मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजनावली| शनिवारची भजनावली भजनावली प्रस्तावना सोमवारची भजनावली मंगळवारची भजनावली बुधवारची भजनावली गुरूवारची भजनावली शुक्रवारची भजनावली शनिवारची भजनावली रविवार रामाची भजनावली इतर अभंग आर्या-गीता अध्याय १५ वा सौ आनंदीबाई वझेकृत एकादशी भजने भजनावली - शनिवारची भजनावली भजनाचे सांप्रदाय - एक रामदासी सांप्रदाय आणि दुसरा वारकरी सांप्रदाय. Tags : bhajangitaगीताभजन शनिवारची भजनावली Translation - भाषांतर जय जयराम कृष्ण हरी । जय जय रामकृष्न हरी ९२ गणेशस्तवन तांडव नृत्य करी । गजानन तांडव नृत्य करी ॥धृ०॥नारद तुंबर गायन करिती । ब्रह्मा ताल धरी ॥१॥सकलही देव सभेसी आले । मध्ये शिव गौरी ॥२॥आनंदात्मज म्हणे गजवदना । भव भय दूर करी ॥३॥९३ शारदादेवी भजन देवी भवानी कुल स्वामीनी । भजु या ग पुजू या ग वरदायिनी ग ॥धृ०॥सुजनाना रक्षावया आसुरांना निर्दाळाया ।राज्य असे अखंडीत रिपू नाशीनी ग ॥१॥अष्टभूजा महादेवी । शस्त्रे आयुधे करी घेई । सिंहावरी आरुढली रण रागिणी ग ॥२॥शक्ती हीच उपासना । शौर्य धैर्याची साधना । भजु या ग वंदु या ग । वर दायिनी ग ॥३॥९४ सद्गुरु स्तवन कुलूप झाले बंद । किल्ली सांपडेना । कोठार खजिना भरला असे ॥१॥किल्लीचा मालक तो हा सद्गुरु एक । डोळे उघडूनी देख परब्रह्म ॥२॥दामाजी पंताने कोठार फोडीले । धनी एक केला पांडुरंग ॥३॥जनी म्हणे देव कैशी करु सेवा । शूळापाशी उभा पांडुरंग ॥४॥तुका म्हणे ऐशा किल्ल्या झाल्य़ा कीती । देहाची संगती कोणी नाही ॥५॥९५ रुपाचा अभंग पाहु द्या रे मज विठोबाचें रुप । लागलीसे भूक डोळां माझ्या ॥धृ०॥१॥जाई जुई पुष्पें गुंफुनीया माळा । घालू घननीळा आवडीने ॥२॥कस्तुरी कुंकुम भरुनिया ताटी । अंगी लावू उटी गोपाळाच्या ॥३॥नामा म्हणे विठू पंढरीचा राणा । डोळिया पारणा होत असे ॥४॥९६ अभंग धन्य अंजनीचा सूत । नाम तुमचे हनुमंत ॥१॥ज्याने सीता शुध्दी केली । राम सीता भेटवीली ॥२॥द्रोणागिरी आणवीला । लक्षुमण वाचवीला ॥३॥ऐसा मारुती उपकारी । दास लोळे चरणावरी ॥४॥गजर ( जय जयकार ) विमान चाले गगनोदरी । भजनालागी आले हरी ।विठ्ठ्ल विठ्ठ्ल मारू हाका । श्रीहरी आले उधळू बुक्का ॥मरुतीराया बलभीमा । भजनालागी द्या प्रेमा ॥९७ मध्यंतर नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सूस्वर नाही देवे । नाही तयावीण भुकेला विठ्ठल । येईल तैसे बोल रामकृष्ण ।देवापाशी मागे आवडीची भक्ती । विश्वासेची प्रीती भावबळे । तुका म्हणे मना सांगा विचार । धरावा निर्धार दिसेदिस ॥४॥९८ अभंग अमृताहूनी गोड नाम तुझे देवा ।मन माझे केशवा का बा नेघे । का बा न घे ॥धृ०॥सांगा पंढरीराया । काय करु यासी ।का रुप ध्यानासी । न ये तुझे । न ये तुझे ॥१॥कीर्तनी बैसता । निद्रे नागवीले ।मन माझे गुंतले । विषय सूखा ॥२॥हरीदास गर्जती । हरी नामाच्या कीर्ती । नये माझे चित्ती । नामा म्हणे ॥३॥९९ अभंग आळंदी हे गां पुण्य भूमी ठाव । दैवताचें नांव सिध्देश्वर ॥१॥चौर्यांसी सिध्दांचा सिध्द भेटी मेळा । तो सुख सोहळा काय बानू ॥२॥धृ०॥विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव । स्वगीहुन देव करिताती ॥३॥नामा म्हणे देवा । चला तया ठाया । विश्रांती घ्यावया कल्पवरी ॥४॥१०० अभंग धरिल्या देहांचें सार्थक करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ॥१॥॥धृ०॥नामाची या नौका भरीन सहस्त्रभरी । नावाडी श्रीहरी पांडुरंग ॥२॥लावीन निशाण जावया वैकुंठा । गाजवीन पेठा भक्तीची या ॥१॥भाविक हो येथे धरावा आवंका । दास विनवी तुका भाविकासी ॥३॥१०१ अभंग उपसंहार संतांचा अभंग संत चरण रज लागता सहज । वासनेचे बीज जळूनी जाय ॥१॥मग रामनामी उपजे आवडी । सुख घडोघडी वाढूं लागे ॥२॥॥धृ०॥कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे । ह्र्दयी प्रगटे रामरुप ॥३॥नामा म्हणे साधन सुलभ गोमटे । परी उपतीष्ठें पूर्व पुण्यें ॥४॥१०२ अभंग रंग मांडिला रंगणी । उभा ठाकला कीर्तनी ॥१॥हाती घेवोनिया वीणा । कंठी राहे नारायणा ॥धृ०॥२॥सावळी देखिली मूर्ती । माझ्या जिवाची विश्रांती ॥३॥तुका म्हणे दे गा देवा । माझ्या भजनाचा ठेवा ॥४॥१०३ गौळण त्या धन्य गोपिकांना । प्रभू लाभ जाहला ना ॥धृ०॥शिशु पाळण्यात रडते । त्यजुनी तयास जाते ।आवरोनी प्रेम पान्हा । प्रभू लाभ जाहला ना ॥१॥गेली यमुना जिवना । मधू नाद येई काना ।विसरे ती देहभाना । प्रभू लाभ जाहला ना ॥२॥अष्टांग योग साधू । म्हणुनी कितीक साधू ।बसले धरूनी आसना । प्रभू लाभ नाही त्यांना ॥३॥किती भाग्य गोपिकांचे । अद्वैत ब्रह्म साचे सकार जहाले ना । प्रभुलाभ जाहला ना ॥४॥१०४ गौळण कृष्ण मजकडे पाहू नको माझी घागर गेली फुटून ॥धृ०॥डोईवर घागर हातामधे झारी । वेणीच गेली सुटून ॥१॥भिंती आड लपुनी आला माझ्या जवळी । नाहाणीत नाहते जपून ॥२॥शाम हा सुंद्दर अती मनोहर । बहर हा घ्यावा लुटून ॥३॥माणिक प्रभू म्हणे प्रितीची राधा । हरी चरणी लागे जपून ॥४॥१०५ गौळण असा कसा देवाचा देव बाई ठकडा । देव एका पायाने लंगडा ॥धृ०॥गवळया घरी जातो । दही दूध खातो । करी दह्या दुधाचा रबडा ॥१॥शिंकेची तोडीतो मडकेची फोडितो । करी नवनीताचा सडा ॥२॥वाळवंटी जातो कीर्तन करितो । घेतो साधु संतासी झगडा ॥३॥एका जनार्दनी भिक्षा वाढा माई । देव एकनाथाचा बचडा ॥४॥१०६ आरती मारुतीची सत्राणे उड्डणे हुंकार वदनी । करी डळमळ भू मंडळ सिंधूजळ गगनी ॥कडाडिले ब्रह्मांड घोका त्रिभूवनी । सूरवर नर निःशाचर त्या झाल्या पळणी । जय देव जय देव जय हानुमंता । तुमचेनी प्रसादे न भये कृतांता ॥१॥दुमदुमिले पाताळ उठला प्रती शब्द । धगधगिला धरणीधर मानियेला खेद ।कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद । रामी रामदासा शक्तीचा शोध ॥२॥शनिवारचे भजन संपूर्ण N/A References : N/A Last Updated : December 23, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP