मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|निर्वाण प्रकरण| ६५३० ते ६५४९ निर्वाण प्रकरण ६४७९ ते ६४९५ ६४९६ ते ६५०८ ६५०९ ते ६५१७ ६५१८ ते ६५२९ ६५३० ते ६५४९ ६५५० ते ६५६१ ६५६२ ते ६५७० ६५७१ ते ६५८० ६५८१ ते ६६०० ६६०१ ते ६६०७ ६६०८ ते ६६३६ ६६३७ ते ६६४९ ६६५० ते ६६६३ निर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९ तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत निर्वा्ण प्रकरण - ६५३० ते ६५४९ Translation - भाषांतर देवानें आवडीनें कण्याची पेज सेवन केली.॥६५३०॥ऐका महिमा आवडीची । बोरें खाय भिल्लटिचीं ॥१॥थोर प्रेमाचा भुकेला । हाची दुष्काळ तयाला ॥२॥पोहे सुदाम देवाचे । फके मारी कोरडेच ॥३॥न ह्मणे उचिष्ट अथवा थोडें । तुका ह्मणे भक्ति पुढें ॥३॥====देवभक्त जेवल्यानंतर लक्ष्मी, सत्यभामा, रुक्मिणी वगैरे तुकारामबावांच्या गृहीं प्रवेशन जिजाबाईच्या संसारास हसल्यावरुन ती तुकारामबावांस कठोरोत्तरें बोलली ते अभंग.॥६५३१॥मज चि भोंवता केला येणें जोग । काय याचा भोग अंतरला ॥१॥चालोनियां घरा सर्व सुखें येती । माझी तों फजीती चुके चि ना ॥२॥कोणाची बाईल होऊनियां वोढूं । संवसारीं कादूं अपदा किती ॥३॥काय तरी देऊं तोडतील पोरें । मरतीं तरी बरें होतें आतां ॥४॥कांहीं नेदी वांचों धोवियेलें घर । सारवावया ढोर शेण नाहीं ॥५॥तुका ह्मणे रांड न करितां विचार । वाहुनियां भार कुंथे माथा ॥६॥॥६५३२॥काय नेणों होता दावेदार मेला । वैर तो साधिला होउनि गोहो ॥१॥किती सर्वकाळ सोसावें हें दु:ख । किती लोकां मुख वासूं तरी ॥२॥आपुली आई काय माझें केलें । धड या विठ्ठलें संसाराचें ॥३॥तुका ह्मणे येती बाइले असडे । फुंदोनियां रडे हांसे काहीं ॥४॥॥६५३३॥गोणी आली घरा । दाणे खाऊं नेदी पोरा ॥१॥भरी लोकांची पाठोरी । मेला चोरटा खाणोरी ॥२॥खवळली पिसी । हातां झोंबे जैसी लासी ॥३॥तुका ह्मणे खोटा । रांडे संचिताचा सांटा ॥४॥॥६५३४॥आतां पोरा काय खासी । गोहो झाला देवलसी ॥१॥डोचकें तिंबी घालल्या माळा । उदमाचा सांडी चाळा ॥२॥आपल्या पोटा केली थार । आमचा नाहीं येसपार ॥३॥हातीं टाळ तोंड वासी । गाय देउळीं देवापासीं ॥४॥आतां आह्मी करुं काय । न बसे घरीं राना जाय ॥५॥तुका ह्मणे आतां धीरी । आझुनि नाहीं झालें तरी ॥६॥॥६५३५॥बरें झालें गेलें । आजी अवघें मिळालें ॥१॥आतां खाइन पोटभरी । ओल्या कोरडया भाकरी ॥२॥किती वरी तोंड । याशीं वाजवूं मी रांड ॥३॥तुका बाइले मानवला । छि:थू करुनि यां बोला ॥४॥॥६५३६॥न करवे धंदा । आइता तोंडीं पडे लोंदा ॥१॥उठितें तें कुटितें टाळ । अवघा मांडिला कोल्हाळ ॥२॥जीवंत चि मेले । लाजा वाटुनियां प्याले ॥३॥संवसाराकडे । न पाहाती ओस पडे ॥४॥तळमळती यांच्या रांडा । घालिती जीवा नांवें धोंडा ॥५॥तुका ह्मणे बरें झालें । घे गे बाइले लीहिलें ॥६॥॥६५३७॥कोण घरा येतें आमुच्या काशाला । काय ज्याचा त्याला नाहीं धंदा ॥१॥देवासाठीं झालें ब्रह्मांड सोइरें । कोमळ्या उत्तरें काय वेचे ॥२॥मानें पाचारितां नव्हे आराणुक । ऐसे येती लोक प्रीतीसाठीं ॥३॥तुका ह्मणे रांडे नावडे भूषण । कांतेलेंसे श्वान लागे पाठीं ॥४॥॥६५३८॥निजों नेदी सकाळवेळीं । रातींकाळीं चिनचिनी ॥१॥वोंगळानें घेतली पाठी । केली आठी जीवासी ॥२॥मेळवूनि सवें जन चिंता नेणे देवळींच ॥३॥तुका म्हणे आलों घरा । तोंडा घोरा बाइलेच्या ॥४॥॥६५३९॥घरीं रांडा पोरें मरती उपवासी । सांगे लोकांपासी थोरपण ॥१॥नेऊनियां घरा दाखवावें काय । काळतोंडा जाय चुकावूनि ॥२॥तुका ह्मणे आह्मी जाणों त्या प्रमाण । ठकावे हे जन तैसे नहों ॥३॥॥६५४०॥निघालें दिवाळें । झालें देवाचें वाटोळें ॥१॥आतां वेचूं नये वाणी । विचारावें मनिच्या मनीं ॥२॥गुंडाळिलीं पोतीं । भीतरी लावियेली वाती ॥३॥तुका ह्मणे करा । ऐसा माजी घरा ॥४॥॥६५४१॥तुकोबाची कांता सांगे लोकांपाशीं । वेडा पंढरीशी जातो बाई ॥१॥माझे मायबापें बरें नाहीं केलें । पदरीं बांधिलें भिकार्याच्या ॥२॥चौघी माझ्या बहिणी नांदती सुखाच्या । माझी कर्मदशा ऐशी झाली ॥३॥फुटकाचि वेणू तुटक्याचि तारा । घाली वेरजारा पंढरीसी ॥४॥तुका ह्मणे तिनें ऐसें न करावें । परी शरण जावें विठोबाला ॥५॥॥६५४२॥तुकोबाची बाईल कैसी । मारी बुदबुदां पोरांसी ॥१॥मेला जन्माचा भिकारी । नित्य सोडीना पंढरी ॥२॥गुज ऐके शेजे नारी । पिसा हिंडे दारोदारीं ॥३॥तुका म्हणे धीर धरी । अझुनी काय झालें तरी ॥४॥॥६५४३॥बाइलेनें भलें । ह्मणे दाविलें चांगलें ॥१॥एकाविण एका । वेचें मोल होतें फुका ॥२॥काळिमेनें राती । दिवस कळा आली होती ॥३॥उंच नीच गारा । हिरा परीस मोहरा ॥४॥विषें दाविलें अमृत । कडू गोड घात हीत ॥५॥तुका ह्मणे भले । तैसे नष्टानें दाविलें ॥६॥====फाल्गुन शुद्ध एकादशीच्या दिवशीं देवासमोर उभें राहून कीर्तन केलें.॥६५४४॥जोडोनियां कर । उभा राहिलों समोर ॥१॥हेंचि माझें भांडवल । जाणे कारण विठ्ठल ॥२॥भाकितों करुणा । आतां नुपेक्षावें दीना ॥३॥तुका ह्मणे डोयी । ठेवीं वेळोवेळां पायीं ॥४॥॥६५४५॥न राहे क्षण एक वैकुंठीं । क्षीरसागरीं त्रिकुटीं ॥ जाय जेथें दाटी । वैष्णवांची धांवोनी ॥१॥भाविक गे माय । भोळे गुणाचे ॥ आवडे तयाचें नाम घेतां तयाशीं ॥२॥जो नातुडे कवणीये परी । तपें दानें व्रत थोडीं ॥ ह्मणतां नाचे हरी । रामकृष्ण गोविंद ॥३॥चौदा भुवनें जयाच्या पोटीं । तो राहे भक्तांचिये कंठीं ॥ करोनीयां साठीं । चित्त क्षेम दोहींची ॥४॥जया रुप ना आकार । धरी नाना अवतार ॥ घेतलीं हजार । नांवें ठेवुनी आपणा ॥५॥ऐसा भक्तांचा हा ऋणी । पाहतां आनमीं पुराणी ॥ नाहीं तुका ह्मणे ध्यानीं । तो कीर्तनीं नाचतसे ॥६॥॥६५४६॥बरवा झाला वेवसाव । पावलों चिंतिलाची ठाव ॥ दृढ पायीं राहिला भाव । पावला जीव विश्रांती ॥१॥बरवा फळला शकुन । अवघा निवारला शिण ॥ तुमचें झालिया दरुषण । जन्ममरण नाहीं आतां ॥२॥बरवें झालें आलों ठाया । होतें संचित ठायींच्या पायां ॥ देह भाव पालटली काया । पडली छाया ब्रम्हींची ॥३॥जोडलें न सरे हें धन । अविनाशी आनदंघन ॥ अमूर्त मूर्ति तूं मधुसुदन । समचरण देखियेले ॥४॥जुनाट युगादीचें नाणें । बहुता काळचें ठेंगणें ॥ लोपलें होतें पारिखेपणें । ठाव चळणें चुकविला ॥५॥आतां या जीवाचिये साठीं । न सोडी पडलिया मिठी ॥ तुका ह्मणे शिणलों जगजेठी । न लावी दिठी दुसर्याची ॥६॥॥६५४७॥देवा तूं आमचा कृपाळ । भक्तप्रतिपाळ दीनवत्सल ॥ माय तूं माउली स्नेहाळ । भार सकळ चालविसी ॥१॥तुजलासी चिंता । राखणें लागे वांकडें जातां ॥ नये विसंबतां । धीर तुज ॥२॥आम्हां भय चिंता नाहीं धाक । जन्म मरण कांही एक ॥ झाला इहलोकीं परलोक । आलें सकळीक वैकुंठ ॥३॥नकळे दिवस किंवा रात्री । अखंड लागलीसे ज्योति ॥ आनंदलहरीची गती । वर्णू किती तया सुखा ॥४॥तुझिया नामाचीं भूषणें । तुवां मज लेवविलें लेणें ॥ तुका म्हणे तुझिया पुण्यें । काय तें उणें एक आम्हा ॥५॥॥६५४८॥आतां येणें बळें पंढरीनाथ । जवळी राहिला तिष्ठत ॥ पहातां नकळे जयाचा अंत । तोचि हृदयांत घालूं आतां ॥१॥विसरोन आपला देहपणभाव । नामें भुलला पंढरीराव ॥ न विचारी याति कुळ कांहीं ठाव । लागावया पाव संतांचे ॥२॥बरें वर्म आलें आमुच्या हातां । हिंडांवे धुंडावें न लागतां ॥ होय अविनाश सत्ताकार दाता । चतुर्भुज संतां परी धांवें ॥३॥आवडी होय सान थोर । रुप सुंदर मनोहर ॥ भक्तिभाव लोभापर । पाहे आदर याचकपणें ॥४॥तें वर्म आलें आमुचिया हातां । म्हणोनि शरण रिघालों संता ॥ तुका म्हणे पंढरीनाथा । न सोडी आतां जीवेंसी ॥५॥॥६५४९॥कथा त्रिवेणीसंगम । भक्त आणि देवनाम ॥ तेथीचें उत्तम । चरणरज वंदितां ॥१॥जळती दोषांचें डोंगर । शुद्ध होती नारीनर ॥ गाती ऐकती सादर । जे पवित्र हरिकथा ॥२॥तीर्थे तयां ठायां येती पुनीत व्हावया ॥ पर्वकाळ पायां । तळीं वसे वैष्णवा ॥३॥अनुपम्य हा महिमा । नाहीं द्यावया उपमा ॥ तुका ह्मणे ब्रह्मा । नेणें वर्णू या सुखा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : April 15, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP