श्री सत्य नवनाथ पूजा - अध्याय १

नवनाथ पारायणानंतर नवनाथांची पूजा व पुढे सारांश नवनाथ वाचन केले गेले तर अधिक उत्तम आणि फलदायी होईल.


॥ प्रथमोध्यायः ॥

श्री गणेशायनम: श्री सरस्वत्यैनम: नमन प्रथम मातृदेवता, नंतर नमन पितृदेवता, जय जय मच्छिंद्र दत्त गुरुदेवता, नमन असे ग्रंथारंभी ॥१॥
ॐ नमोजी हेरंबा, नमन माय जगदंबा, ॐ गुरुजी सद्गुरु स्वयंभा नाथ देवा कृपा मुर्ती ॥२॥
कुलदेवता सकल मूर्ती, नमो देव अपर्णा पती, हेच नमन शारदेप्रती, देई जिंव्ही वरदान ॥३॥
आदि नमो आदि दैवते, ग्रंथगीता प्रमाण सरिते, हेचि नमन वाग्देवते, ग्रंथ सिध्दि अवधारा ॥४॥
गुरु गीता ग्रंथ श्रवणी, नमन माझे संत जनी, भाव अभावी प्रमाण ध्यानी, होई श्रुत सर्वदा ॥५॥
हे नवाध्याय निरुपण, गुरु गुण किर्तन महिमान, नवनारायण पत्रप्रमाण, स्वानंदा सिंधू अवधारा ॥६॥
कलियुगा माझारी नवनाथ अवतार भूवरी, तेचि कथन नवनाथसारी, वदनी सत्य जगदात्मा ॥७॥
कलियुगी आयुष्य अल्प, व्यवहारी होई काळक्षेप, पारायण न करणे जपजाप्य, म्हणूनी विनविले सद्गुरुशी ॥८॥
नवनाथ ग्रंथाचे सार; नवनीत ओपो भूतलावर, ज्यायोगे नवनाथ प्रचार, भूमंडळी वृध्दिंगत हो ॥९॥
व्यासऋषी ग्रंथ सांगती, हेरंभमूर्ती ग्रंथ लिहिती, तैं कविनारायण सांगती हरी लिहिती श्रीहस्ते ॥१०॥
दत्तकृपेने नवनारायण अवतार घेती अवतरुन, नवनाथ नामे प्रगट होऊन, दत्त महिमा प्रकटावया ॥११॥
सर्व पंथाचे नाथ मूळ, सर्व जातिया होई सफल, भेदातीत विषयता विफळ, ऐसे नवनाथ व्रत असे ॥१२॥
प्रथम कवि मच्छिंद्र झाले, अंतरिक्ष जालंधर भले, प्रबुध्द कानिफ अवतरले, हरिनारायण गोरक्षनाथ ॥१३॥
पिप्पलायन हो चर्पटनाथ, अर्विहोत्र होई नागनाथ, द्रुमिल नारायण हो भर्तरिनाथ, चमस रेवण मिरविला ॥१४॥
करभाजन गहिनी झाला, वारकरी पंथा आदय प्रगटला, ऐसा पंथ प्रभावी प्रकाशला, भक्ति महात्म्य वाढवावया ॥१५॥
शिवांश कृष्णागर चौरंगीनाथ, माणीककृषी आडबंगीनाथ, कवीचे मीन धर्मनाथ, चौर्‍यांशी सिध्द विठामाई ॥१६॥
मत्स्योदरी कवी जन्मले, शंकरे पार्वतीस जैं उपदेशिले, सहज मच्छिंद्रें ग्रहण केले, ब्रह्मचोज ज्ञानामृत ॥१७॥
कोळियागृहीं लालन पोषण, गंगातीरी धीवर मीन, काढत असता मच्छिंद्र सान, जलां पुन्हां सोडितसे ॥१८॥
तैं रागे पितयाने ताडिलें, भीक मागशील काय बोले, तेंचिं चित्ती ठसावले निघाला विपिनिं न कळत ॥१९॥
ध्रुवा सम तपा बैसला, योग्यकाली दत्त प्रगटला, मस्तकी वरदहस्त ठेवलां, नाथदीक्षा देवविली ॥२०॥
द्विवरदहस्त मच्छिंद्रनाथ, सप्तश्रृंगी अनुष्ठानी बसत, सूर्यकुंडी प्रथम स्नान करत, षण्मास करावया ॥२१॥
प्रसन्न केली सर्व दैवतें, प्रसाद घेतला त्यांच्या हस्ते स्थापन केलें साबरी विद्येते, जनहितास्तव करुन ॥२२॥
द्वंद्व झाले मारुतीशी मारुतीने गोविले वचनाशीं, जाणे पडेल, स्त्री राज्यांशी, योगायोगे अनुक्रमें ॥२३॥
भैरवांशी चामुंडे प्रत युध्द झालें क्रम प्राप्त, यशस्वी कवी शांती लाभत, प्रसंग पठने निश्चित ॥२४॥
भूतांशी झाला संग्राम, भूतें घेतली प्रसन्न करुन, भूत-बाधा न होई, पठन करील जो प्राणीमात्र पै ॥२५॥
कालिका आणि वीरभद्रासह मच्छिंद्राचे, युध्द होत, मच्छिंद्र कौतुकाचे, गाईल त्या मानवांचे, मुष्टीभय दूर होय ॥२६॥
पाशुपतां कुल शिरोमणी, रवि-दर्शन करविले मच्छिंद्रांनी, राम सौमित्रासह सीता अवनी, राजा दिसले मच्छिंद्रास्तव ॥२७॥
नवमंत्री नवलकथा, भस्म चिमुटी दिली होतीं ज्या स्त्रीं हातां, तेथे भस्म प्रभाव पाहण्याजातां, भस्म दुरुपयोग पाहिला ॥२८॥
मच्छिंद्राने आदेशे पुकारले, सूर्यबिंब नाथक्षितिजी उगवले, गोवरि-हरि-नारायण प्रगटले, गोरक्षनाथ सत‍शीष्य ॥२९॥
मच्छिंद्राने दीक्षा दिधली, सकळ शास्त्री सरस भूतळी, हरी करी गुरुसेवाच भली, एकनिष्ठ गुरुभक्ति प्रिय ॥३०॥
दोन चक्षू चंद्रसूर्य, पौर्णिमेहून गौरकाय, वेदधन माहेर मुखांत, आजानुबाहूं भव्य मूर्ती ॥३१॥
इति श्री नवनाथ सार, गोरक्षमुखिचा प्रचार, अठरा पुराणें वेद चार, प्रथमोध्याय गोड हा ॥३३॥
॥श्रीकृष्णार्पणमस्त॥

N/A

References : N/A
Last Updated : November 28, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP