आर्या-गीता अध्याय १५ वा

भजनाचे सांप्रदाय - एक रामदासी सांप्रदाय आणि दुसरा वारकरी सांप्रदाय.


पुराण पुरुषोत्तम योग:

ब्रह्मांत मूळ ज्यांचे शाखा अध वेद हीच पर्णे ज्या ।
अश्वत्याला जाणुनी ज्ञाते अविनाशी वृक्ष म्हणती त्या ॥१॥

त्रिगुणांनी वाढलेला विषयांची पालवी अशा शाखा ।
खाली वरी पसरल्या कर्ममुळें पसरिली ही भू लोकां ॥२॥

रुप जयाचें न कळें उत्पती स्थितीही अंत ना ज्याला ।
वैराग्य खड्‍.ग घेऊनी छेदावे या समूळ वृक्षाला ॥३॥

संसार वृत्ती चाले आदि पुरुषास जाऊनी शरण
परतुनी येणे नाही शोधावें स्नान ब्रह्म निर्वाण ॥४॥

निर्मान मोह विरहित द्वंद्वापासून मुक्त जे झाले ।
परम पदाला गेले दृष्तांताने मनास पटवील ॥५॥

परम पदाची व्याख्या रविशशी अग्नि प्रकाशीता नाही ।
जेथे गेले असता योगी परतूनी येतचि नाही ॥६॥

परमात्म्याचा अंशचि जीवाचें रुप घेऊनी आला ।
नाना दृष्टांतांनी पंच भूतांचा विचार सांगितला ॥७॥

देही जन्मा येतो येतो किंवा निघोनिया जातो ।
पुष्पासंगे परिमल तैसा मन इंद्रियांसवे जातो ॥८॥

त्रिगुणांनी बध्द होता भक्ता होतोच जीव वस्तूंचा ।
सारोनी सर्व विषया लाभ करावाच आत्मवस्तूचा ॥९॥

ज्ञानेंद्रिय पंचक जे मन त्याते होऊनी अधीष्टान ।
विषयाते उपभोगी जीव दशा बा खरीच ही जाण ॥१०॥

आपुल्या चित्ती योगी परमात्म्याला अचूक ओळखिती ।
मतीमंद हीन बुध्दी यत्न करोनीही त्यास नोळखिती ॥११॥

दिवसा प्रकाश देते रात्रीं चंद्रात शांत जे दिसते ।
अग्नीत नित्य वसते कृष्ण म्हणे जाण तेज माझे ते ॥१२॥

भूमिवर मम तेजे भूतांना धारणा असे माझी ।
सोम रसात्मक होऊनी औषधिंना मीच ठेवितो राजी ॥१३॥

जठराग्नी मी होऊनी देहाच्या आश्रयास मी जातो ।
प्राणापान्चि होऊनी सकला अन्नासी मीच पचवीतो ॥१४॥

सर्वांच्या ह्र्दयी मी ज्ञानचि अज्ञान आणि विस्मरण ।
मजपासुनचि घड्ती वेदांतील मी रहस्य हे जाण ॥१५॥

शरण जयाचे होतें देहादी सर्व सृष्टीची भूते ।
अक्षर माया शक्ती दोन पुरुष हे जगांत मिरवीते ॥१६॥

भिन्न असे दोघाहून उत्त्म पुरुषास नाम परमात्मा ।
त्रैलोक्य व्यापुनीया रक्षण करी तोच एक जगदात्मा ॥१७॥

क्षर पुरुषां पलिकडचा अक्षर पुरुषाहूनी निराळा मी ।
पुरुषोत्तम नांवाने वेदांमध्ये प्रसिद्ध आहे मी ॥१८॥

मोहाविरहित होऊनी उत्तम पुरुषास कोण जाणेल ।
सर्वज्ञ तोची होईल सद्‍भावाने मलाच पावेल ॥१९॥

निष्पाप भारता मी श्रेष्ठ असे शास्त्र कथियले तुजला ।
हे पूर्ण जाणल्याने कृतार्थ होतो मनुष्य जन्माला ॥२०॥

ब्रह्मांतर्गत विद्या उपनिषदें -सार योग गीतेंत ।
कृष्णार्जुन संवादे पंचदशोध्याय संपला येथ ॥२१॥

॥ ॐ तत्‍ सत्‍ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
==
चार वेद सहा शास्त्रे पुराणे अठरा जरी ।
सर्वांच मुख्य भावार्थ गीतेत आणिती हरी ॥

योगांत योग उत्तम पुरुषोत्तम योग श्रेष्ठ गीतेत ॥
प्राकृत जना कळावा अर्थ असावा मराठी कवितेत ॥१॥

जन ह्र्दयीं परमात्मा नमिते आधी तयांस स्वानंदे ।
प्रभुचरणीं मन ठेवुनि हरिगुण गावें आनंदी आनंदे ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP