श्री सत्य नवनाथ पूजा - अध्याय ६

नवनाथ पारायणानंतर नवनाथांची पूजा व पुढे सारांश नवनाथ वाचन केले गेले तर अधिक उत्तम आणि फलदायी होईल.


॥षष्ठोऽध्याय:॥

श्री गणेशायनम: कौडिण्यपुरी राजा शशांगर, त्यास नव्हता राजकुमार, शिवव्रत आचरे सुंदर, कृष्णा तुंगभद्रा संगमी ॥१॥
शिवशापित सुरोचना, ब्राह्मकुळी कदंबा कन्या, त्याच शिवालयी नित्य दर्शना, येतसे अत्यादरे ॥२॥
एके दिवशी षोडशी बाळा, शिवालयी एकांताला, पाहुन शिव प्रगटला, स्पर्शू लागला पूर्व वचे ॥३॥
शिव स्पर्शे उद्धरता, शिववीर्य गळे तत्वतां नृपांजलीत पडे सहजता मानवस्पर्शे कृष्णागर ॥४॥
कृष्ण्गार वाढु लागला, मंदाकिनी जा पंचत्वाला, अन्यराणी भुजावंतीला वरिता झाला शशांगर ॥५॥
राणीने पाहिला नव्हता कृष्णागर, खेळता बोलावि सत्वर, राजा गेला होता मृगयेवर कृष्णागर आला निष्पाप ॥६॥
कामीक भुजावंती वदली, कृष्णागर म्हणे काय हे माऊली, निघता माता नमस्कारिली भुजावंतीराणी विस्मित ॥७॥
सखी सल्ल्यानें भुजावंती, राजास कुडाभाव सांगती, हस्तपाद खंडुनी चौरंगाप्रती चुंगार लोक चुकती ॥८॥
मच्छिंद्र गोरक्ष सहज येती, शिवांशकृष्णागर अवलोकिती, राजास पुसुन कृष्णा नेती, गोरक्ष वसवी अनुष्ठाना ॥९॥
तपसामर्थ्य हस्तपाद आले, चौरंगी नाम रंगा आणले, गोरक्षे मग अंगिकारले, नाथपंथी सचिन्ह ॥१०॥
दुसरे कथानक प्रयागस्थानी राजा विक्रम पंचर्त्वा गुणी, प्रजाप्रिय रेवती राणी, दु:खे आकांत करताती ॥११॥
गुरु शिष्य तेथे येती गोरक्ष म्हणे उठवू याप्रती, मच्छिंद्र म्हणे अशक्य कृती, हरि म्हणे नाहीतर प्राणार्पण ॥१२॥
निरामयी चौर्‍यांशी येजा, पोचला आहे विक्रम राजा, कायाप्रवेश देह माझा, युक्ती यास गोरक्ष ॥१३॥
विक्रम राजा उठुन बसला, राज्य कारभार करु लागला, हरी ठेवी शिवालयीं कले वराला, गुर्विणीसमक्ष गुहेत ॥१४॥
रेवती धर्मासह दर्शना, सुवासिनीत्व असु दे याचना, हसुं आलें शैवदान मना, सांगे कलेवर कथा गुहीं ॥१५॥
कलेवराचे रती रती तुकडे, शिवजमवी यक्षिणी कडुन जुमडे, पहार्‍या वीरभद्र म्हणे बरे घडे, औषधाविण खासी गेली ॥१६॥
चौरंगी दावी प्रताप शशांगरा, कुडी माता भाव खरा, शासन करी नृप सावरा, चौरंगी गोरक्ष निघती पै ॥१७॥
शिवालयी पाहती कलेवर, अणुरुपे शोधती गुरुवर, भद्रा जवळी कळता खबर, युध्द तेव्हां प्रवर्तले ॥१८॥
चौरंगी गोरक्ष केसरी, यश मिळविती वीर भद्रागुरुवरी कलेवर प्राप्त करी सत्वरी, आले उभयतां शिवालयी ॥१९॥
मच्छिंद्र विक्रम देह ठेवी, शिवालयी ये कलेवर कवी धर्म नाथ शोकास्तवी, रेवती सांगे साद्यंत कथा ॥२०॥
गोरक्ष अनुग्रही धर्मनाथा, माघ बीजी दे, सांगे व्रता, अंबिल घुगर्‍या प्रसादे दरिद्रता गोरक्ष वरदहस्त उत्तम ॥२१॥
गोरक्ष मुदे जा धामोरी, माणीक कृषी-बाल शिदोरी, सोडे तो हरी सत्वरी, भिक्षा म्हणे आलख निरंजन ॥२२॥
शिदोरी खाता गोरख तृप्त, कांही भाग गोरख वदत, भिक्षेकरी काय दे, माणीक उत्तरत, आडवे बोले कृषीबाल ॥२३॥
तुलाच जर आणिक हवे, म्हणतां हरी म्हणे इच्छेसवे, न वागे हेचि अवघे, गोरक्ष जाई तेथूनी ॥२४॥
कडबा भारा मोळी मौली, बैलजोडी तेव्हा जुंपली, जाऊ म्हणे इच्छा भली, दिली तर, उभा तिथेच ॥२५॥
येठणभार शिरी तसा, तृणपर्णे उडे खातसा, अस्थींत्वचा आहे मांसा, उभा कुडीजीव आडबंग ॥२६॥
पुन्हा परतुनी ये गोरक्ष म्हणे गुरु करावा प्रत्यक्ष, बेटया, तूच कां होईना आलक्ष, हरी कर मौली ठेवीतसे ॥२७॥
आडवे बोले गोडवे झाले, योनी संभवी अनाथ भले, इच्छा दमनी काय साधले, मूर्तीमंत प्रत्यक्ष ॥२८॥
मच्छिंद्र गोरक्ष आनंदती चौरंगी आडबंगा सहजती, भेटती मग अवधूता प्रती, अत्त्यादरे आनंदे ॥२९॥
इच्छादान होईल सहज धर्म रुजेल आचार बीज, संतती फुलेल आज गुळवणीच्या वीनवणीने ॥३०॥
इति श्री नवनाथसार, गोरक्ष मुखिचा प्रचार, अठरा पुराणे वेद चार, षष्ठोध्याय गोड हा ॥३१॥
श्रीकृष्णार्पणमस्तु॥

N/A

References : N/A
Last Updated : November 28, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP