६७॥आतां तंव आज्ञा शिरीं ॥ वाहोनि देवालय सत्वरी ॥ बांधवीन बापा निर्धारीं ॥ श्रीगिरिधारिकृपेनें ॥६८॥वंदोनि श्रीचरणकमला ॥ ब्रहमैयाचा निरोप घेतला ॥ परतोनियां गृहा आला ॥ मनीं उल्हासला ॥६९॥पुढें स्वल्प दिवसांत ॥ बांधवोनि देवालय त्वरित ॥ श्रीगुणानुवाद गात ॥ आनंदांत राहिला ॥७०॥कांहीं दिन लोटल्यावरी ॥ ब्रह्मैयाचा संदेश सत्वरी ॥ जैसे वदले तैशापरि ॥ सांगे आचारी नागरसा ॥७१॥तुवां वैष्णव दीक्षा घेवोन ॥ करोनियां शुध्दांतकरण ॥ करीत जावें विष्णुपूजन ॥ तेणें वेंकटरमण संतोषे ॥७२॥आचार्य ऐसें वदोनी ॥ सवें गेले निघोनी ॥ नागरस चिंतामग्न होवोनी ॥ आपुले मनीं विचारी ॥७३॥परंपरें आह्मीं शिवभक्त ॥ शिवोपासनीं अनुरक्त ॥ आतां केलिया विपरीत ॥ गुरुदेवता क्षोभतील कीं ॥७४॥लोक निंदतील परम ॥ म्हणतील झाला उद्दाम ॥ सोडिला आपुला कुलधर्म ॥ झाला बेशरम वदतील कीं ॥७५॥तैसेंच सर्व गणगोत ॥ भांग उगवे तुळसींत ॥ तसा झाला आमुचे वंशांत ॥ म्हणूनि समस्त हंसतील कीं ॥७६॥मोडूं जरी तयाचें वचन ॥ तरी ब्रह्मैयारुपी भगवान ॥ रुष्टेल सत्यत्वेंकरोन ॥ अनुभव पूर्ण मज आला ॥७७॥कोठें जाऊं काय करुं ॥ कवणा विचार विचारु ॥ निमुटपणें पाय धरुं ॥ एका सद्गुरुचे निश्चयें ॥७८॥हे भवभयहारके भवानी ॥ निजजनमनोल्हासिनी ॥ जय जय माये प्रणवरुपिणि ॥ अखिल वेदपुराणीं वंदय तूं ॥७९॥देवि मुरहरभगिनि ॥ जगद्वंद्ये दाक्षायणी ॥ आदिमाये जगज्जननि ॥ कात्यायनि तुज नमो ॥८०॥आर्ये तव कृपाकटाक्षेकरोनी ॥ पाषाण होती दिव्यमणी ॥ मूर्ख होती महाज्ञानी ॥ गजास्यजननी जगंबे ॥८१॥आजवरी तव ध्यान । तैसेंच पूजन अर्चन ॥ करीत आलों रात्रंदिन ॥ तें आज कैसें सोडोन रहावें म्यां ॥८२॥इकडे आड तिकडे विहीर ॥ इकडे व्याघ्र तिकडे मृगेश्वर ॥ मधें पडला तव किंकर ॥ काढीं बाहेर दयाळे ॥८३॥ऐसें करोन स्तवन ॥ श्रीचरण चिंतित केलें शयन ॥ तों स्वप्नीं लावण्यसंपन्न ॥ एक स्त्रीरत्न देखिलें ॥८४॥जीचा सजल जलदवर्ण ॥ नेसली शालू स्वर्णवर्ण ॥ कुंकुमतिलक नक्षत्रासमान ॥ आकर्ण नयन शोभती ॥८५॥तडित् समा दिसे दीप्ती ॥ गळां मौक्तिकमाला विलसती ॥ कटीं रत्नमेखला वोप देती ॥ चरणीं रुणझुणती पैंजण ॥८६॥ऐसी मूर्ति सुहास्यवदन ॥ वदे नागरसालागोन ॥ कां झालें भ्रांत मन ॥ ऐकेम मम वचन सत्यत्वें ॥८७॥पार्वती आणि लक्ष्मीपति ॥ हीं सहोदर जाण निश्चितीं ॥ तूं विष्णुपूजा करशील ती ॥ पार्वतीअपचिती जाणपां ॥८८॥यास्तव वैष्णवी दीक्षा घेवोन ॥ हृदयांतिल कल्मष टाकोन ॥ करीत रहावें विष्णुपूजन ॥ तेणें अपर्णा पूर्ण संतोषे ॥८९॥कर्पूरगौर शंखचक्रधर ॥ गिरिजापति इंदिरावर ॥ दोघे एकचि साचार ॥ हा मनीं निर्धार असोंदे ॥९०॥स्वरुपें दोन दिसती ॥ परी अखंडित एकचि असती ॥ जैसी जयांची भक्ति ॥ तैसे दिसती तयांतें ॥९१॥विष्णुभक्तांतें वैष्णव ॥ शिवभक्तां बोलती शैव ॥ परी धरियल्या भेदभाव ॥ तयां नाकीं ठाव मिळेचिना ॥९२॥हरि श्रेष्ठ हर सान ॥ हर मुख्य हरि गौण ॥ ऐसें वदति त्यां शमन ॥ टाकी नेवोन नरकांत ॥९३॥ऐसें ऐकुनी जागृत झाला ॥ चहूंकडे पाहों लागला ॥ कोणीच दिसेना नागरसाला ॥ तंव उदया आला भास्कर ॥९४॥स्त्री नव्हे ती शंकरजाया ॥ भक्ताभिमानी आदिमाया ॥ मम संकट निवाराया ॥ आली धांवोनिया मज वाटे ॥९५॥मी तरी मानितों हें सत्य ॥ जे कोणी वदतील असत्य ॥ तयांचीं कुळें त्रिसप्त ॥ रौरवांत पडतील ॥९६॥माझी झाली निभ्रांत मती ॥ आतां कोणाची काय भीती ॥ तप्त मुद्रा घेईन निश्चिती ॥ म्हणोनि स्वस्थ चित्तीं राहिला ॥९७॥तों ऐकिली सुवार्ता ॥ वैष्णवस्वामी येतील आतां ॥ तेव्हां म्हणे स्वामिसमर्था ॥ मम इच्छितार्था पुरवावें ॥९८॥श्रीस्वामी रघुनाथतीर्थ ॥ हे देशदिग्विजय करीत ॥ आले जंबुग्रामांत ॥ तेणें आनंदित नागरस ॥९९॥आपण पुत्रादि घेवोन ॥ घेतलें स्वामिचरणदर्शन ॥ विनवोनियां कर जोडोन ॥ तप्तमुद्राधारण पैं केलें ॥१००॥सवें उपदेश घेवोन ॥ वंदोनियां श्रीचरण ॥ श्रीमन्मध्वग्रंथादि जाण ॥ करीत श्रवणपठण राहिला ॥१०१॥इकडे कल्हळगिरीवर ॥ जो घडला चमत्कार ॥ तो कथितों सविस्तर ॥ श्रोते सादर श्रवण करा ॥१०२॥एके दिनीं प्रात:काळीं ॥ स्नानसंध्यादि कर्में आटोलपीं ॥ सुमनें तुळसी आणावया एक मेळीं ॥ ब्रह्मैयादि मंडळी निघाली ॥१०३॥फुलें तुळसी धुंडित ॥ दूरवर गेले फिरत फिरत ॥ तों देखिली गुहा तेथ ॥ जींत तम अत्यंत दाटलें ॥१०४॥सवें प्रकाश घेवोन ॥ सर्वहि आंत गेले मिळोन ॥ तंव पाषाणमूर्ति विलोकोन ॥ अत्यंत विलक्षण वाटलें ॥१०५॥म्हणती या कोठोन आल्या ॥ कीं ईशें निर्माण केल्या ॥ अतिशय सुंदर सगळ्या ॥ दृष्टीं स्थिरावल्या पाहोनी ॥१०६॥तयां वदतसे ब्रह्मैया ॥ निजजनभक्ति वाढवावया ॥ तेणेंचि निर्मिल्या याठायां ॥ प्रभूची माया विलक्षण ॥१०७॥कर्तुंअकर्तुं समर्थ ॥ ज्याचेनि इंद्रचंद्रादित्य ॥ होती जाती समस्त ॥ तया अघटित काय असे ॥१०८॥शेषशयन वेंकटपति ॥ श्रीरामचंद्र सीतापति ॥ मुख्य प्राण आणि मारुति ॥ सहावी मूर्ति मध्वाची ॥१०९॥सकळां पूजियलें प्रेमेशीं ॥ धूपदीप नैवेदयादिकेंशीं ॥ आणविलें तया नागरसाशी ॥ मूर्तीपाशीं सत्वरें ॥११०॥मग वाजत गाजत साजत ॥ प्रेमें महोत्सव करित ॥ होवोनियां आनंदभरित ॥ देवालयांत आणिल्या ॥१११॥तेराशें पंच्याणउ शक ॥ विजयसंवत्सर मास चैत्रिक ॥ शुध्द प्रतिपदेस देख ॥ मुहूर्त सुरेख काढिला ॥११२॥करोनि सर्व तयारी ॥ प्रभातीं मुख्य शिळेशेजारीं ॥ श्रीवेंकटेशमूर्ति गोजिरी ॥ स्थापिली सत्वरी आनंदें ॥११३॥विध्युक्त स्थापना करोन ॥ आगमोक्त पूजाविधान ॥ सुरु केलें तईंपासोन ॥ आजवरी जाण चालतसे ॥११४॥पांचहि प्रतिमा नेवोन ॥ मंडपीं ठेविल्या जाण ॥ त्या दिसापासोन हें स्थान ॥ वेंकटेशगिरी समान शोभलें ॥११५॥ब्रह्मैया करीतसे पूजन ॥ सांबैया सुस्वर गायन ॥ रंगैया करी मृदंगवादन ॥ इतर सर्वजण सेवेकरी ॥११६॥एवंरीत्या सेवा करीत ॥ ब्रह्मैयादि सकल भक्त ॥ राहते झाले आनंदांत ॥ श्रीचरणीं चित्त ठेवोनियां ॥११७॥पुढती आला आश्विन मास ॥ श्रीच्या नवरात्रोत्सवास ॥ यथाशक्त्या सहाय करायास ॥ प्रेमें नागरस सरसावला ॥११८॥आणखी कांहीं भक्त मिळोन ॥ शिबिका छत्र चामरें जाण ॥ श्रीचरणीं करोनि अर्पण ॥ उत्सव साधारण सुरु केला ॥११९॥श्रीशनिकटवर्तिस्थान ॥ पाहोनि जेथें ब्रह्मैयान ॥ तळें बांधविलें भक्तांकडोन ॥ तेथें अवभृतस्नान होतसे ॥१२०॥ऐशीं कांहीं वर्षें लोटतां जाण ॥ हा तांत्रिक उत्सव पाहोन ॥ तितक्यानें नागैयाचें मन ॥ समाधान होईना ॥१२१॥ब्रह्मैयानें हें जाणुनी ॥ यथावकाशें क्रमें करोनी ॥ भोगश्रीनिवास आणखी प्रतिमा ॥ दोनी ॥ वेंकटेशगिरीहुनी आणविल्या ॥१२२॥तैसेच गरुड मुख्यप्राण ॥ गजतुरंगमयूर जाण ॥ कामधेनु आदि वाहन ॥ तयार संपूर्ण करविलीं ॥१२३॥हें सर्व ठीक जाहलें ॥ परि पुष्करिणी तीर्थ पाहिजे केलें ॥ अवभृतस्नानार्थ वहिलें ॥ आणिलें ऐसें मनांत ॥१२४॥सर्व जगाचा सूत्रधार ॥ भक्तकल्पद्रुम रमावर ॥ जाणोनि निजभक्ताचें अंतर ॥ करती चमत्कार तो ऐका ॥१२५॥होता त्याच अवसरीं ॥ जंबुग्रामा भीतरी ॥ बादशहाचा अधिकारी ॥ नाम कोन्हेरी जयाचें ॥१२६॥जातीचा तो असे ब्राह्मण ॥ परि नास्तिकवादी परिपूर्ण ॥ देवतानिंदा करी जाण ॥ लोकांलागून तेंचि बोधी ॥१२७॥पूजितां धातुपाषाणमूर्ति ॥ त्या तुम्हां काय देती ॥ बोलका चालका देव नृपति ॥ त्यातें निश्चितीं वंदावें ॥१२८॥तयाची शक्ति अनिवार ॥ तोचि देईल ऐश्वर्य अपार ॥ सर्व मनोरथ पूर्ण करणार ॥ खरा ईश्वर तोचि देखा ॥१२९॥जेकां ऐसे निंदक ॥ तयांचें पाहों नये कदा मुख । त्यांसि संभाषणादिक ॥ सहसा देख करों नये ॥१३०॥होतां स्पृष्टास्पृष्ट जाण ॥ त्वरें करावें सचैल स्नान ॥ जैसें अंत्यजस्पर्शेंकरोन ॥ सज्जन स्नान करताती ॥१३१॥ऐशिया पाखांडायाप्रति ॥ यमकिंकर बांधोनि नेती ॥ करोनि जाच नाना रीती ॥ अंतीं टाकिती नरकांत ॥१३२॥असो कोन्हेरीस अकस्मात ॥ झाली एक व्याधी प्राप्त ॥ तेणें पडला तळमळत ॥ अति दु:खित होवोनियां ॥१३३॥श्रेष्ठ वैदय मंत्र्यादि आणविले ॥ आपण होवोनि कैक आले ॥ तिहीं अनेक उपचार केले ॥ परि कांहींच नचले कोणाचें ॥१३४॥पुस्तकें उलथीं पालथीं ॥ करती तर्क अनेक रीती ॥ चालेना कोणाची मती ॥ रोग निश्चितीं कळेना ॥१३५॥जेथें कोपला वेंकटराय ॥ तेथें कोण करील काय ॥ मौनेंचि धरावे पाय ॥ सद्गुरुराय म्हणोनी ॥१३६॥तंव एक रमलशास्त्र जाणता ॥ ब्राह्मण आला अवचिता ॥ म्हणे कोन्हेरी आतां ॥ मम वाक्य तत्वता ऐकावें ॥१३७॥नव्हे रोग तुझा जाण ॥ नव्हे भूतखेत झडपण ॥ नव्हे जारणमारण उच्चाटण ॥ देवताक्षोभ कारण निर्धारें ॥१३८॥यास्तव तुवां आतां सत्वरी ॥ जावें कल्हळगिरीवरी ॥ हरमानसविहारी ॥ पूजावा परोपरी वेंकटेश ॥१३९॥तेणें तुज क्षेमकल्याण ॥ होईल सत्यत्वें जाण ॥ माझें असत्य नोहे वचन ॥ ऐसें वदोन पैं गेला ॥१४०॥तेणें कोण्हेरि अनुतापला ॥ गिरिवरी धांवोनि गेला ॥ श्रीसन्मुख उभा ठाकला ॥ करयुगला जोडोनियां ॥१४१॥म्हणे झालों मी मदोन्मत्त ॥ स्नानसंध्येची वाटली खंत ॥ छळिले बहु साधुसंत ॥ देवता निंदित राहिलों ॥१४२॥ऐसा मी धर्मकर्मभ्रष्ट ॥ सोडुनी सन्मार्ग वरिष्ठ ॥ केलीं बहु पापें श्रेष्ठ श्रेष्ठ ॥ वदतों स्पष्ट वेंकटपति ॥१४३॥आतां धरिले तव चरण ॥ सर्वापराध क्षमा करोन ॥ होवोनियां सुप्रसन्न ॥ मम व्याधिहनन करावें ॥१४४॥तव चरण सोडोनि अच्युता ॥ न जाईन कोठें समर्था ॥ तूंचि देवा मातापिता ॥ तूंचि तारिता निश्चयें ॥१४५॥विनवोनियां यापरी ॥ तेथेंच राहिला गिरिवरी ॥ मनोभावें सेवा करी ॥ नानापरी श्रीहरीची ॥१४६॥मग ब्रह्मैयातें भेटोन ॥ वदे स्वामी दया करोन ॥ उध्दरावें या दीनालागोन ॥ म्हणोनि चरण धरितसें ॥१४७॥होवोनियां विमलांत:करण ॥ करिसी सेवा रात्रंदिन ॥ तें देखोनि नारायण ॥ लक्ष्मीरमण संतोषले ॥१४८॥ऐक बापा आतां एक ॥ गिरीखालीं ओढयावर देख ॥ विहीर बांधवावी सुरेख ॥ मन:पूर्वक कोन्हेरी ॥१४९॥स्नान करोनि तियेंत ॥ पूजीं बा वैकुंठनाथ ॥ पूर्ण होतां दिवस सात ॥ निरोगी सत्य होशील कीं ॥१५०॥ऐशी ब्रह्मैयाची वाणी ॥ ऐकोन तोषला अंत:करणीं ॥ आज्ञेप्रकारें करोनी ॥ सातवे दिनीं मुक्त झाला ॥१५१॥हे सिंधुजारमणा कमलनयना ॥ नारायणा पन्नगशयना ॥ हे गरुडध्वजा जनार्दना ॥ भवभयहरणा तुज नमो ॥१५२॥ऐसें करोनियां स्तवन ॥ महापूजा बांधविली जाण ॥ सवें केलें ब्राह्मणभोजन ॥ क्षणोक्षणीं श्रीचरण धरीतसे ॥१५३॥वंदोनियां ब्रहमैयाला ॥ निरोप मागे जावयाला ॥ हांसोनी बोलती तयाला ॥ पाषाण तुजला पावला कीं ॥१५४॥सुखें जाई आपुल्या गृहीं ॥ पुत्रपौत्रादि नांदत राही ॥ तुझी खूण श्रीचरणीं पाहीं ॥ स्थावर कांहीं असोंदे ॥१५५॥त्वरें निघाला आज्ञा घेऊन ॥ विजापुरीं पावला जाण ॥ आपल्या धन्यातें विनवोन ॥ जमीन इनाम देवविली ॥१५६॥कल्लव्हला नामें शेत ॥ श्रीकडे चालतें तें अदयावत ॥ ऐसें श्रीचें चरित ॥ कोण समर्थ वर्णावया ॥१५७॥जैसें पांडवतीर्थ शेषगिरीं ॥ तसेंच हें वेदाद्रिवरी ॥ पुष्करीणीतीर्थकोन्हेरी ॥ सर्व पापक्षयकारी होईल ॥१५८॥या तीर्थीं करोनियां स्नान ॥ भावें पूजितील वेंकटरमण ॥ तयांच्या सकलेच्छा परिपूर्ण ॥ करील भगवान वैकुंठपति ॥१५९॥त्यांत विशेष आश्विनमासीं ॥ शुध्द एकादशीसी ॥ भागीरथी येईल निश्चयेंसि ॥ दे ऐशा आशी ब्रह्मैया ॥१६०॥पुनश्च आनंदें बोलत ॥ हें कवणाचें असेल कृत्य ॥ त्याचें तोच जाणे भगवंत ॥ आम्ही समस्त बाहुल्या ॥१६१॥तंव भक्त ब्रह्मैयाप्रति ॥ हस्त जोडोनि विनविती ॥ स्वामी सांग उत्सव निश्चितीं ॥ आतां यथास्थिती करवावा ॥१६२॥तुमचा पाहोनि उल्हास ॥ आनंदलें मम मानस ॥ जैसा चातक घनदास ॥ पाहोनि बहुवस आनंदें ॥१६३॥जो का वैकुंठपुरविलासी ॥ परब्रह्म हृषीकेशी ॥ तो पुत्रपौत्रादिकांशीं ॥ तुम्हां निश्चयेंशीं रक्षील ॥१६४॥ऐसा आशीर्वाद देवोन ॥ यथासांग उत्सव जाण ॥ करविला प्रेमेंकरोन ॥ अदयापि तें विधान चालतसे ॥१६५॥नवरात्रोत्सववर्णन ॥ तेंवि वेंकटेशपूजाविधान ॥ पुढील अध्यायीं कथीन ॥ भाविकजनहो निश्चयें ॥१६६॥हा अध्याय शेषगिरी ॥ वेंकटेशवास्तव्य यावरी । जो भावें प्रदक्षिणा पठण करी ॥ तयातें उध्दरी हरिकृपें ॥१६७॥हरिहरांतें वंदन ॥ करोनियां करजोडोन ॥ हा चतुर्थाध्याय जाण ॥ हरी समर्पण करीतसे ॥१६८॥ इति चतुर्थोऽध्याय: ॥४॥ N/A References : N/A Last Updated : March 16, 2021 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP