श्री सत्य नवनाथ पूजा - आरती

नवनाथ पारायणानंतर नवनाथांची पूजा व पुढे सारांश नवनाथ वाचन केले गेले तर अधिक उत्तम आणि फलदायी होईल.


नवनाथ आरती

जय जय आलख निरंजन ओवाळू नवनाथा
नवनारायण भजू नवावेध भक्ती पंथा ॥ध्रु.॥

मत्स्योदरी कवि मायामुक्ति संदेश
गोरख गोवरी गुरुभक्ति आदेश
ज्वाळी जालिंदर राग न गर्ती भजन
गजकर्णी कानिफ पंथ प्रचारक निपुण ॥१॥

सत्यश्रुव सुत पिप्पळे नाथांचा झेंडा
वटसिध्दे मानस पुजन महिमा त्रिखंडा
भर्तरि धुमि नृप राज्य त्यागी ये विरक्ती
आतिथ्य संत हो चतुर चमसाचि युक्ती ॥२॥

करभाजन गहिनि ढुवा नाथ भागवत
बैरागी परिश्रमेन कविसुत मीननाथ,
कृष्णांगर शिवांशी गात्राविण करि भक्ती,
हरि अनुग्रहिं कर्मे बीजें धर्म जागृती ॥३॥

इच्छा दमनी माणिक कडव्या आडबंगा,
पुरुषार्थ विठामाई दिनानाथ आणि रंगा,
चौर्‍यांशि सिध्द नमु चुकवू फेरे चौर्‍यांशी
सहकार्य विधिहरिहर नाथांशी ॥४॥

अवधूत आगळा पंथ निर्मि श्रीमंत,
गुरुनिष्ठा भक्ति ज्ञान वैराग्यवंत,
संचार जगी वचन करारि निधर्मी,
कविदास हृदयी उसळू दया कृपेच्या उर्मी ॥५॥
============

“जय दिनानाथ”
॥ आरती हरीनाथांची ॥

जय देव जय देव जय हरीनाथा हो श्री हरीनाथा
आरती ओवाळीते करी मज सनाथा ॥ध्रु॥
उध्दराया अज्ञजना हरीनाथ अवतार घेऊनी ।
प्रत्येक ग्रासी स्वाहाकार कराया सांगे हा मुनी ॥
आयुष्याचा प्रत्येक क्षण हा सेवेसाठी वेचूनी ।
करी विठामाईची सेवा मनापासूनी ॥१॥

आरती संग्रह गरुप्रेमामृत ग्रंथ रचूनी ।
आजन्म दाखविली गुरुनिष्ठा वार्षिक वारी करुनी ।
पहाट समयी काकड आरती पूजा भोजन माध्यान्ही ।
निशीमाज्जी शेज आरती नियम पाळी तन्मयतेनी ॥२॥

कोल्हापुरी तुळजापुरी आणि माहुरी जाऊनी ।
देई थोर आशिर्वचन सप्तशृंगवासिनी ॥
गिरीनारीचे दत्तप्रभू करीती कृपा अवलोकूनी ।
म्हणूनी अंगीकारीले परमपदी दिनानाथांनी ॥३॥

जय देव जय देव हरीनाथा हो श्री हरीनाथा
आरती ओवाळीते करी मज सनाथा ॥ध्रु.॥

N/A

References : N/A
Last Updated : November 28, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP