ऋध्दिपुरवर्णन - प्रकरण ६ ते १०

महानुभाव पंथातील थोर संत नारायण व्यास बहाळिये यांनी ऋध्दिपुरवर्णन काव्याची रचना केली.


प्रकरण ६ : परमार्गमहिमा, ओव्या ५

आतां अहींसू नीसंगु : नीवृत भक्तियौगु : तो नमस्करु परमार्गु : दाताराचा ॥२५॥
वेदांतपरमूख्या : षटू प्रमाणीची संख्या : तेजूनि जीये मार्गी भीक्षां : क्रांतदर्शी ॥२६॥
तो हा कैवल्यपदाची निसाणी : सीधांतां तरणी : वेधबोधा मूगटमणी : सृष्टीचेया ॥२७॥
भवाटवीयेचां सगरां : जीवां करितां येरझारा : परि नेणों कोणे सांपें धुरा : रचिला हा ॥२८॥
येथ एकलेया चालतां : भये नाहीं सर्वथा : आज्ञा कृतांता : वास पाहों नये ॥२९॥

प्रकरण ७ : ग्रंथकर्ता स्वात्मनिरोपण, ओव्या १४

ऐसीये मार्गी नीरुपमी : केवि गति लाहीजे अक्षेमीं : वरि दाटले भवश्रमीं : जीव पंग हे ॥३०॥
प्रस्तुत नारायेणें बाहाळियें : जन्म देउनि राडवाळिये : तो केवि मार्गी यें : क्षेमीं पात्र होये ॥३१॥
नाहीं आर्ति नीर्वेदु : न संडीं विषयेसंदु : जीवेंसी भवबंधु : धरुनि असें ॥३२॥
न भीयें हींसे : वांयाचें ग्रहपीसें : जाणतां परत्र आळसें : दूरि केलें ॥३३॥
पडिला नरदेहाचां उपखां : चूकले परमार्थसूखा : प ( व ) रिपडे जाले दुखा : संश्रुतीचेया ॥३४॥
वीचारितां सृष्टीआंतु : मीचि एकु दैवंहतु : देखतदेखतां आत्मघातु : घडल जया ॥३५॥
नुरीजे आइकतां : नेणों काइ होये भोगितां : कीं तें येवढया नीरयाचें आकोंत : आंगविलें जेणें ॥३६॥
तया भवदुखाचां उन्हाळां : भ्रमतां कर्ममार्गी नीम्हाळा : तवं देखे विषयेंमृगजळा : भरलिया दीक्षा ॥३७॥
प्रागत्ना चंडासाचां रस्मीं : तोर तातली कर्मभूमी : झाउवीं षडउर्मी : झळवैला जो ॥३८॥
तारुण्याचा मध्यानीं : न चलेचि वीवेकवाहानी : गेलें सुकृतपाये जळौनी : आतां गति कैंची ॥३९॥
तापीं सर्वांगें तातलीं : पाहे संतसाइली : तेही भेण रीगाली : श्रीचरणातळीं ॥४०॥
अभिळासग्रस्मीचेनि दुखें : त्रूषा भीतरू शोखे : तेविचि चींता लांहाके : तोंड पसरी ॥४१॥
जन्ममरणाचेनि सीणें : डोंगर केले ठेंगणे : कर्ममार्गीचेनि भ्रमणें : ऐसें जालें जीवा ॥४२॥
ऐसेया अपदा आनुर्वाच्या : भोगितां मज सोच्या : तवं उजरीया केलें दैवांच्या : तें परियेसां पां ॥४३॥

प्रकरण ८ : ऋध्दिपुरमाहात्म्य, ओव्या १४

जें आर्तांसि कारणें : संसारश्रमाचें वींसवणें : तें श्रीरीधपुर देखिलें तेणें : दुरुनिया ॥४४॥
मोळिकारां धांडोळितां रानें : मोळिये जोडे बावनें : ना तरि दुर्भक्षी पक्वानें : रांकू लाहे ॥४५॥
दारिद्रीं आडखूळे रीधी : अनाचार्यातें वरित सीधी : नीस्कंचना उपाधी : टाकुनि येती ॥४६॥
रोगिया अमृतपान : लाहे तान्हैला जीवन : स्वामि जालेया प्रसन्न : जेवी सेवका होये ॥४७॥
सासुरवासें सीन्नली : तीये जेवी भेटे माउलिई : असो हें तैसीं परि जालीई : श्रीऋधिपुर देखिलेया ॥४८॥
धांडोळितां तीन्ही लोक : मी उपमा न देखें आणिक : जें जाले जगदेकनायेका : क्रीडास्थान ॥४९॥
तें हें कैवल्यबिजाचें क्षेत्र : किं निवृत्ताचें परत्र : कीं परसूखाचें सत्र : जोडलें आर्तासी ॥५०॥
किं धर्माची उतरवेंठ्य : कीं सीधीचि वोळगवट : ना तो संश्रुतीसि ताठा : वज्रलेपू ॥५१॥
कींवा समर्थाचें कवण जानें : उठवाया संसाराचें ठाणें : पाळेगण उभलें मी म्हणें : देवरायाचें ॥५२॥
कीं संसारनगरीं : वसिजे हींसरीं आनाचारीं : तया वेगळी ब्रह्मपुरी : केली ब्रह्मण्यदेवें ॥५३॥
शृतीस्मृस्ती अर्थे : स्वधर्म अनुष्ठानें जेथें : तेथ सदाचार नांदते : ब्रह्मविद ॥५४॥
ते केखौनि देवनगरीं : साष्टांगीं नमस्करी : जाली तापासि बोहरी : तें परिएसा पां ॥५५॥
उदयेभास्कराचेनि वासें : नुरेचि दुर्गधितम जैसें : ना तरि आर्त जळदु वरीसें : कृसीवेळी पैं ॥५६॥
दों लक्षाचेनि अंतरें : जेवि ताप फीटेति अमृतकरें : तैसे केलें श्रीऋध्दिपुरें : दुरौनिया ॥५७॥

प्रकरण ९ : बाह्यप्रदेशवर्णन, ओव्या १३

कींबहुना सहसा : पातला बाहेप्रदेशा : जें कां श्रीहृषीकेशा : चरणांकीता ॥५८॥
हे स्वामिचे आंकीले : भणौनि दंडवत घातलें : तेविचि सदगदा वाचा बोले : तयाप्रती ॥५९॥
म्हणे भीउनि जन्ममरणा : मूनी रीगाले जया शरणा : तया दातारांचेया श्रीचरणा : पात्र जालेती ॥६०॥
एमनेमाचेनि साधनें : मोकळी मूनीचीं मनें : तयाही पासाव जगजिवनें : काइ अधिष्टीलेती ॥६१॥
पा पां देखौनि सरजे : कां गोसावीं करितिल बिजें : ना तेंहीं आपुलें विसरिजे : तुम्हांलागी ॥६२॥
आथवा हें आसो : बापु उदार्याचा अतीसो : अशेष ऋध्दिपुर वसो : भणौनि चरणांकीत ॥६३॥
की देखौनि प्रणीतसीरें : श्रीटांकीं मनोहरें : लीहूनि रीधपुरिचेनि आखरें : चरणलीपी ॥६४॥
की जातिवेव्हारा परौता : जया परीकर्म संकळीता : तो धडा आसे घालित : जीवोधरणा ॥६५॥
कीं सीध ब्रह्मविद्येचा : जो आचार्या काळाक्षेरांचा : तो देत असे परावाचा : आर्तासी ॥६६॥
वर्णावेया स्वामिचे गुण : मज नाहीं शास्त्रश्रवण : अंतर श्रधाहीन : वरि बूद्धि टांची ॥६७॥
तर्‍हीं उन्मेखाचिये पेंठें : गुणावकणी भरिन बूधीचीं साटें : सळें जन्ममरण कुंठे : तें धरिन मीं ॥६८॥
तेणें स्वामियेंवीण : जळो हें माणुसपण : काइ गेलेया प्राण : देह अमंगळ नव्हे ॥६९॥
चंद्रसूर्येवीण जैसीं : तमें दाटति आकासीं : ईश्वरेंवीण तैसीं : जीवस्वरुपें ॥७०॥

प्रकरण १० : बाह्यप्रदेश वृक्षादिमहिमा, ओव्या १३

ऐसी आठवीत देवाची थोरी : तेविचि जीवदोष वीचारी : तवं देखे आखरीं : रुखराये सांसिनले ॥७१॥
संवरित नगरीची बरव : तैसे चातुर्दक्ष आरव : वरि सूहावें कळीरव : पक्षियांचे ॥७२॥
भवपासछेदू : जो ब्रह्मादीकां वंद्यू : तो पातला संबंधु : देवरायाचा ॥७३॥
आमतें संबंध सोहळें : प्रूथवी फूंजे वायेकाळें : भणौनि पाताळा गेलीं मूळें : मज पांतां ॥७४॥
कीं परोपकृतीं लागौनिया : वीनयो आति जया : नीववीति फळपत्रछाया : श्रांतांतें ॥७५॥
नीर्‍हां कर्णरसायेनें : वरि होति वीहींगमाचीं कुंजनें : तळवटीं भीक्षुकीं विजनें : तेणें डोळे धाताती ॥७६॥
ते नीस्कंचन निरुपाधी : करुनि वीसूधा बूधी : मग बैसले समाधी : तापस ते ॥७७॥
कीं सत्वाचेनि वोलें : स्मर्ण पीकासि आलें : तें ध्यान दीसे लागलें : चरण एकवंकी ॥७८॥
करुनि कामक्रोधाची डाही : नवलपीक अवडीचां वाहीं : ब्रह्मसूकाळ लाधल जेहीं : जे रान रीगाले ॥७९॥
ईश्वरवीरहें तातले : आनंदपये उतले : तैसे डोळे दीसती झळंबैले : अश्रुपांतीं ॥८०॥
ऐसें परमार्थसंचय : जे नव्हेति अ ( आ ) त्मवंचक : ते देखिले भीक्षुक : वृक्षातळीं ॥८१॥
हे देवाचे संत : भणौनि घातलें दंडवत : तेवीचि रचनावीशेष पांत : साउमा चाले ॥८२॥
तवं उंचपणें कळसीं : स्पधा ( र्धां ) कीजताये आकासेंसीं : देखे चातुर्दक्ष तैसी : सुराळयें ॥८३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 28, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP