मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|निर्वाण प्रकरण| ६५८१ ते ६६०० निर्वाण प्रकरण ६४७९ ते ६४९५ ६४९६ ते ६५०८ ६५०९ ते ६५१७ ६५१८ ते ६५२९ ६५३० ते ६५४९ ६५५० ते ६५६१ ६५६२ ते ६५७० ६५७१ ते ६५८० ६५८१ ते ६६०० ६६०१ ते ६६०७ ६६०८ ते ६६३६ ६६३७ ते ६६४९ ६६५० ते ६६६३ निर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६०० तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत निर्वाण प्रकरण - ६५८१ ते ६६०० Translation - भाषांतर स्नानादि विधि सारल्या नंतर तुकारामबावांनीं देवास व पंचभूतांस आपआपले भाग विभागून देऊन देह निर्वाण केला.॥६५८१॥अवघ्या भूतांचें केलें संतर्पण । अवघीच दान दिली भूमि ॥१॥अवघाचि काळ दिनरात्र शुद्धी । साधियेली विधि पर्वकाळ ॥२॥अवघींच तीर्थ व्रतें केले योग । अवघेंचि तें सांग झालें कर्म ॥३॥अवघेंचि फळ आलें आह्मा हातां । अवघेंचि अनंता समर्पिले ॥४॥तुका ह्मणे आतां बोलूं अबोलणें । कायावाचामनें उरलों नाहीं ॥५॥॥६५८२॥झाला प्रेतरुप शरीराचा भाव । लक्षियेला ठाव स्मशानींचा ॥१॥रडती रात्रंदिवस कामक्रोधमाया ह्मणती हायहाया यमधर्म ॥२॥वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा । ज्ञानाग्नि भरभरां जीवित्वेसी ॥३॥फिरविला घट फोडिला चरणीं । महावाक्य जनीं बोंब झाली ॥४॥दिली तिळांजुळी कुळनामरुपांसी । शरीर ज्याचें त्यासी समर्पिलें ॥५॥तुका ह्मणे रक्षा झाली आपोंआप । उजळला दीप गुरुकृपा ॥६॥॥६५८३॥आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां । तो झाला सोहळा अनुपम्य ॥१॥आनंदें दाटलीं तिन्ही त्रिभुवनें । सर्वात्मकपणें भोग झाला ॥२॥एकदेशीं होतों अहंकारें आथिला । त्याच्या त्यागें झाला सुकाळ हा ॥३॥फिटलें सुतक जन्ममरणाचें । मी माझ्या संकोचें दुरी झालों ॥४॥नारायणें दिला वसतीस ठाव । ठेवूनियां भाव ठेलों पायीं ॥५॥तुका ह्मणे दिलें उमटूनि जगीं । घेतलें तें अंगीं लावुनियां ॥६॥॥६५८४॥बोळविला देह आपुलेनि हातें । हुताशिलीं भूतें ब्रह्माग्नीसीं ॥१॥एकवेळ झालें सकळ कारण । आतां नारायण नारायण ॥२॥अमृतसंजीवनी निवविली खाई । अंगें बये ठायीं हरपलीम ॥३॥एकादशीविध जागरण उपवास । बारावा दिवस भोजनाचा ॥४॥अवघीं कर्मे झालीं घटस्फोटापाशीं । संबंध एकेसी उरला नामीं ॥५॥तुका म्हणे आतां आनंदीं आनंदु । गोविंदीं गोविंदु विस्तारला ॥६॥॥६५८५॥पिंडदान पिंडें ठेविलें करुन । तिळीं तिळवण मुळत्रयीं ॥१॥सारिले संकल्प एका चि वचनें । ब्रह्मीं ब्रम्हार्पण सेवटींच्या ॥२॥सव्य अपसव्य बुडालें हें कर्म । एका एक वर्म एकोविष्णु ॥३॥पित्यापुत्रत्वाचें झालें अवसान । जनीं जनार्दन अभेदेंसी ॥४॥आहे तैसी पूजा पावली सकळ । सहज तो काळ साधियेला ॥५॥तुका ह्मणे केला अवघ्यांचा उद्धार । आतां नमस्कार सेवटींचा ॥६॥॥६५८६॥हातीं घेऊनियां काठी । तुका लागला कळिवरा पाठी ॥१॥नेऊनि निजविलें स्मशानीं । माणसें जाळी ते ठाकणीं ॥२॥काढिलें तें ओढें । मागील उपचाराचे पुढें ॥३॥नाहीं वाटों आला भेव । सुख दु:ख भोगिता देव ॥४॥याजसाठीं हें निर्वाण । केले कसियेलें मन ॥५॥तुका ह्मणे अनुभव बरा । नाहीं तरी शास्त होय चोरा ॥६॥॥६५८७॥पिंड पदांवरी । दिला आपुलिया करीं ॥१॥माझें झालें गयावर्जन । फिटलें पितरांचे ऋण ॥२॥केलें कर्मांतर । बोंब मारिली हरीहर ॥३॥तुका ह्मणे माझें । भार उतरलें ओझें ॥४॥====अभिमानाचा त्याग करुन देहाचें निरसन केल्यावर सर्वांच्या ऋणांतून मुक्त होऊन प्रतिज्ञा केली होती तिज प्रमाणें आपली काया ब्रह्म केली. ॥६५८८॥शोधितांचि नये । म्हणोनि ओळंगितो पाय ॥१॥आतां दिसों नये जाणा । ऐसें करा नारायणा ॥२॥परतोनी मन । गेलें ठायींच मुरोन ॥३॥विसरला तुका । बोलों चालों झाला मुका ॥४॥॥६५८९॥तान्हे तान्ह प्याली । भुक भुकेनें खादली ॥१॥जेथें तेंचि नाहीं झालें । झाडा घेतला विठ्ठलें ॥२॥वास वासनेसी नाहीं । मन पांगुळलें पायीं ॥३॥शेष उरला तुका । जीवीं जीवा झाला चुका ॥४॥॥६५९०॥रज्जु सर्पाकार । भासयेलें जगडंबर ॥१॥म्हणोनि आठवितों पाय । घेतों अलाय बलाय ॥२॥दृश्य द्रुमाकार लाणी । केलें सर्वस्वासी धणी ॥३॥तुकीं तुकला तुका । विश्वीं भरोनी उरला लोकां ॥४॥॥६५९१॥म्हणवितों दास । परि मी असें उदास ॥१॥हाचि निश्चय माझा । परि मी निश्चयाहुनि दुजा ॥२॥सरतें कर्तृत्व माझ्यानें । परि मी त्याहीहूनी भिन्न ॥३॥तुका तुकासी तुकला । तुका तुकाहुनि निराळा ॥४॥॥६५९२॥करावें तें काम । उगाच वाढवावा श्रम ॥१॥अवघें एकमय राज्य बोलों चालों नये ॥२॥दुजयाची सत्ता । न चलेसी झाली आतां ॥३॥आतां नाहीं तुका । पुन: हारपला लोकां ॥४॥॥६५९३॥जन्ममरणांची विसरलो चिंता । तूं माझा अनंता मायबाप ॥१॥होतील ते डोळां पाहेन प्रकार । भय अनिवार निरसिलें ॥२॥लिगाडाचें मूळ होतीं पंचभूतें । त्यांचें त्यापुरतें विभागीलें ॥३॥तुका ह्मणे झाला प्रपंच पारिखा । जीवासी तूं सखा पांडुरंग ॥४॥॥६५९४॥एक वेळे केलें रितें कलेवरा । आंत दिला थारा पांडुरंगा ॥१॥पाळण पोषण न लागे ते सोई । देहाचे ते कांहीं सर्वभाव ॥२॥माझिया मरणें झाले हे वसती । लागली ते ज्योती अविनाश ॥३॥झाला ऐसा एका घायें येथें नाहीं । तुका ऐसा कांहीं बोलों नये ॥४॥॥६५९५॥नभोंमय झालें जळ । एकी सकळ हरपलें ॥१॥आतां काय सारासारी । त्यांच्या लहरी तयांत ॥२॥कैंचा तेथें यावा सांडी । आप कोंडी आपणां ॥३॥तुका ह्मणे कल्प झाला । अस्त गेला उदयीं ॥४॥॥६५९६॥कोणापाशीं द्यावें माप । आपींआप राहिलें ॥१॥कासयाची भरोवरी । काय दुरी जवळी ॥२॥एकें दाखविले दाहा । फांटा पाहा पुसुनी ॥३॥तुका ह्मणे सरलें ओझें । आतां माझें सकळ ॥४॥॥६५९७॥कोणापाशीं द्यावें माप । आपींआप राहिलें ॥१॥कासयाची भरोवरी । काय दुरी जवळी ॥२॥एकें दाखविले दाहा । फांटा पाहा पुसुनी ॥३॥तुका ह्मणे सरलें ओझें । आतां माझें सकळ ॥४॥॥६५९७॥पदोपदीं दिल्हें आंग । झालें सांग कारण ॥१॥रुधवुनी ठेलों ठाव । जागा वाव सकळ ॥२॥पुढती चाली मना लाहो । वाढे देहो संतोष ॥३॥तुका म्हणे क्षर भागीं । झालों जगीं व्यापक ॥४॥॥६५९८॥ठकिलें काळा मारिली दडी । दिल्ही कुडी टाकोनियां ॥१॥पांघरलों बहु काळें । घोंगडें बळें सांडवलें ॥२॥नये ऐसा लागवरी । परतें दुरी लपालें ॥३॥तुका ह्मणे आड सेवा । लाविली हेवा धांदली ॥४॥॥६५९९॥आनंदाचे डोहीं आनंदतरंग ॥ आनंदचि अंग आनंदाचें ॥१॥काय सांगों झालें कांहिंचिया बाहीं । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥२॥गर्भाच्या आवडी मातेचा डोहळा । तेथिंचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥तुका ह्मणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥४॥॥६६००॥पाणी पात्र दिगंबरा । हस्त करा सारिखे ॥१॥अवश्यक देव मनीं । चिंतनींच सादर ॥२॥भिक्षा कामधेनू ऐसी । अवकाशीं शयन ॥३॥पांघरुन तुका दिशा । केला बास अलक्षीं ॥४॥ N/A References : N/A Last Updated : April 15, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP