देवी चरित्र - महिषास वरप्राप्ति

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


घोर तपश्चर्या करितां, ब्रह्मदेव । धरी प्रगटभाव, त्याच्या पुढे ॥१॥
वर मग म्हणे मृत्यु मज नसो । अमरकाया असो सदा माझी ॥२॥
अशक्य म्हणे विधि माग दुजा वर । करोनी विचार महिष तो ॥३॥
स्त्रियेपासोनियां मज मृत्यु असावा । पुरुष नसावा कोणी श्रेष्ठ ॥४॥
अजिंक्य मी व्हावे जगी सकळांसी । ऐशिया वरासी मागतसे ॥५॥
तथास्तु म्हणोनि गेले ब्रह्मदेव । मग मत्तभाव प्राप्त झाला ॥६॥
विश्वही जिंकीले देवही जिंकीले । तयानी सेविले ब्रह्मदेवा ॥७॥
ब्रह्मदेव आणि शंकरही तैसे । त्यांच्यासवे असे देवगण ॥८॥
विष्णुपाशी गेले सकळ सांगितले । सकळ वमले दिव्य तेज ॥९॥
सर्व देव-तेज जे कां एकवटले । देवरुप झाले तदाकार ॥१०॥
सकळ देवांनी निजायुधे दिली । देवी सजविली ऐशी जाणा ॥११॥
विनायक म्हणे महिषासी मात । महज कळ्त दूतमुखे ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP