देवी चरित्र - सत्वप्रकाशनाने वासनादमन

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


पाशवी वृत्तिते जिंकाया कारण । करणे धारण सात्विकीते ॥१॥
राजसी तामसी वृत्ति ज्या कामनी । येताती उठोनी अंतरांत ॥२॥
सात्वीकी वृत्तीसी तयां झुंजवावे । तयांचे हरावे बळ जे कां ॥३॥
निर्बळ करुनी दोन्हीही वासना । त्यांचीया हनना साधावे की ॥४॥
सत्वापुढे बळ कोणाचे न चाले । सकळ मावळे अन्य तेज ॥५॥
रजस्तम जे का सत्वप्रकाशतां । त्यासी निस्तेजता प्राप्त होय ॥६॥
अमावस्या दिनी, चंद्र तो लोपत । तैसी मात होत रजस्तमां ॥७॥
सत्वांत ते मग अंतर्भूत होती । सत्वचि बनती सत्वसंगे ॥८॥
हेच रहस्य आहे देवीचरित्रांत । ज्ञाते उमजत इतर न ॥९॥
विनायक म्हणे सत्वप्रकाशन । हेच की साधन ऐक्ययोगा ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP