श्री सत्य नवनाथ पूजा - अध्याय ९

नवनाथ पारायणानंतर नवनाथांची पूजा व पुढे सारांश नवनाथ वाचन केले गेले तर अधिक उत्तम आणि फलदायी होईल.


॥ नवमोऽध्याय:॥

श्री गणेशायनम: वसुनाथ हस्ते इंद्रे राजयाग नाथपंथी अस्त्राचा संयोग लाभो अग्रपूजे बसती कवी महाभाग, जे कवी उपदेशी नाथ ॥१॥
मीना सांगता अस्त्र मंत्रा अनायासे इंद्रे मयुरवेशे तंत्रा, ग्रहण करी कृपाछत्रा विनवी सफल हो देवास्तव ॥२॥
चौर्‍यांशी नाथ कोपले, इंद्रे स्तविले नाथी न चाले, ऐसे वसन नेसविले इंद्रे तप आचरता ॥३॥
ऐसी नवनाथ कथा प्रगटली मग अवतरणिका कथन केली, समाधिस्त झाल्या नाथमाउली प्रगट परी साधकास्तव ॥४॥
सावरगडी मच्छिंद्रनाथ त्या पूर्वेला जालींधर नाथ गुहेत राही गहनीनाथ मढीत राही कानिफा ॥५॥
विटेग्रामी रेवणनाथ गिरीनार पर्वती गोरक्षनाथ, वडवाळी वटसिध्दनाथ, दुर्मिल पाताळी स्वर्गी मीन ॥६॥
चर्पट चौरंगी अडबंगनाथ गुप्त अदयापी फिरतात भक्तजन तारणार्थ, अदयाप साक्षात्कारे भक्तजना ॥७॥
नाथकबरी बहुत धोरण, दत्तगुरुमहिमा हो तारण, भक्ती, शक्ति, मुक्तीचे तोरण, फडकाविण्या युक्तीने ॥८॥
दत्तगुरुच्या आज्ञेप्रमाणे भक्तजनांच्या मुखे बोलणे नाथपंथाचा आदेश सांगणे भारतखंडी अज्ञजना ॥९॥
मागे नाही, आता नाही घडेल केंव्हा याची ग्वाही, पळही न थांबे यम लवलाही यज्ञ याग मग कोठले ॥१०॥
कर्माचरणी कर्मची मागे, मागे राहे आयुष्य अवघे, पंथप्रकारे मन उचल न हो, हौशा नवशा गौशाने ॥११॥
योगाचरणा योग न घडे, अवघड म्हणून मार्ग न सापडे, खाण्यापिण्यास्तव जीव धडपडे, काय करु, नी कसे करु ॥१२॥
नाथपंथा संचार देतसे अपूर्व धीर, मन असे बहु अधीर केंव्हा भेटे भगवान ॥१३॥।
भगवान काय बेकार, बेकार बसला हा का जो आला, अमोल भक्ती मोल तयाला हाशिल होय न कशाने ॥१४॥
कृपा काय बाजारी ठेविली, रुपया फेकता प्राप्त जाहली भीक मागता दूर पळाली, मिळवावी लागे भक्ती श्रमे ॥१५॥
खाताच तूप ये का रुप, मागील फिटता वाणी माप, जमवी दमडा मागे खूप, लाखाचा सौदा दमडी कै ॥१६॥
भस्मे कै होईल पुत्र शंका मनी कितीक विचित्र, वरुन ध्यान शुभ्र पवित्र, कैसा भेटे भगवान ॥१७॥
जैसे दिल तैसे फल वर्तन जेंव्हा होई निर्मळ तेंव्हा बैठे हृदयमंदिरी भक्तांच्या ॥१८॥
ज्ञान नको, कर्म नको, योग नको, नवस नको, गुरुस्मरणी सदा झुको, हवे हवे सद्गुरुला ॥१९॥
हा पण माझा तो पण माझा, ऐनवेळी कोणी न काजा, ऐको देवो केशवजा, सद्गुरु मन ॥२०॥
लोणी घ्या म्हणावयाचे सोडून, चक्रपाणी घ्या म्हणती गौळणी, दळता कांडता भक्त वरदानी वेळ न दवदी वेगळा ॥२१॥
कोऽम् ओवळे सोऽम् सोवळे तयाकडे भगवानच वळे हेची अभ्यासाने कळे सद्गुरुच्या कृपेने ॥२२॥
भगवान आहे मोठा जागल्या, जागा राहिन त्याच्या भल्या जो कोणी निंदा वाकुल्या त्याचा कर्म तो भोगी ॥२३॥
संगतीत न रहा जे कोणी निंदय सेवा सदा संत जगत् वंदय, अधीरतेने न सोडा छंद, सबुरी फळ मिठा होय ॥२४॥
अग्रणी गुरु माता पिता संप्रदाय संपन्न शांतदाता, अशा अवधूत नाथपंथा निशीदिनी नम्रे नमावे ॥२५॥
रंजक ग्रंथ इतुका मुरावा, भार जरी षड्‍ रिपूंच्या भावा अलख निरंजन प्रतिध्वनी यावा सद्गुरुच्या कृपेने ॥२६॥
देह लोक फार भुकेलू, भक्तिने जावो हळूहळू सद्गुरु पाय परिसाच्या जवळू, सुवर्ण होय अट्टाहास ॥२७॥
नवविध भक्ति अनाथाची अमोल युक्ती, वाढो शुक्लेंद्वत शुध्द शक्ती शेवट गोड मुक्तीचा ॥२८॥
लेखक वाचक भाविक श्रोता यांचे करो कौतुक नवनाथ सारी लाभो भाग, एके ग्रासी तृप्तता ॥२९॥
मागणे लई नाही, लई नाही, माग लेकरास जैसे पाही, पदधूळ पदरे पुसा लवलाही कर्तुं अकर्तुं समर्था तू ॥३०॥
विश्वाबसु सवत्सर प्रतिपदा ग्रंथ लेखना हो संवादा, वैशाख शुध्द दशमीस गुरुपदा, ज्याचे त्या अर्पण श्री हस्ते ॥३१॥
इति श्री नवनाथसार, गोरक्षमुखिचा प्रचार, अठरा पुराणे वेदचार, नवमोध्याय गोड हा ॥३२॥
श्रीकृष्णार्पणमस्तु॥
“ॐ श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु”

N/A

References : N/A
Last Updated : November 28, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP